अतिशय सुंदर उतरलाय. शेयर बाजारातील घोटाळे याचा इतिहास व त्याची सुधारीत आवृती पुनरावृत्ती ही मानवी सुपीक डोके कसे चालते त्याची मस्त झलक.
शिवाय हे घोटाळे होणार असा सुर असला तरी आजवरच्या घोटाळ्यांवरची ठिसुळ कारवाई मात्र भारताच्या लौकीकास साजेशी नाही. राज्यकर्ते व कायदा सुव्यवस्था अतिशय अपयशी ठरली आहे. :-( एका चोराला दुसरा चोरच चांगला समजु शकतो त्या न्यायाने ज्या लोकांनी घोटाळे केले त्यांनाच आता ही व्यवस्था सांभाळायला द्यावी काय अशी परिस्थीती आहे.
ब्रेकिंग न्युज चा बाजार होतो. एका घोटाळ्याचा कंटाळा आला की नवा घोटाळा हीट होतो. प्रश्न कुठलाच मार्गी लागत नाही.
सत्यमचा घोटाळा म्हणजे जे काही नाही ते वाढवुन त्यानी दाखवले आहे त्यालाच हा घोटाळा म्हटले गेले आहे. परंतु आपले सरकार हा घोटाळा ८ वर्षापासुन चालु आहेत त्याबद्दल डोळे झाकुन बसले होते काय?. २००३च्या आसपास सत्यम मध्ये घोटाळा चालु आहे अशी लेखी तक्रार रामदास आठवले ह्यानी सेबी व लोकसभेत केली होती ( होय महाराष्ट्रातील रिपब्लिकन खासदार) पण त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही.गेली दोन वर्षापासुन राजु व त्याचे सहकारी आपल्या वाटणीचे सत्यमचे शेअर मार्केट मध्ये चढ्या किंमतीत विकत असताना सेबी काय करत होती?परंतु सत्यम कडे ५५०० कोटी शिल्लक नसताना आपण ते शिल्लक असलेले दाखवले असे राजु म्हणतो त्यावर विश्वास कसा ठेवायचा?कारण मेतास ह्या राजुच्या मुलाच्या कंपनीने जवळ जवळ ४००० कोटीची जमीन हैद्राबाद,नागपुर,विशाखापट्ट्णम इत्यादी शहरात विकत घेतली आहे. त्याला अर्थपुरवठा कोणी केला?निव्वळ ४% शेअर असताना तो सत्यमचा मालक कसा बनला हे देखिल आज कोणी विचारत नाही. खरे तर सत्यमची लुट करुन राजुने स्वःताची तुंबडी अगोदरच भरुन ठेवली आहे.आता त्याने ५५००० कर्मचार्याना वार्यावर सोडले आहे.
ह्या सर्व घोटाळ्यासाठी जेव्हढा राजु जबाबदार आहे तेव्हढेच आपले सरकार पण आहे.एकाद्या कंपनीची एकदम भरभराट होत आहे हे सत्य न मानता त्यात नेमके काय घडत आहे ह्याची चौकशी सेबीने नियमित करायला हवी होती.अशीच चौकशी रिलायन्स पॉवर बाबत करता येवु शकते.काही कंपन्या कुत्र्याच्या छत्री सारख्या उगवतात व घोटाळा करुन बंद पडतात हे थांबायला हवे. मधल्या काळात बीएसई मध्ये एक कंपनी गोवा टाएर नावाने सुरु झाली व त्याचा समभाग वाढल्यावर बंद पडली. सदर कंपनीचे ऑफिस बघितल्या नंतर धक्का बसला. कारण महामार्गावर ५/७ हजार स्वे. फुटात एक छप्पर उभे होते व आसपास सगळया तुटक्या टाएर पडल्या होत्या. व एका पत्र्यावर नाव होते गोवा टाएर लि. त्यामुळे अशा फसव्या नावापासुन सर्व सामान्य गुंतवणुकीदाराने पण सावध राहला हवे.५०० रुपयेचा सत्यम ५.८५ ला आला ह्यात सामान्य लोकांचे किती पैसे गेले ह्याचा जर विचार केला तर डोके फिरते.माझ्या एका मित्राने सत्यम १२० झाला म्हणुन १५०० विकत घेतले व लाखाचे बारा हजार करणे ही म्हण मला खरी करुन दाखवली.सदर लेखाची लिन्क दिल्याबद्दल रामदासाचे मी आभार मानतो.
