ढकलपत्रातून आलेल्या काही छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली.
कोल्हापूरजवळ हे मेणाच्या पुतळ्यांचं एवढं सम्रुद्ध विश्व? आहे कुठे बुवा हे नेमकं?
बरं, ढकलपत्रं तयार करणार्या आणि तशीच पुढे पाठवणार्यांना या मूळ संकल्पनेचे जनक कोण, याचं कुणालाच सोयरसुतक नसतं. हे कुणाल विचारावं, याचा विचार करताना `मिपा'ची आठवण आली.
तुम्ही कुणी पाहिलंय का हे ठिकाण? कुठे आहे ते नेमकं??
प्रतिक्रिया
2 Feb 2009 - 11:25 am | दशानन
अरे जबरदस्त !
माहीतच नव्हते कोल्हापुरात असलं काही म्युजियम आहे ते !
सिध्दगिरी म्हणजे कागल जवळचेच !
हा त्यांचा पत्ता !
Shree Kshtra Sidhdhagiri Math,
At post Kaneri,
Taluka Karvir,
Kolhapur -416001.
Tel 0231 2672380
पुढच्या कोल्हापुर भेटीत अजून एक ठीकाण भेट द्यायला ;)
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
2 Feb 2009 - 11:21 am | विंजिनेर
अधिक माहिती इथे सापडेल:
2 Feb 2009 - 11:49 am | आनंद घारे
छान स्थळ आहे. वर दिलेल्या पत्त्यावर सापडले नाही. इथे मिळाले.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
2 Feb 2009 - 11:19 am | प्रभाकर पेठकर
हे सिद्धगिरी म्युझिअम आहे.
मेणाच्या पुतण्यांचं
'पुतण्यांचं' नाही 'पुतळ्यांचं' म्युझिअम आहे ते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
2 Feb 2009 - 11:21 am | दशानन
=))
काका हे म्युजियम आहे हे फोटो वरील लोगो पाहील्यावरच आम्हाला पण कळाले होते पण हे कुठे आहे हे माहीत नाही म्हणून शोधाशोध चालू केली ;)
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
2 Feb 2009 - 6:25 pm | आपला अभिजित
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.
पण
सिद्धगिरी - कोल्हापुर.
नाही बरं का! कोल्हापूर आहे ते!
2 Feb 2009 - 11:27 am | प्राची
आमच्या गावी हे सगळं प्रत्यक्ष बघायला मिळतं....
गावाची सैर करून आणल्याबद्दल आभारी आहे. :)
2 Feb 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुंदर आहे हे संग्रहालय !
आपल्या संस्कृतीची फार छान ओळख करुन दिली आहे. कोल्हापुरला असताना गेल्या वर्षी बघण्याचा योग आला होता हा अप्रतीम ठेवा :)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
2 Feb 2009 - 4:02 pm | विसोबा खेचर
माहितीपूर्ण धागा..! सुंदर कलाकारी...
अवांतर परंतु महत्वाचे -
ढकलपत्रातून आलेला मजकूर अथवा चित्रे मिपावर प्रसिद्ध करणे मिपाच्या धोरणात बसत नाही. तरीही मिपाच्या घोरणातील,
एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.
या कलमाचा आधार घेऊन सदर धागा अपवादात्मक परिस्थितीत येथेच ठेवण्यात येत आहे..
तात्या.
2 Feb 2009 - 8:19 pm | प्राजु
कणेरी मठात नव्याने चालू झालेले हे ओपन हाऊस म्युझिअम आहे. अप्रतिम आहे असे ऐकिवात आहे. आता कोल्हापूरला गेले की नक्की पाहणार आहे हे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Feb 2009 - 8:53 pm | मीनल
कुणी जाऊन आलेल असेल तर अधिक माहिती द्या.
कोल्हापूर मंदिरापासून कस जायच? किती वेळ लागतो जायला आणि ते ओपन हाऊस म्युझिअम पहायला? अजून तिथे काय काय आहे पहाण्यासारख?
सोल( =सेऊल)कोरिआ मधे ही अशी लोकल लाईफ दाखवणारी म्युझिअम आहेत. अगदी पाहण्यासारखी आहेत. पुतळे मातीचे.पण कपडे खरे खुरे.
जिवंत वाटतात. लंडन मधल्या मॅड्म तोसा च्या व्हॅक्स म्युझिअम पेक्षा किती तरी प्रतीने चांगली आहेत ती.
कोल्हापूरचे ही छान वाटते आहे.
मीनल.
2 Feb 2009 - 10:42 pm | आपला अभिजित
सोल( =सेऊल)कोरिआ मधे ही अशी लोकल लाईफ दाखवणारी म्युझिअम आहेत. अगदी पाहण्यासारखी आहेत.
पुढच्या वेळी (म्हणजे पहिल्यांदाच!) सोलला येऊ, तेव्हा तुमच्याकडेच मुक्काम ठोकू म्हणतो ८ दिवस! चालेल ना?
`सोल'कढी पण फेमस आहे म्हणे तुमची!!
3 Feb 2009 - 6:18 am | मीनल
Seoul चा उच्चार ब-याचदा `सेऊल `करतात.पण कोरिआत तो `सोल` म्हणूनच करतात.
सोलचे `किमची ` kimcheeनामक लोणच फेमस बर का!
मी `सोल` पहायला गेले होते तेव्हा खाल्ले होते.
मी सोल ( सेऊल )मधे राहत नाही भाऊ.
पण अमेरिकेत आलात तर सुस्वागतम.
सोल कढी करू की .त्यात काय एवढ?
मीनल.
3 Feb 2009 - 11:28 am | आनंद घारे
पण अमेरिकेत आलात तर सुस्वागतम.
मीनलताईंचं आदरातिथ्य मात्र एकदम झकास असतं, अमेरिकेतल्या भाषेत सांगायचं झालं तर 'अल्टिमेट'.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
2 Feb 2009 - 9:52 pm | शितल
मला तर माहितीच नव्हती कोल्हापूरात हे आहे ते.
धन्यवाद अभिजीत. :)
4 Feb 2009 - 9:33 pm | विनायक पाचलग
हा धागा उघडलात ते ठिक आहे ही कलाकुसर माझ्या माहितीप्रमाणे सीमेंट्मधील आहे असो ते पहायला नकी कोल्हापुरात या आणि ते पाहिल्यावर आम्च्या घरी पाहुणचाराला या
बाकी हे ढकलपत्र आम्हास ६ ७ दा आले होते आमच्याकडे आहेदेखील पण एक प्रश्न असा आहे की हे फोटो अधिक्रुत असेल तर ठिक आणि तसे नसेल व कोणी लोगो तयार केले असेल तर माझी विनंती आहे की हा धागा लवकरात लवकर उडवा कारण त्याठिकाणी आत कॅमेरा न्यायला परवानगी नाही तेव्हा हे चोरुन काढलेल असु शकतात लेखकाने खुलासा करावा
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले