ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
29 Mar 2009 - 9:11 am

अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो,
"काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?"
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं.

लागलीच ती मला म्हणाली,
मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे.एखाद्दा शहरी मोठ्या शाळेतल्या मुलांच्या ज्ञानाच्या जरूरी एव्हड्या ह्या शाळेतल्या मुलांच्या आवश्यक्यता असतात.त्यांच्या पूर्वपीठिका आणि त्यांच्या गरजा आव्ह्यानात्मक असतात आणि वास्तविक असतात.त्यामुळे त्याचे परिणाम त्यांचं आचरण एक ना एक प्रकारे असुकर करतात.

मी तिला म्हणालो,
"मागे एकदा तू मला तुझ्या वर्गातल्या एका मुली बद्दल सांगितलं होतंस.आता ती बरीच मोठी तरूणी झाली असेल."
ह्याची आठवण दिल्यावर अलका म्हणाली,
"त्या विद्दार्थीनीने माझ्या मनात कायमची छाप ठेवली आहे.दहा वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही ह्या शाळेचं उध्घाठन केलं त्यावेळच्या त्या लहानश्या वर्गापासून ती होती.
एक दिवशी तिने मला तिला घरी वागणूक कशी मिळते त्याचं वर्णन करून सांगितलं होतं त्याची आठवण येऊन आता ही माझ्या अंगावर कांटा येतो.आम्ही तिच्या त्या वातावरणात बदल घडवून आणला तरी त्याची झालेली क्षती दूरगामी आणि कायम स्वरूपाची होती. मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?

माझ्या वर्गातल्या खूर्चीच्यामागे एका फळीवर माझ्या पसंतीची एक उक्ति लिहिलेली होती.
"आपण मोठमोठाल्या गोष्टी करूं शकणार नसूं पण फक्त लहान लहान गोष्टी विशेष प्रेमाने करूं शकतो."
असे बरेच दिवस यायचे की मी निराश व्हायची पण जेव्हा त्या फळीवरच्या "प्रेमाने" ह्या शब्दावर नजर जायची तेव्हा त्याने माझ्या स्मृती जागृत व्हायच्या आणि त्या शब्दाचं प्रभूत्व मनावर बिंबायचं."

मी अलकाला म्हणालो,
"पण सगळेच काही प्रेम करून घेण्याच्या लायकीचे नसतात.असं मला वाटतं."
त्यावर ती म्हणते कशी,
"मला वाटतं,जे प्रेम करून घ्यायला कठीण आहेत अशांवर प्रेम करणं म्हणजे महाकठिण आणि फार खास काम असतं.तो दिवस संपून गेल्यावर वाटायचं की निदान मी प्रयत्न तरी केला. मी आराधाना करायचे की निदान मी प्रयत्न करण्याची पराकाष्टा तरी केली असं माझ्या विद्दार्थ्यानां वाटावं आणि अनेक वेळां न झाल्यास मला त्यांनी माफ करावं."

"तुम्हा शिक्षाकांचं एक बरं असतं,हे सर्व विद्दार्थी आणि विद्दार्थिनी मोठी झाल्यावर तुम्हाला माहित नसेल त्यापेक्षा तुमच्याशी उपकृत असतात."सारांश "सिनेमातला तो मंत्री आणि मुलाच्या अस्थी परदेशातून आल्यावर वेळेवर मिळत नाहित म्हणून बेजार झालेले ते त्याचे वडील पण त्या मंत्र्याचे गुरूजी,ह्यातला संवाद आठवला की "धन्य तो शिक्षकी पेशा असं मला वाटायचं."
माझं हे उदाहरण ऐकून काही तरी तिचा अनुभव तिला सांगावासा वाटला.

अलका मला म्हणाली ह्याच संदर्भाने मला तुम्ही आठवण करून दिलीत तो किस्सा सांगते,
"अलिकडेच एका दिवशी लंच घेतानाची आठवण झाली.माझे बाकी शिक्षक सहकारी एका उमद्दा होतकरू क्रिकेटपटू बद्दल चर्चा करीत होते.तो माझा विद्दार्थी होता असं मी त्यांना अभिमानाने सांगत होते.आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं.
त्याच दिवशी संध्याकाळी वर उल्लेखलेली आता एक तरूणी झालेली मुलगी तिच्या मित्राला घेऊन मला भेटायला आली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी हंसली आणि ती लगेचच म्हणाली,
" ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं."
मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले.तिच्या त्या एका वास्तविक विवरणावर मी जरी जगातले सर्व क्रिकेटपटू ओवाळून टाकले असते तरी ते स्विकृती लायक नव्हते."

मला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला.म्हणूनच मी तिला म्हणालो,
" अलका,तुम्हा शिक्षकांच्या परंपरा असतात.आणि तुमचे विद्दार्थी आणि विद्दार्थिनी आपल्या मनात त्या जोपासून ठेवीत असतात नाही काय?"

अलका म्हणते,
"दिवसाच्या शेवटी किंवा आपल्या आयुष्याचा अखेरीस श्रेष्टतेची व्याख्या मौलिक अर्थाने भ्रामिकच असावी.मला वाटतं,जी व्यक्ति माझ्या समोर आहे त्या व्यक्तिवर मी प्रेम करण्याची आवश्यकता आहे.कदाचीत पुढे कधी तरी अशी ही प्रेम केलेली व्यक्ति येईल एक दिवशी आणि सांगेल,
"त्यामुळे फरक पडला."
कदाचीत ती व्यक्ति तसं सांगणारही नाही.इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यासारखं काही माझं जीवन नाही.पण माझं नांव, ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्यांच्या कदाचीत हृदयात लिहिण्यासारखं राहिल. ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला? "

खरंच किती सत्य आहे अलकाच्या म्हणण्यात!

श्रीकृष्ण सामंत
.

कथालेख

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

29 Mar 2009 - 12:19 pm | योगी९००

आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं.

आणि " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं."
मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले.

हे जरा कळलं नाही. कोठला मूर्खपणा?

खादाडमाऊ

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Mar 2009 - 10:42 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो खादाडमाऊ,
अलका म्हणाली,
"मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?"
ह्याचा संदर्भ अलकाच्या डोक्यात असावा.पण ज्यावेळेला ती तरूण मुलगी आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणाली,
" " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं."
हे तिच्या तोंडून इतक्या वर्षानी ऐकल्यावर ह्या विध्यार्थीनी बद्दल जो समज होता की"माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?"
हा विचार त्यावेळी अलकच्या मनात आला होता याची तिला आठवण येऊन,
"मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले."
तो मुर्खपणा.
आपल्या प्रश्ना बद्दल आणि प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Mar 2009 - 10:47 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो खादाडभाऊ ,
आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Mar 2009 - 1:06 am | श्रीकृष्ण सामंत

हलो खादाडभाऊ,
"आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं."

आपल्या प्रतिक्रितल्या ह्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे,की तो क्रिकेटपटू अलकाच्या शिक्षीकेच्या पेशातल्या पूर्वीच्या शाळेतला होता.तसे आता नवीन विद्दार्थी./विद्दार्थीनी "होणे न लगे." असं वाटून अलकाने ते उद्गार काढले असावेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com