वेताळ
बाजारात मंदी आल्यावर आपल्या हर्षद मेहता, इ. महाभाग आठवतात.
माझ्या मते, हे सर्व महाभाग प्रातःस्मरणीय आहेत.
म्हणजे असे की सकाळी बाजार उघडताना, ह्यांचे स्मरण करावे, व गुंतवणूकीतल्या चुका टाळाव्यात.
अतिशय सुंदर असा लेख. खुपच आवडला. घोटाळे कसे सहजपणे केले जातात ते अतिशय साध्या आणी सोप्या शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद.
परिकथेतील राजु
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
उत्तम अभ्यासपूर्ण लेख. सोप्या भाषेत अर्थिक घोटाळ्यांचे अनेक पैलू दाखवलेत. फारच छान.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
अनेक उदाहरणे देऊन तुम्ही लेखन फुलवले आहे. घोटाळ्यांचा मोठा इतिहासही लिहिला आहे.
पण तरीही माझ्या मनातल्या शंका निरसन होत नाहीत - तुमच्या लेखातली वाक्ये तिरप्या अक्षरात - त्या पुढे शंका -
१ - सप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक - हे ते कसं करु शकतात? म्हणजे कोणीच त्यावर ऑब्जेक्शन कसं घेत नाही? आणि फुगवून सांगितलेल्या शिलकीचा प्रत्यक्षात काय फायदा?
२ - त्या शिल्लकीवरचं खोटं व्याज - पुन्हा वरीलप्रमाणेच प्रश्न
३ - बाराशे कोटी रुपयांची न सांगितलेली तूट. - ऑडीटर्सचं काम काय असतं? त्यांना इथे विकत घेतलं जातं का फसवलं जातं? असलं तर त्याची पद्धती काय असू शकते?
४ - दोन हजार कोटींची न येणारी वसुली. - ह्यांची माहिती कंपनीतल्यां व्यतिरिक्त कोणाकडे असते?
५ - गुंतवणुकीवर चढवून फुगवून लिहिलेला परतावा. परतावा २४ टक्के असल्याचा दावा. पण प्रत्यक्षात ३ ते ४ टक्के. - एवढा मोठा फरक परताव्यात असताना कोणाला समजू शकत नाही ते ?अशा अतर्क्य बाबी कशा घडू शकतात?
ह्या सगळ्या प्रकाराने मला असे वाटू लागले आहे की संपूर्ण शेअरबाजाराच्या मूलभूत व्यवस्थेमधेच काहीतरी अमूलाग्र बदल होणे गरजेचे असावे. ज्यावेळी सेअरबाजार हा प्रकार अस्तित्वात आला त्यावेळी बर्याच गोष्टी ह्या विश्वासावर आधारित अशा बनवल्या गेलेल्या असाव्यात. ज्यात कालापरत्वे बदल अपेक्षित होता/आहे. पण तसा बदल झाला नसावा कारण कंपन्यांचे ताळेबंद तपासणारे ऑडीटर्स, मार्केटवर नियंत्रण ठेवू असे म्हणणारे सेबीसारखे घटक हे सगळे वरवरची मलमपट्टी वाटतात. मू़ळ प्रश्न फारच मूलभूत आणि रचनात्मक असावा की वर्षानुवर्षे ज्याचा फायदा धूर्त मंडळी घेत आलेली आहेत. आणि असा मूलभूत बदल जोवर होत नाही तोवर गुंतवणूकदार नागवले जात रहाणार.
सिस्टिम मधे अमूलाग्र बदल करायचा म्हटला तर तुमच्या अभ्यासानुसार काय काय बदलावे लागेल असे तुम्हाला वाटते?
