घनगंध

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
22 Feb 2009 - 10:47 pm

मुग्ध वेड्या चान्दणिचे , गीत हे हळुवार आहे
घाव लेवुन तव स्मृतींचे , मम मनी फुलबाग आहे...

हासणारे नेत्र माझे, अश्रुना आव्हान देती
आज दाटे या उरी हा, कोंडला नि:श्वास आहे ..

माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते,
कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे ....

-- सागरलहरी

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मनीषा's picture

23 Feb 2009 - 3:27 am | मनीषा

माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते,
कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे ....सुंदर !

सागरलहरी's picture

23 Feb 2009 - 1:23 pm | सागरलहरी

तुमच्या प्रतिक्रिया व कौतुका साठी धन्यवाद..
सागरलहरी.