मैफल

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 10:53 pm

कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्‍या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर! म्हणून उदासीन पंथी!

जगणे माझे कसे, उमगले मला आज रे
क्षणाक्षणाचे मरणे करते हसुन साजरे

सुखमय आयुष्याचे फसवे देखावे ते
डामडौल तो पोकळ छळतो पुन्हा आज रे

भेसुर वास्तव कुरतडते या मुक्या मनाला
या दुखण्याला नाहि उतारा, ना इलाज रे

नुसती घुसमट, रडणे, कुढणे अन तडफडणे
अस्तित्वाची माझ्या वाटे मला लाज रे

गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्‍यामधले, केवळ नाइलाज रे

संपव मैफल रंगहीन अन केविलवाणी
जीवनगाणे बेसुर झाले, तुटे साज रे

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

16 Mar 2009 - 11:27 pm | चन्द्रशेखर गोखले

विषिण्ण आणि विदीर्ण्..गझल म्हणुन चांगली वाटते !! पण ज्यास्त उदासीन लिहिणे बरे नाही
जीवनाला जगण्याचा येउदे माज रे....!!

गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्‍यामधले, केवळ नाइलाज रे

संपव मैफल रंगहीन अन केविलवाणी
जीवनगाणे बेसुर झाले, तुटे साज रे

हे एकदम छान लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

17 Mar 2009 - 12:31 am | चकली

गझल छान लिहली आहेस

>>व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर! म्हणून उदासीन पंथी!

भदे ची आठवण झाली..
चकली
http://chakali.blogspot.com

शब्द बापुडे's picture

17 Mar 2009 - 8:15 am | शब्द बापुडे

गझल अगदी समर्पक आहे भूमिकेशी. पण इतकी विमनस्कता? असो. इतरांची दु:ख घेता घेता स्वतः अश्वत्थामा होऊ नये, इत्केच सांगणे.
*चिरविजयी*

जयवी's picture

17 Mar 2009 - 1:37 pm | जयवी

गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्‍यामधले, केवळ नाइलाज रे

संपव मैफल रंगहीन अन केविलवाणी
जीवनगाणे बेसुर झाले, तुटे साज रे.......... हे शेर खासच !!

जागु's picture

17 Mar 2009 - 3:22 pm | जागु

क्रांती खुप छान आहे गझल.

मदनबाण's picture

17 Mar 2009 - 3:27 pm | मदनबाण

गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्‍यामधले, केवळ नाइलाज रे
सॉलिट्ट्ट्ट...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 8:34 pm | क्रान्ति

प्रतिसादाबद्दल सगळ्या मित्रांना धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}