या सगळ्या गोष्टी स्टाफला माहीती असतातच.चार पाच हजार कोटीचे हिशोब चार पाच माणसं लिहू शकत नाहीत.आता सत्यम काय किंवा भन्साळी काय लालूच दाखवून काम करून घेतात.उदा: सी. आर. भन्साळींनी इश्यु न केलेल्या शेअर्सवर डिव्हीडंड वॉरंट्स बनवली होती. आता कल्पना करा हे काम एकट्यानी करणे शक्य आहे का.? सत्यमच्या केस मध्येदोन हजार कोटींची न येणारी वसुली. - म्हणजे आलेले पण बँकेकडे न पाठवलेले चेक.असा खुलासा येईल.फुगवून सांगीतलेली रक्कम म्हणजे सादर केलेले पण न वटलेले चेकसप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक
अशी लिपापोती करण्यासाठी स्टाफला भाग पाडलं जातं.पण कार्यालयीन मदतीशिवाय हे होणं शक्य नसतं.
फौज वेगवेगळ्या ठिकाणी असल्याशिवाय असले पालथे धंदे शक्य नाहीत! आणि अशी माणसे इतक्या मोठ्या प्रमाणावर सिस्टिममधे आहेत तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आरडाओरडा दाबला जाणार हे उघड.
म्हणजे बहुतेक ठिकाणी कुंपणच शेत खातं असा प्रकार दिसतो.
चतुरंग यांच्या शंका आणि त्यावरील रामदास यांची उत्तरे वाचनीय. परंत्य एक शंका अद्याप अनुत्तरीतच राहते - फुगवून सांगितलेल्या शिलकीचा प्रत्यक्षात काय फायदा?
याची साधारणतः अशी कारणे देता येतील की, कंपनीची तब्येत ठीकठाक दाखवून अधिक प्रोजेक्ट्स, शेअरचे चढे भाव इ. गोष्टी करता येतात. पण हे सर्व कधी ना कधी उघडकीस येणार असतेच. पैशाचे सोंग कसे आणता येईल?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अगदी बरोबर! कुठे तरी प्रत्यक्ष पैसा चलन ह्या स्वरुपात सिस्टिममधे हवाच. अमेरिकन अर्थव्यवस्थेचे कडबोळे होण्यामधे अशाच फुगवून दाखवलेल्या पैशाचा हात आहेच हे विसरता कामा नये.
सूज आली की ती व्यवस्थेला आजारी पाडतेच!
लेख छान असल्याचे वरच सांगेतले आहे
पण विशेश अभिनंदन यासाठी की एवढा अवजड विषय कोठेही रटाळ न होता सांगीतला आहे
त्यामुळॅ वाचताना बोअर होत नाही जे सहसा अशे लेख वाचताना होते
विशेष अभिनंदन
लोकप्रभासारख्या आघाडीच्या पाक्षिकात सध्याच्या एका ज्वलंत विषयावर आपला अभ्यासपूर्ण लेख अग्रक्रमात यावा याबद्दल एक मिपासदस्य या नात्याने आपले खरोखरच कौतुक वाटले..!
(पण खाजगी कंपन्यांचे नियंत्रण करावे हा शेवटचा बोध फारच थोडक्यात दिला आहे. नियंत्रण करणारे गोमा गणेश तर निघणार नाहीत ना? असा प्रश्न वाचकाच्या मनाला चाटून जाऊ शकेल. आधीलपैकी एखादी मस्त कथा छाटून हा "पुढे-कसे"चा भाग अधिक मुद्दे देऊन प्रभावी करता आला असता, असे वाटते.)
मी एका वेगळ्या चर्चेत उपस्थित केलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. फक्त फुगवलेल्या नफ्यावर कर कसा भरला असेल ते समजले नाही. कदाचित कर चुकवण्याच्या पळवाटा वापरल्या गेल्या असतील. आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
मला तर ताळेब.न्द फुगवले आहेत हेच पटत नाही... सगळे पैसे खाऊन झाल्यावर आता ते परत करायची कटकट नको म्हणून तिथे पैसे नव्हतेच असे सान्गण्याचा हा प्लॅन वाटतो आहे... आता गुन्हा साबीत झाला तर शिक्शा होइल, पण पैसे भरावे लागणार नाहीत, कारण ते नव्हतेच अस प्रतिज्ञापत्र दिलेले आहेच.... धूळ्फेक आहे ही... कायद्याचा आधार घेऊन केलेली...
