माजी विद्यार्थी मेळावा.... असाही!

अडाणि's picture
अडाणि in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 3:54 am

मागच्या आठवड्यात घरी फोन आला... 'उद्या माजी विद्यार्थी मेळावा आहे शाळेत. सध्याकाळी ५ वाजता शाळेच्या पटांगणात. जरूर या.' कुटुंबातील दोन पिढ्या शाळेत बालवाडी ते दहावी पर्यंत शिकलेल्या असल्याने आमंत्रणाचा विशेष आनंद झाला. उशीरा आमंत्रण दीले असले तरी काही हरकत नाही. जुने शिक्षक भेटतील आणि शाळेतील सोबती भेटतील ह्या आनंदात बाकी सर्व गोष्टी आम्ही विसरून गेलो.

ठरल्या वेळेवर (अंमळ जरा आधीच...) आम्ही शाळेत पोचलो... पुण्यातील शिवाजीनगरची 'भारत इंग्लिश स्कूल' ही अस्मादीकांची बालपणची कर्तूत्वभूमी !!! नाव इंग्लिश असले तरी संपूर्ण शाळा मराठीतच चालायची. (सध्या इंग्लिश मिडीयम पण सुरू आहे म्हणे...असो) पटांगणात छानसे स्टेज बघून मेळाव्याची तयारी दिसत होती. परंतू ओळखीचे चेहरे काही दिसेनात... चुकून एक - दोन ओळखीचे शिक्षक दिसले आणि आम्ही लांबूनच हसलो. (जवळ जायला आजपण भिती वाटते!) एकंदरच बाकिचे सोमे-गोमे दिसत होते. एकूण काय.. शाळा खूप बदलली आहे असे समजून आम्ही कार्यक्रम चालू व्हायची वाट बघत बसलो.

कार्यक्रम सुरू होताच, शिक्षक, माजी शिक्षक, विद्यार्थी किंवा माजी विद्यार्थी ह्या कोणत्याही प्रकारात न मोडणार्‍या व्यक्त्यांची भाषणे सुरू झाली. दोन मिनीटांतच लक्षात आले की प्रकार काहीतरी वेगळाच आहे. सर्वच भाषण बहाद्दरांनी सध्याच्या लोकसभेच्या उमेदवाराची स्तुती करायची स्पर्धा लावली होती. त्यामुळे समजले कि हा माजी विद्यार्थी मेळावा नसून 'समाजकारण' करणार्‍या उमेदवाराची प्रचारसभा आहे. आणि हे उमेदवार शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी प्रचार करायला शाळेस वेठीस धरले होते. वैताग आला तिथे जावून.

'राजकारण नव्हे समाजकारण' असा नारा देवून लोकसभेला उभे राहणार्‍या उमेदवाराकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सुरूवातच अश्या पधतीने खोटे बोलुन करणार तर तुमच्यामधे आणि बाकी लोकांमधे (उमेदवारांमधे) काय फरक राहीला ?

अश्या प्रकारचे अनुभव बाकी लोकांपर्यंत पोचावे आणि सर्वांना माहिती व्हावी म्हणून मी येथे हे मांडले. आशा आहे की व्यक्तीगत अनुभवातून मतदारांची माहिती वाढावी. इतर सभासदांनीपण त्यांचे व्यक्तीगत अनुभव मांडावेत.
- अडाणि.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

27 Mar 2009 - 8:22 am | प्राजु

विद्यार्थी मेळाव्याच्या नावाखाली.. निवडणूक प्रचार.. धन्य!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

27 Mar 2009 - 8:44 am | सहज

शक्य असल्यास प्रमुख वक्ते व कोणाची स्तुती इ. लिहा.

कमाल आहे.

अडाणि's picture

27 Mar 2009 - 9:37 pm | अडाणि

'समाजकारण' वादी म्हणजे डी. एस. के. !!! बाकी वक्ते मला माहिती नाहित कारण मी ओळखले नाही कोणाला....
-
अफाट जगातील एक अडाणि.

क्रान्ति's picture

27 Mar 2009 - 1:11 pm | क्रान्ति

हा विचित्र प्रकार म्हणजे वरून कीर्तन ...........असाच झाला ना! माणूस कितीही मोठा झाला तरी शाळा म्हटलं की त्याच्या मनात बर्‍याच हळव्या भावना तरळतात. आणि त्या भावनांचा असा गैरफायदा घेणे खूपच खेदजनक आहे. देव करो आणि पुन्हा कुणाला असे अनुभव न येवो!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अडाणिसेठ,
काय बोलावे आता ? तारतम्यच राहिलेले नाही काही राजकीय लोकांना.
(स्मशानभुमीतही पांढरे स्वच्छ कपडे घालून कोणाविषयी श्रद्धांजली पर बोलतांनाही काही राजकीय मंडळी सभेत बोलल्यासारखेच बोलतात)

-दिलीप बिरुटे

योगी९००'s picture

27 Mar 2009 - 1:28 pm | योगी९००

माजी विद्यार्थी मेळावा.... असाही! याऐवजी पाजी विद्यार्थी मेळावा.... असाही! असे नाव द्यायला पाहिजे होते.

प्रस्तुत लेखक आणि त्यांच्यासारखे इतर जे खरोखर आपल्या मित्रांना भेटावयास गेले होते...ते सोडून बाकी सर्व (म्हणजे राजकिय फायदा घेणारे) पाजी च..

खादाडमाऊ

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 11:47 am | विसोबा खेचर

गंमतच आहे बॉ! :)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Mar 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

तुमचा लेख वाचुन बरे वाटले.
एक उमेदवार तरी निदान शाळेपर्यंत शिकला आहे हे वाचुन धन्य वाटले.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

28 Mar 2009 - 11:56 am | चिरोटा

त्या डी. एस. के ना एखादा फ्लॅट परवडेल अश्या दरात मला द्यायला सान्गा.मग माझे मत डी. एस. के च्या पक्षाला. :D
भेन्डि(पुणे महाग झाल्याने बेन्गळुरुत गेलेला)