आणखी काही मुक्तके

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 10:33 pm

क्रांती

अशाश्वताच्या वळुनी मुठी,
शाश्वतावर चढवु हल्ला,
असंतोषाचा करुनी भाला,
काळावरती घालु घाला..!!

गवंडी

घाम घालतो रक्त सडा
अन जखमातुन गळतो पू
मरणारा परी मरे परंतू
जगणा-यांचे त्यावर कंपू...!!

भिकारी

बन्द गिरणीच्या गेटा वरती
भीक मागतो एक भिकारी
घेउनी हडांची जीर्ण पंजरी
द्या हो म्हणतो मला नोकरी

अन गिरणीचा तो काळाठिक्कर
असूनी दगड क्षणांत रडला
हे श्रमाचे हात बळकट
नको पसरवुनी दाउ वदला...

गिरणीचा तो गप्प धुरांडा
ओकीत नाही आता धूर
परि भोंग्याची उगा भैरवी
ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 10:36 pm | लिखाळ

गिरणीची कविता उत्तम.. एकदम भिडणारी !
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 10:38 pm | भडकमकर मास्तर

लै बेस्ट
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रमोद देव's picture

16 Mar 2009 - 10:46 pm | प्रमोद देव

:)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

धनंजय's picture

16 Mar 2009 - 11:20 pm | धनंजय

दिसते.
मुक्तके आवडली.
(गिरणीच्या कवितेतली शेवटची एक सहज-भावूक समारोपी ओळ मर्ढेकरांनी लिहिली नसती असे वाटते - हा तुमचा खास आपला शिक्का.)

बेसनलाडू's picture

17 Mar 2009 - 2:08 am | बेसनलाडू

खास!
(गिरणगावी)बेसनलाडू

शब्द बापुडे's picture

17 Mar 2009 - 8:11 am | शब्द बापुडे

खरच मर्ढेकरांची आठवण झाली. उत्तम.
*चिरविजयी*

सहज's picture

17 Mar 2009 - 8:44 am | सहज

चांगले आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 10:25 am | घाशीराम कोतवाल १.२

गिरणीचा तो गप्प धुरांडा
ओकीत नाही आता धूर
परि भोंग्याची उगा भैरवी
ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!!

हे गिरणगावचे दाहक सत्य आहे गिरण्याबंद झाल्या गिरिणी कामगार बेरोजगार झाला त्याच्या हातचे काम सुटले
बायका पोर रस्त्यावर आले खायचे वांदे झाले मग ह्या गिरणी कामगारांच्या मुलांसमोर एकच पर्याय उभा होता मारा वा मरा
मग जन्माला आले गॅगवार उदय झाला भाइ आणी दादा लोकांचा मग हिच पोर कधि विरुध गॅग किवा पोलिसांच्या गोळ्यांना
बळी पडली

( गिरणगावातला) घाशीराम कोतवाल

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विशाल कुलकर्णी's picture

25 Mar 2009 - 3:08 pm | विशाल कुलकर्णी

व्वा, सुरेख !!

स्वप्नातले महाल कसे
रत्नजडीत असतात
वास्तवातल्या झोपड्यांना
वेदनांचेच टेकु असतात.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

चंद्रशेखर महामुनी's picture

25 Mar 2009 - 4:14 pm | चंद्रशेखर महामुनी

सर ! खुप छान...