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 8:57 am | अवलिया
रामदास शेठ,
लेख वाचला. अतिशय उत्तम लेख आहे.
असेच लिहित रहा. शुभेच्छा !!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 9:14 am | मदनबाण
अगदी असेच म्हणतो..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
16 Jan 2009 - 9:51 am | सखाराम_गटणे™
मी पण वाचला.
चांगला आहे. बर्याच घोटाळ्यांची माहीती आहे.
पेशवाई तील कथा आठवली.
पण त्या माणसाला कामावरुन कमी का नाही केले??
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
16 Jan 2009 - 9:36 am | बिपिन कार्यकर्ते
छानच लेख. साध्या साध्या उदाहरणातून आणि अवतरणांतून सामान्य वाचकाला नीट समजेल असं लिहिलंय. लेख शेवटपर्यंत आपोआप वाचला गेला.
बिपिन कार्यकर्ते
16 Jan 2009 - 9:37 am | प्रमोद देव
रामदास ह्यांचे अभिनंदन. लेख अतिशय सुरेख उतरलाय.
16 Jan 2009 - 9:53 am | विकास
आत्ताच लेख वाचला. माहीतीपूर्ण असल्याने, एकदम आवडला.
16 Jan 2009 - 9:57 am | सहज
अतिशय सुंदर उतरलाय. शेयर बाजारातील घोटाळे याचा इतिहास व त्याची सुधारीत आवृती पुनरावृत्ती ही मानवी सुपीक डोके कसे चालते त्याची मस्त झलक.
शिवाय हे घोटाळे होणार असा सुर असला तरी आजवरच्या घोटाळ्यांवरची ठिसुळ कारवाई मात्र भारताच्या लौकीकास साजेशी नाही. राज्यकर्ते व कायदा सुव्यवस्था अतिशय अपयशी ठरली आहे. :-( एका चोराला दुसरा चोरच चांगला समजु शकतो त्या न्यायाने ज्या लोकांनी घोटाळे केले त्यांनाच आता ही व्यवस्था सांभाळायला द्यावी काय अशी परिस्थीती आहे.
ब्रेकिंग न्युज चा बाजार होतो. एका घोटाळ्याचा कंटाळा आला की नवा घोटाळा हीट होतो. प्रश्न कुठलाच मार्गी लागत नाही.
16 Jan 2009 - 10:07 am | विनायक पाचलग
तुम्हाला पटणार नाही पण मी आताच सर्व लोकप्रभा वाचौन आलो आहे (घरी येते आमच्या)
खुप छान लिहिला आहे लेख
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
18 Jan 2009 - 11:39 am | कोलबेर
तुमच्या घरी लोकप्रभा येते आणि तुम्ही ते वाचता ह्यात न पटण्यासारखे काय आहे?
18 Jan 2009 - 12:03 pm | विनायक पाचलग
नाही हो आम्ही ऑनलाईन वाचत नाही
असे सांगायचे होते/
असो
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 10:22 am | घाटावरचे भट
उत्तम लेख आहे.
16 Jan 2009 - 10:50 am | चित्रा
खूपच उत्तम लेख, आणि वाचनीय आहे. आढावा खूप खोलात जाऊन घेतला आहे. आणि त्यामुळे बर्याच गोष्टींच्या आठवणी ताज्या झाल्या. हर्षद मेहता विशेषकरून.
