पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता.
न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.
त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रेफरन्सेस :-
१) पॅपिलॉन - हेनरी शॅरीयर - अनूवाद - रवींन्द्र गूर्र्जर, श्रीराम बुक एजन्सी, पुणे. (रु. ३००/-)
२) आंतर्जालः -http://en.wikipedia.org/wiki/Henri_Charri%C3%A8re आणि ईतर धागे.
३) http://en.wikipedia.org/wiki/Banco_(novel)
प्रतिक्रिया
9 Feb 2009 - 8:09 pm | प्राजु
चित्रपटही पाहण्यात नाही आला कधी.
आता मिळाला तर पाहीन. कथा इंटरेस्टींग दिसते आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Feb 2009 - 8:13 pm | ऍडीजोशी (not verified)
कथा लय म्हंजे लयच भारी आहे.
9 Feb 2009 - 8:15 pm | अन्वय
चित्रपट पाहाच एकदा.
13 Jul 2011 - 11:26 am | आत्मशून्य
पूस्तक वाचा पण चित्रपट चूकूनही नको. चांगल्या कथेची कशी वाटलावावी याचं उदाहरण म्हणजे पोपीलोन चीत्रपट/
9 Feb 2009 - 8:21 pm | पॅपिलॉन
चर्चा प्रस्तावावरील विषय नामसाधर्म्यामुळे अंमळ गमतीशीर वाटला.
असो, सध्या गडबडीत आहे. सविस्तर उत्तर लवकरच!
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
14 Feb 2011 - 12:39 pm | वपाडाव
हेच प्रश्न मलाही आहेत ...
तुमच्या सविस्तर उत्तराच्या प्रतिक्षेत?
9 Feb 2009 - 8:57 pm | टिउ
चित्रपट बघितला नाहिये पण पुस्तक बर्याच वर्षापुर्वी (म्हणजे लहानपणी) वाचलं होतं. पुन्हा पुन्हा पकडला जाउनसुद्धा पॅपिलॉन प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी यशस्वी होतो. त्याच्या त्या बोटीतल्या सफरी, रेड ईंडियन्स सोबतचं वास्तव्य, मोती शोधायला समुद्रात जाणं हे सगळं सिंदबादच्या सफरींसारखं होतं. लहान मुलांना असलंच वाचायला आवडतं. त्यामुळे बरीच वर्ष हे पुस्तक आमचं आवडतं होतं.
असले प्रश्न त्यावेळी पडले नाहीत. आता पुन्हा वाचुन बघेन.
गयानाच्या जेलमधे महिनोनमहिने एकटा असतांना त्याच्या डोक्यात कायम सुडाचे विचार असायचे. तासंतास त्या छोट्याश्या खोलीत येरझारे मारत कुणाला कसं ठार करायचं याचे आरखडे तो बनवायचा. पण बाहेर पडल्यावर त्यातला फोलपणा त्याला जाणवतो आणि तो सुड घेत नाही असं काहीतरी आठवतय...
9 Feb 2009 - 9:33 pm | अविनाशकुलकर्णी
मी हा चित्रपट पाहिला.अतिशय अप्रतिम सिनेमा आहे..स्टिव्ह मॅकलिन व डस्टिन हॉपमन यांचि कामे अप्रतिम आहेत...पॉपीला जेंव्हा अंधर कोठडित ठेवतात त्या वेळी तो जे किडे खावुन जिवंत रहातो ते प्रसंग अतिशय अप्रतिम आहेत..तसेच त्याला जे भास होतात त्याचे चित्रीकरण खुप परीणाम कारक आहेत..महारोग्याकडुन नाव भाड्याने घेवुन सुटकेचा केलेला प्रयत्न..तसेच तो गे जेलर ..त्याने पॉपीच्या मित्रावर केलेला अत्याचार सारेच खुप परिणाम कारक आहे..स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट होता..हा सिनेमा खुप बघण्या जोगा आहे..व त्याचि कॅसेट/सी.डी मिळाली तर जरुर बघा....हा विषय वाचल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.........
10 Feb 2009 - 4:47 pm | ढ
अहो निदान आवडत्या नटाचं नाव तरी माहिती हवं की नको?
हा मॅकलिन कुठून काढलात?
