लहानपण

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
19 Mar 2009 - 2:26 pm

थोडे दिवस लहान व्हावे
बाल लिलांचे दार उघडावे.

बाल कल्पनांत जगावे
चॉकलेट च्या बंगल्यात रहावे.

परीच्या देशात आभाळी उडावे
गोळा, आईस्क्रिमने तोंड माखवावे.

माती, चिखलात लोळावे
पाण्यात जाऊन डुंबावे.

भातुकली, खेळ खेळावे
आयते खाउन गाढ झोपावे.

जिभ काढुन दुसर्‍यास चिडवावे
मार खायचा चुकवावे

शुभंकरोती रोज म्हणावे
जोरजोरात ओरडावे

खुप हसावे खुप रुसावे
हट्टालाही पेटून उठावे

थोडे दिवस निरागस, निष्पाप व्हावे
जबाबदार्‍यांना थोडे टाळावे.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

सँडी's picture

19 Mar 2009 - 3:30 pm | सँडी

सुंदर!

थोडे दिवस निरागस, निष्पाप व्हावे
जबाबदार्‍यांना थोडे टाळावे.

खरच असं जीवन एक दिवस तरी जगायलाचं हवं!

सूहास's picture

19 Mar 2009 - 6:53 pm | सूहास (not verified)

बाकी ..
माती, चिखलात लोळावे
पाण्यात जाऊन डुंबावे.

हे आमच्या(उगाच स्वता:ला" आम्ही" म्हणल की बर॑ वाटत) बाबतीत "गटारी"ला आणी र॑चप॑गमी(माफ करा)र॑गप॑चमीला दरवर्षी होते.

थोडे दिवस निरागस, निष्पाप व्हावे
जबाबदार्‍यांना थोडे टाळावे.

असे आजकाल होणे जरा विरळाच...खरच काय सोन्याचे दिवस होते ते..

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

क्रान्ति's picture

19 Mar 2009 - 9:55 pm | क्रान्ति

थोडे दिवस निरागस निष्पाप व्हावे
जबाबदार्‍यांना थोडे टाळावे
खासच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जागु's picture

20 Mar 2009 - 10:31 am | जागु

सँडी, सुहास, क्रांती तुमचे मनापासुन धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

20 Mar 2009 - 1:58 pm | सुधीर कांदळकर

अजूनहि असेंच करतों. पन्नाशीनंतरहि.

साधी सोपी सरळ छान कविता.

सुधीर कांदळकर.