16 Jan 2009 - 10:53 am | वेताळ
सत्यमचा घोटाळा म्हणजे जे काही नाही ते वाढवुन त्यानी दाखवले आहे त्यालाच हा घोटाळा म्हटले गेले आहे. परंतु आपले सरकार हा घोटाळा ८ वर्षापासुन चालु आहेत त्याबद्दल डोळे झाकुन बसले होते काय?. २००३च्या आसपास सत्यम मध्ये घोटाळा चालु आहे अशी लेखी तक्रार रामदास आठवले ह्यानी सेबी व लोकसभेत केली होती ( होय महाराष्ट्रातील रिपब्लिकन खासदार) पण त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही.गेली दोन वर्षापासुन राजु व त्याचे सहकारी आपल्या वाटणीचे सत्यमचे शेअर मार्केट मध्ये चढ्या किंमतीत विकत असताना सेबी काय करत होती?परंतु सत्यम कडे ५५०० कोटी शिल्लक नसताना आपण ते शिल्लक असलेले दाखवले असे राजु म्हणतो त्यावर विश्वास कसा ठेवायचा?कारण मेतास ह्या राजुच्या मुलाच्या कंपनीने जवळ जवळ ४००० कोटीची जमीन हैद्राबाद,नागपुर,विशाखापट्ट्णम इत्यादी शहरात विकत घेतली आहे. त्याला अर्थपुरवठा कोणी केला?निव्वळ ४% शेअर असताना तो सत्यमचा मालक कसा बनला हे देखिल आज कोणी विचारत नाही. खरे तर सत्यमची लुट करुन राजुने स्वःताची तुंबडी अगोदरच भरुन ठेवली आहे.आता त्याने ५५००० कर्मचार्याना वार्यावर सोडले आहे.
ह्या सर्व घोटाळ्यासाठी जेव्हढा राजु जबाबदार आहे तेव्हढेच आपले सरकार पण आहे.एकाद्या कंपनीची एकदम भरभराट होत आहे हे सत्य न मानता त्यात नेमके काय घडत आहे ह्याची चौकशी सेबीने नियमित करायला हवी होती.अशीच चौकशी रिलायन्स पॉवर बाबत करता येवु शकते.काही कंपन्या कुत्र्याच्या छत्री सारख्या उगवतात व घोटाळा करुन बंद पडतात हे थांबायला हवे. मधल्या काळात बीएसई मध्ये एक कंपनी गोवा टाएर नावाने सुरु झाली व त्याचा समभाग वाढल्यावर बंद पडली. सदर कंपनीचे ऑफिस बघितल्या नंतर धक्का बसला. कारण महामार्गावर ५/७ हजार स्वे. फुटात एक छप्पर उभे होते व आसपास सगळया तुटक्या टाएर पडल्या होत्या. व एका पत्र्यावर नाव होते गोवा टाएर लि. त्यामुळे अशा फसव्या नावापासुन सर्व सामान्य गुंतवणुकीदाराने पण सावध राहला हवे.५०० रुपयेचा सत्यम ५.८५ ला आला ह्यात सामान्य लोकांचे किती पैसे गेले ह्याचा जर विचार केला तर डोके फिरते.माझ्या एका मित्राने सत्यम १२० झाला म्हणुन १५०० विकत घेतले व लाखाचे बारा हजार करणे ही म्हण मला खरी करुन दाखवली.सदर लेखाची लिन्क दिल्याबद्दल रामदासाचे मी आभार मानतो.
वेताळ
16 Jan 2009 - 11:06 am | संजय अभ्यंकर
असेच लिहित रहा.
बाजारात मंदी आल्यावर आपल्या हर्षद मेहता, इ. महाभाग आठवतात.
माझ्या मते, हे सर्व महाभाग प्रातःस्मरणीय आहेत.
म्हणजे असे की सकाळी बाजार उघडताना, ह्यांचे स्मरण करावे, व गुंतवणूकीतल्या चुका टाळाव्यात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
16 Jan 2009 - 11:24 am | अभिरत भिरभि-या
भाषा सहज सोपी आहे. लेख अतिशय अभ्यासपूर्वक लिहिला आहे.
ज्ञानात भर पडली
अभिरत
16 Jan 2009 - 11:49 am | ब्रिटिश
मस्तच लीवलय
आभिनंदन
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
16 Jan 2009 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुंदर असा लेख. खुपच आवडला. घोटाळे कसे सहजपणे केले जातात ते अतिशय साध्या आणी सोप्या शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद.
