मज छेडती अवेळी ते सूर भैरवीचे
करती अगम्य खेळी ते सूर भैरवीचे
भिजुनी तुझ्या स्मृतिंनी माझ्या मनात ओली
ती रात्र पावसाळी अन् सूर भैरवीचे
भुलवून या मनाला मज दूर दूर नेती
हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे
माझ्या मनातली मी गीते दिली तरीही
गाती तुझ्याच ओळी ते सूर भैरवीचे
स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले
घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे
घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी
श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
प्रतिक्रिया
24 Mar 2009 - 8:12 pm | चंद्रशेखर महामुनी
क्रांती ! खुप आवडली कविता....
24 Mar 2009 - 9:08 pm | संदीप चित्रे
कविता आवडली क्रांती ...
>> स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले
घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे
घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी
श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
>>
हे विशेष आवडले.
24 Mar 2009 - 9:46 pm | मराठमोळा
छान आहे कविता आणी भावार्थसुद्धा..
पण अवेळी भैरवीचे सुर छेडतात, कधी सुचलेल्या दोन ओळी पिंगा घालतात.
काव्यरसाने चांगलीच मोहिनी घातलेली आहे तुमच्यावर. :)
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
24 Mar 2009 - 10:27 pm | प्राजु
घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी
श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
सुंदर!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Mar 2009 - 10:30 pm | बेसनलाडू
कविता फार आवडली.
(कानसेन)बेसनलाडू
25 Mar 2009 - 7:21 am | मनीषा
कविता आवडली !
स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले
घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे
...सुंदर
25 Mar 2009 - 10:26 am | राघव
अगदी खास रचना! :)
भुलवून या मनाला मज दूर दूर नेती
हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे
घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी
श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
हे विशेष आवडलेत.
पावा - पावरी ... आवडले :)
राघव
25 Mar 2009 - 10:48 am | जयवी
क्रांति....अगं किती गोड आहेत तुझ्या भैरवीचे सूर !!
तुला एक सांगू...... जरा काळजी घेतलीस.....तर अप्रतिम गझल होईल. मात्रा मोज ना एकदा.
25 Mar 2009 - 2:01 pm | जागु
क्रांती खुप छान आहे कविता.
25 Mar 2009 - 6:04 pm | क्रान्ति
भैरवीचे सूर आवडलेल्या सगळ्या मित्रांना शतशः धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}