मी २००४ साली ह्रुदयविकार शस्त्रक्रियेसाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी सुचलेले काव्य.....
जसलोक---१३०४
मनामध्ये कुठेतरी भिती ही भासते
क्षणात आहे क्षणात नाही हुरहुर हि दाटते
अंगारे,धुपारे,संत ,साधू ,बापूही
यांची साथ संगत आज खरी ना वाटते
जगू किंवा मरु हेच एक सत्य आहे
याविणा सारे जग आज मला मिथ्य आहे
सर्व नाती ,सर्व गोती ,आज भोवती नाचती
सुख दु:खाचा एकेक धागा जिवन माझे विणती
या क्षणी मनात माझ्या निशब्द भाव तरंगती
ओहोटी..... भरती मधील अंतराय जाणती..........
प्रमोद अष्टपुत्रे
०४/०५/२००४
प्रतिक्रिया
1 Mar 2009 - 10:55 pm | अविनाशकुलकर्णी
नाहि वाचवत..
1 Mar 2009 - 11:02 pm | प्राजु
वास्तव आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Mar 2009 - 9:51 am | अनिल हटेला
ओहोटी..... भरती मधील अंतराय जाणती..........
छान ओळी आहेत...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..