परिकथेतील राजु
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
16 Jan 2009 - 3:30 pm | अविनाशकुलकर्णी
फार सुंदर व माहितिपुर्ण..आपला अभ्यास विषया बद्दल चे सखोल नोलेज वाक्या वाक्या तुन जाणवते..... अभि नंदन
अविनाश..सव्वाशेर सत्यम
16 Jan 2009 - 4:39 pm | लिखाळ
उत्तम अभ्यासपूर्ण लेख. सोप्या भाषेत अर्थिक घोटाळ्यांचे अनेक पैलू दाखवलेत. फारच छान.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
16 Jan 2009 - 5:10 pm | महेश हतोळकर
खास "रामदास" शैलीतला लेख. आशा करू, संभाव्य धोक्यांची योग्य दखल घेतली जाईल.
16 Jan 2009 - 5:55 pm | चतुरंग
अनेक उदाहरणे देऊन तुम्ही लेखन फुलवले आहे. घोटाळ्यांचा मोठा इतिहासही लिहिला आहे.
पण तरीही माझ्या मनातल्या शंका निरसन होत नाहीत - तुमच्या लेखातली वाक्ये तिरप्या अक्षरात - त्या पुढे शंका -
१ - सप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक - हे ते कसं करु शकतात? म्हणजे कोणीच त्यावर ऑब्जेक्शन कसं घेत नाही? आणि फुगवून सांगितलेल्या शिलकीचा प्रत्यक्षात काय फायदा?
२ - त्या शिल्लकीवरचं खोटं व्याज - पुन्हा वरीलप्रमाणेच प्रश्न
३ - बाराशे कोटी रुपयांची न सांगितलेली तूट. - ऑडीटर्सचं काम काय असतं? त्यांना इथे विकत घेतलं जातं का फसवलं जातं? असलं तर त्याची पद्धती काय असू शकते?
४ - दोन हजार कोटींची न येणारी वसुली. - ह्यांची माहिती कंपनीतल्यां व्यतिरिक्त कोणाकडे असते?
५ - गुंतवणुकीवर चढवून फुगवून लिहिलेला परतावा. परतावा २४ टक्के असल्याचा दावा. पण प्रत्यक्षात ३ ते ४ टक्के. - एवढा मोठा फरक परताव्यात असताना कोणाला समजू शकत नाही ते ?अशा अतर्क्य बाबी कशा घडू शकतात?
ह्या सगळ्या प्रकाराने मला असे वाटू लागले आहे की संपूर्ण शेअरबाजाराच्या मूलभूत व्यवस्थेमधेच काहीतरी अमूलाग्र बदल होणे गरजेचे असावे. ज्यावेळी सेअरबाजार हा प्रकार अस्तित्वात आला त्यावेळी बर्याच गोष्टी ह्या विश्वासावर आधारित अशा बनवल्या गेलेल्या असाव्यात. ज्यात कालापरत्वे बदल अपेक्षित होता/आहे. पण तसा बदल झाला नसावा कारण कंपन्यांचे ताळेबंद तपासणारे ऑडीटर्स, मार्केटवर नियंत्रण ठेवू असे म्हणणारे सेबीसारखे घटक हे सगळे वरवरची मलमपट्टी वाटतात. मू़ळ प्रश्न फारच मूलभूत आणि रचनात्मक असावा की वर्षानुवर्षे ज्याचा फायदा धूर्त मंडळी घेत आलेली आहेत. आणि असा मूलभूत बदल जोवर होत नाही तोवर गुंतवणूकदार नागवले जात रहाणार.
सिस्टिम मधे अमूलाग्र बदल करायचा म्हटला तर तुमच्या अभ्यासानुसार काय काय बदलावे लागेल असे तुम्हाला वाटते?