9 Feb 2009 - 10:04 pm | सिद्धेश
मी रविन्द्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद वाचला आहे. पण त्याच्याशी तुलना केली तर आपल्या तात्याराव सावरकरांचे अंदमानातील जीवन अधिक कठीण आणि आव्हानात्मक होते.
10 Feb 2009 - 12:07 am | हरकाम्या
शिळ्या कधिला उत का आणावा ??
10 Feb 2009 - 4:02 am | विंजिनेर
पॅपीलॉन त्याच्या सुटकेनंतर काही वर्षे एक सूड-भावनेने भारलेला असा माणूस होता. त्याला 'आपण स्वतःच्या आयुष्यातल्या वाया गेलेल्या ८ वर्षांचा जाब फ्रान्स मधल्या वकिलाला कधी विचारयतोय..' ह्या प्रश्नाशिवाय काहीही समोर दिसत नव्हते. ह्याच भावनेचा एक भाग म्हणून तो इंडियन जमातीतील मुली, कॅरॅकस मधली इंदिरा ह्यांचा त्याग करुन फ्रान्सच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपण आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणार्या ह्या सर्व लोकांना सोडून जातो आहोत ह्याची त्याला निश्चितच खंत वाटत राहते. अपराधी पणाची भावनाही असतेच.
शेवटी तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते.
हा सगळा मानसिक संघर्ष कादंबरीच्या उत्तरार्धात आहे. (वाचा, बँको: - अनुवाद रविंद्र गुर्जर,बहुदा मॅजेस्टिक प्रकाशन)
पण माझ्यामते तो या सर्वांना पुन्हा भेटत नाही.
अजून एक म्हणजे पॅपिलॉन हा निर्दोष असतो. ह्याचा विस्तार बँको मधे आला आहे.
10 Feb 2009 - 4:53 pm | पाषाणभेद
"तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते."
हो, पण त्याच्या आधिच्या आयुष्यात त्याला हे प्रेम मिळाले होतेच की .
-( सणकी )पाषाणभेद
15 Feb 2011 - 11:12 am | सविता
आता ही त्या माणसाची कथा आहे... खरी खुरी घडलेली... तेव्हा त्याच्या मनात काय काय विचार आले होते...त्याने काय केले...का केले. हे सांगायला आता तो जिवंत नाही...
मग आपण फक्त तर्क करून काय उपयोग?
दुर्दम्य इच्छाशक्ती...त्यावर अशक्य वाटणार्या गोष्टी करणे... हेच त्या पुस्तकातून घेण्यासारखे आहे!
15 Feb 2011 - 2:58 pm | गणेशा
पॅपीलॉन हे माझे एक आवडते पुस्तक ... खुप सुंदर आहे.
बँको अजुन वाचले नाहिये.. .. परिक्षण ही केले होते मी याचे देयिन नंतर ..
जमल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो ..
15 Feb 2011 - 3:15 pm | गणेशा
--> माणुस हा स्वतंत्रता प्रिय प्राणि आहे.. रेड- इंडियन्स मधील काळ खुप छान लिहिलेला आहे, तुम्हाला जो प्रश्न पडला तसाच मला ही पडला होता. कोणीही तेथे असते तर तेथेच मजा उपभोगत राहिले असते असे मला ही वाटले होते, अगदी मी जरी असतो तरी तेथुन पुढे कश्यासाठी निघुन जायचे हे वाटलेच असते,
पण तेथेही पॅपिलॉन चे मन जास्त रमले होते असे माणता येणार नाही, तो माणसिक रित्या गुंतला हे मान्य, पण त्या २ बायका आणि बाहेरील मुक्त जग यामधेय कदाचीत त्याला बाहेरील मुक्त जग जास्त समाधान कारक आणि स्वतंत्रतेची नवी दिशा वाटली असावी
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
--> शांत , अनिभिज्ञ जीणे जगणे हा माणसाचा स्वभाव नसतो .... त्याला नेहमी प्रकाशझोतात जगणे आवडते...
कायम पैसा मिळाला.. कायम जेवन मिळाले .. सोबत एक मुलगी मिळाली म्हणुन आयुष्यभर कोणी त्रयस्थ ठिकाणी अलिप्त इतर जगापासुन लपुन राहु शकत नाही.. आणि हाच एक मुद्दा आहे तो रेड - इंडियन टोळीत न्गिघुन गेला ते.
