(सानेकर, बांदोडकर वगैरे प्रभृतींची क्षमा मागून)
मित्र - मागवेन व्हिस्की, मागवेन ब्रॅंडी,
आणिक गावठी खास हातभट्टीची
कधी कुठे कसा तुला सांग पाजू,
वाट पाहतो मी रविवारच्या सुट्टीची
कामाला विसर तू, बस बरोबर तू.
माझा पेग तू घे, तुझा पेग मला दे.
मी - कोणता हा गुत्ता हायवेवाला
तुझ्यासवे मजला माहिती झाला
सुने सुने होते किती मन माझे
फ्रेश झाले पाहुनी ही मधुशाला
चकण्याची मज आता कळते मजा
मित्रा मी आभारी आहे तुझा
सांगतो मी खरेखरे, एवढाच पेग पुरे
तोल जातो धरा रे.
कधी पारो, कधी मिली, कधी रोजी, कधी ज्युली
करतो मी इशारे.
मित्र - बाईला विसर तू, बस बरोबर तू.
माझा पेग तू घे, तुझ पेग मला दे.
मी - नाचण्यास कुठल्या आयटमखाली
मला बारबाला घेऊनी आली.
उधळल्या नोटा आणि चिल्लर मी.
पाकिटेही आता भासती खाली.
चकण्यानेही आता येई नशा
दाखव रे दोस्ता तू घरची दिशा
आता तरी जाऊ घरी, फ़ार झाली बहादुरी
चाट बसली खिशाला.
बायकोच्या कानावरी, गेली जर कामगिरी
धरणार ती अबोला.
मित्र - बायको विसर तू, बस बरोबर तू.
माझा पेग तू घे, तुझा पेग मला दे.
मूळ गीत - गालावर खळी डोळ्यात धुंदी
कवी - चंद्रशेखर सानेकर
प्रतिक्रिया
20 Feb 2009 - 2:47 pm | अनिल हटेला
आमच्या आवडत्या गाण्याचे वीडंबन केलेस !!
ते ही आमच्या आवडत्या पेयांमध्ये !!
छान आहे ,पण वरीजनल ते वरीजनलच काय ? ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Feb 2009 - 2:50 pm | दशानन
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
20 Feb 2009 - 3:47 pm | केदार_जपान
एकदम झकास!!
20 Feb 2009 - 5:46 pm | सूहास (not verified)
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
20 Feb 2009 - 7:53 pm | प्राजु
मानलं बाबा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Feb 2009 - 8:57 pm | लिखाळ
मस्त :)
मजा आली :)
-- लिखाळ.