चतुरंग
16 Jan 2009 - 6:39 pm | रामदास
या सगळ्या गोष्टी स्टाफला माहीती असतातच.चार पाच हजार कोटीचे हिशोब चार पाच माणसं लिहू शकत नाहीत.आता सत्यम काय किंवा भन्साळी काय लालूच दाखवून काम करून घेतात.उदा: सी. आर. भन्साळींनी इश्यु न केलेल्या शेअर्सवर डिव्हीडंड वॉरंट्स बनवली होती. आता कल्पना करा हे काम एकट्यानी करणे शक्य आहे का.? सत्यमच्या केस मध्येदोन हजार कोटींची न येणारी वसुली. - म्हणजे आलेले पण बँकेकडे न पाठवलेले चेक.असा खुलासा येईल.फुगवून सांगीतलेली रक्कम म्हणजे सादर केलेले पण न वटलेले चेकसप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक
अशी लिपापोती करण्यासाठी स्टाफला भाग पाडलं जातं.पण कार्यालयीन मदतीशिवाय हे होणं शक्य नसतं.
16 Jan 2009 - 7:14 pm | चतुरंग
फौज वेगवेगळ्या ठिकाणी असल्याशिवाय असले पालथे धंदे शक्य नाहीत! आणि अशी माणसे इतक्या मोठ्या प्रमाणावर सिस्टिममधे आहेत तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आरडाओरडा दाबला जाणार हे उघड.
म्हणजे बहुतेक ठिकाणी कुंपणच शेत खातं असा प्रकार दिसतो.
चतुरंग
16 Jan 2009 - 7:15 pm | सुनील
उत्तम लेख.
चतुरंग यांच्या शंका आणि त्यावरील रामदास यांची उत्तरे वाचनीय. परंत्य एक शंका अद्याप अनुत्तरीतच राहते - फुगवून सांगितलेल्या शिलकीचा प्रत्यक्षात काय फायदा?
याची साधारणतः अशी कारणे देता येतील की, कंपनीची तब्येत ठीकठाक दाखवून अधिक प्रोजेक्ट्स, शेअरचे चढे भाव इ. गोष्टी करता येतात. पण हे सर्व कधी ना कधी उघडकीस येणार असतेच. पैशाचे सोंग कसे आणता येईल?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Jan 2009 - 7:29 pm | चतुरंग
अगदी बरोबर! कुठे तरी प्रत्यक्ष पैसा चलन ह्या स्वरुपात सिस्टिममधे हवाच. अमेरिकन अर्थव्यवस्थेचे कडबोळे होण्यामधे अशाच फुगवून दाखवलेल्या पैशाचा हात आहेच हे विसरता कामा नये.
सूज आली की ती व्यवस्थेला आजारी पाडतेच!
चतुरंग
16 Jan 2009 - 7:33 pm | विनायक पाचलग
लेख छान असल्याचे वरच सांगेतले आहे
पण विशेश अभिनंदन यासाठी की एवढा अवजड विषय कोठेही रटाळ न होता सांगीतला आहे
त्यामुळॅ वाचताना बोअर होत नाही जे सहसा अशे लेख वाचताना होते
विशेष अभिनंदन
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
17 Jan 2009 - 12:27 am | रामदास
राजूंनी आपले शेअर वरच्या भावात गहाण टाकले होते.तो पैसा आणखी कुठेतरी वळवला.बाकी यापैशावर कर पण भरला आहे तो नक्कीच कंपनीच्या गंगाजळीतून.
16 Jan 2009 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकप्रभातल्या लेखाबद्दल अभिनंदन !!!
लेख आवडला ! पुढेही लिहित राहा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
16 Jan 2009 - 8:22 pm | रेवती
लेख माहितीपूर्ण आहे, आवडला.
रेवती
17 Jan 2009 - 1:17 am | विसोबा खेचर
आजच हा लेख वाचला.. मस्त वाटला..!
रामदासराव,
लोकप्रभासारख्या आघाडीच्या पाक्षिकात सध्याच्या एका ज्वलंत विषयावर आपला अभ्यासपूर्ण लेख अग्रक्रमात यावा याबद्दल एक मिपासदस्य या नात्याने आपले खरोखरच कौतुक वाटले..!