हे २-३ प्र्शन्च पॅपिलॉन च्या पहिल्या पुस्तकाप्रमाणे आहे असे वाटते त्याचा पुढचा भाग अजुन वाचला नाही म्हणुन जास्त लिहु श्कलो नाही.
परंतु तो इतरांचा आदर करीत असला तरी तो भावनेच्या आहारी न जाणारा होता म्हणुन त्याचे निर्णय कसे ही असले तरी त्याने स्वता घेतले .. रेड इंडियन्स बायका कीतीही प्रेमळ असल्या तरी त्यांना वाईट हेतुने वागनुक न देता तो सरळ निघतो तेथुन जायला.. भावनांचा आदर तर आहेच पण आहारी पणा नाही..
बाकी त्याने योग्य केले का.. असे नको करायला होते .. हे शब्दबद्द असणार्या आत्मवृतावरुन वाटते.. प्रत्येक्षात एक एक दिवस कसले कसले विचार येत असतील .. बायका दुर समुद्रावर गेल्या तर काय विचार येत असतील असे बारीक सारीक विचार हे जीवन प्रत्यक्षात जगतानाच येतात .. आणि ते शब्दबद्द करणे अवघद गेले असेन..
तरीही पुस्तक अप्रतिम .. सिनेमा आहे यावर हे माहितीच नव्हते मला अजुनतरी
15 Feb 2011 - 3:35 pm | स्वाती दिनेश
पॅपिलॉनची पारायणे केलीत, त्याचाच दुसरा भाग- बँको .
सिनेमा पाहिलेला नाही, आता वरचे प्रतिसाद वाचून बघावासा वाटतो आहे.
पाभेंना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मलाही होते, रेड इंडियन टोळीत शांत जीवन तो जगू शकला असता पण मला वाटतं त्याच्यातला साहसी भटक्या बाहेर आला असावा आणि त्यामुळे टोळी सोडून तो परत मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडला असावा,
स्वाती
15 Feb 2011 - 7:08 pm | रेवती
पॅपिलॉन पुस्तक छानच आहे. सिनेमात ते सगळे संदर्भ चित्रित करणे शक्य नाही हे समजून घेतले.
तसा बरा आहे सिनेमा पण पुस्तक वाचताना जी भव्यता अनुभवायला मिळते ती सिनेमा पाहताना अनुभवता येत नाही.
तुरुंगात रहात असलेले क्रूर कैदी मात्र पुस्तकाप्रमाणे बरोबर आहेत.
वर दिलेले प्रश्न वाचून वाटले की त्याचा स्वभाव एकाच गोष्टीला धरून राहण्याचा नसावा.
एकदा जुने आयुष्य सोडल्यावर पुन्हा तेथे गेल्यास पकडले जाण्याची शक्यता जास्त.
आपल्या दृष्टीकोनातून वडीलांचे, बायकोचे प्रेम जे आहे तो दृष्टीकोन इतर देशात नाही.
कधीही न पाहिलेल्या रेड इंडीयन मुलाबद्दल त्याला नुसते वाईट वाटण्यापलिकडे काही होणार नाही.
त्या मुलाला भेटाययला जावे असे वाटेपर्यंत पॅपिलॉनच्या आयुष्ञात बरीच उलथापालथ झालेली असणार.
तो आधीपासूनच काही सज्जन माणूस नसतो. फक्त यावेळी न केलेल्या खुनासाठी पकडला जातो एवढेच.
अशा लोकांच्या भविष्ञाबद्दल त्यांचे नातेवाईक किती अपेक्षा ठेवत असतील? फारशी नाहीच.
जोवर आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आहे नाहीतर मेला असे समजत असतील.
15 Feb 2011 - 8:39 pm | गणेशा
पटते आहे.
16 Feb 2011 - 10:46 am | पाषाणभेद
पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको' वाचलाय. लवकरच लिहीतो (वेळ मिळाल्यास).
'केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत', या एका वाक्यात त्याच्या वागणूकीची तर्हा वर्णन केली जावू शकते.
दुसर्या भागात याचा ठळक पुरावाच मिळतो.
13 Jul 2011 - 11:35 am | आत्मशून्य
बाकी साह्स देव आहे या पॉपीलोन मधील वाक्याने आयूष्याचा फार मोठा कालखंड झपाटला होता.....
हे पटत नाही त्याने जसं कश्ट भोगले तसे उपभोग घेतलेच फक्त त्यात तो कधी अड्कून राहीला नाही इतकचं. आणी बँकोचा शेवट बरच काही बोलून जातो.
13 Jul 2011 - 12:24 pm | आत्मशून्य
यावर स्वतंत्र लेख लिहायचा विचार असल्याने प्रतीसाद काढून टाकला आहे.
13 Jul 2011 - 2:44 pm | मालोजीराव
तुमच्या सर्व प्रश्नांचं हेच कदाचित उत्तर असावं !
- मालोजीराव
13 Jul 2011 - 2:49 pm | अनुरोध
माला वटते ही एक उत्तम आत्मकथा आहे. आनि शेवटी कोन कुठे आनन्दात राहु शकतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपले विचार मानडावेत पण दुसर्यालाहि त्याचा स्विकार आसवा असा अट्टहास असु नये (हा पन आमचा विचार...)
याचे उत्तर कदचित हेन्ररि 'मेरे मन को भाया मै कुत्ता कात के खाया' असेहि देउ शकेल. ;)
बाकी कुनाला दुखावन्याचा हेतु नाहि.
पुस्तक एकदम आवडले बुवा आपल्याला.
21 Apr 2014 - 12:52 pm | कपिलमुनी
लेख अणि प्रतिसाद आवडले
21 Apr 2014 - 2:41 pm | आशु जोग
कुठल्याही लहान मुलाला सुद्धा हे पुस्तक वाचल्यावर हेच प्रश्न पडू शकतात
मलाही ते पडले होते... भ्रमणगाथेमधेही काही प्रसंग असेच आहेत, नर्मदे हर मधेही हाच प्रकार आहे
सत्यतेबद्दल शंका निर्माण होतात
21 Apr 2014 - 9:46 pm | आदूबाळ
+१
नर्मदे हर वाचून बरीच वर्षं झाली, पण असे प्रश्न नक्कीच पडल्याचं आठवतंय. कुंट्यांचा भाचा मित्र आहे. त्याला ते प्रश्न जरा भीतभीतच विचारले. त्याने "हे बघ, मामा भंपक आहे. तू त्याच्याशीच बोल" असं सांगून टाकलं. माझी उत्सुकता तेवढी उत्कट नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही...
22 Apr 2014 - 9:18 am | यशोधरा
आदूबाळ, तुम्ही नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा हे भारती ठाकुरांचे पुस्तक जरुर वाचा. सुरेख पुस्तक आहे. कदाचित तुमेहे वाचलेही असेल.
22 Apr 2014 - 12:23 pm | आदूबाळ
वाचतो. धन्यवाद.
21 Apr 2014 - 8:33 pm | बोबो
चांगली चर्चा आहे. पण ज्यांनी पुस्तक वाचले नाही किंवा चित्रपट पहिला नाही त्यांच्यासाठी Spoiler Alert टाकलेत तर बरं होईल
22 Apr 2014 - 2:08 am | आत्मशून्य
इट इज लुजर्स अटीट्युड. इट्स नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल.
इट इज अ लुजर्स अटीट्युड. हिस अड्वेंचर इस नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल, इट्स अबोट पनिशींग दा गिल्टी पिपॉल.
निट आठवत नाही, पण बहुदा सिक्योरीटी हेच रिजन आहे.***
तो तिथे अधिकृत गुन्हेगार आहे म्हणुन.
मनाची शांती मिळत नाही तोपर्यंत अटलांटीसही मानवत नाही.
अतिशय दिशाभुल करणारे स्क्रिप्ट, कचरा दिग्दर्शन अभिनय आणी पुस्तकाची प्रचंड तोड्फोड व इसेंन्स गमावलेला तो एक रद्दड चित्रपट आहे. त्यातुन काहीच पैसा मिळाला नसावा.
बिंगो. त्याने काही थापा मारल्या आहेत असेच बरेच लोक म्हणतात. (तरीही साहकथा म्हणुन पॉपीलॉन हे सर्वोत्तम असेच वैयक्तीक मत आहे)
वाटणे आणी जमणे यात एका दिर्घ प्रवासाचे अंतर असते.(त्यातुन काही शिकता आले तरच)
गुड क्वेश्चन.
उद्देशाने तिव्र झपाटलेल्या व्यक्ती प्रेम न्हवे, सहकार्य करणारे लक्शात घेतात. यांच्या पुस्तकात प्रेम हा सगळ्यात शेवटचा चॅप्टर असतो.