तात्या.
18 Jan 2009 - 5:37 am | शंकरराव
+१ हेच म्हणतो
अतिशय अर्थपूर्ण लेख
17 Jan 2009 - 1:41 am | नंदन
लेख, अतिशय आवडला. आधी होऊन गेलेल्या घोट्याळांचे दाखले दिलेला, खास रामदास शैलीतला हा लेख सुरेख उतरला आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jan 2009 - 1:44 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
17 Jan 2009 - 4:08 am | धनंजय
हेच म्हणतो.
ऐतिहासिक घोटाळ्यांच्या कथा माहितीपूर्ण.
(पण खाजगी कंपन्यांचे नियंत्रण करावे हा शेवटचा बोध फारच थोडक्यात दिला आहे. नियंत्रण करणारे गोमा गणेश तर निघणार नाहीत ना? असा प्रश्न वाचकाच्या मनाला चाटून जाऊ शकेल. आधीलपैकी एखादी मस्त कथा छाटून हा "पुढे-कसे"चा भाग अधिक मुद्दे देऊन प्रभावी करता आला असता, असे वाटते.)
18 Jan 2009 - 9:48 am | पिवळा डांबिस
सहमत!
फॅक्टस आणि एनेक्ट्डोटस खूप मनोरंजक रीतीने मांडले आहेत....
पण त्यात आश्चर्य ते काय! रामदासस्वामींच्या हातचा मळ....
18 Jan 2009 - 5:24 am | आनंद घारे
मी एका वेगळ्या चर्चेत उपस्थित केलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. फक्त फुगवलेल्या नफ्यावर कर कसा भरला असेल ते समजले नाही. कदाचित कर चुकवण्याच्या पळवाटा वापरल्या गेल्या असतील.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
18 Jan 2009 - 12:13 pm | अभिज्ञ
रामदासजी,
अतिशय सुंदर लेख दिल्याबद्दल आपले अभिनंदन.
अभिज्ञ.
18 Jan 2009 - 7:56 pm | JAGOMOHANPYARE
मला तर ताळेब.न्द फुगवले आहेत हेच पटत नाही... सगळे पैसे खाऊन झाल्यावर आता ते परत करायची कटकट नको म्हणून तिथे पैसे नव्हतेच असे सान्गण्याचा हा प्लॅन वाटतो आहे... आता गुन्हा साबीत झाला तर शिक्शा होइल, पण पैसे भरावे लागणार नाहीत, कारण ते नव्हतेच अस प्रतिज्ञापत्र दिलेले आहेच.... धूळ्फेक आहे ही... कायद्याचा आधार घेऊन केलेली...
17 Aug 2013 - 9:00 pm | संदिप एस
लोकप्रभा ची लिंक आता valid नाहीये, हा लेख वाचायला मिळेल काय?
20 Aug 2013 - 3:42 pm | मोग्याम्बो
ती लिंक google वर सर्च करा आणि cache result मधून पहा
17 Aug 2013 - 10:42 pm | आशु जोग
पकडला गेला तो चोर अशी परस्थिती आहे.
बा द वे
निरनिराळ्या बँका गिळंकृत का होतात. अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकांमधे कर्मचार्यांना बसायला जागा नसताना नवीन भरती का करतात ?
ज्या कंपन्या पकडल्या गेल्या नाहीत त्या चोर नाहीत असे समजायचे का ?
21 Aug 2013 - 1:31 am | खटपट्या
लिन्क वरुन लेख उड्वला गेला आहे बहुतेक !
21 Aug 2013 - 9:36 am | नानबा
रामदास काका, तुम्ही दिलेली लिंक उघडली तर नॉट फाऊंड दिसतंय.
21 Aug 2013 - 9:49 am | सुबोध खरे
http://www.lokprabha.com/20090123/cover.htm
लेख उत्कृष्टच आहे
रामदास साहेब एक नम्र सूचना फ्रोड ऐवजी अफरातफर हा शब्द वापरता आला असता काय?
21 Aug 2013 - 11:28 am | आदूबाळ
वर मोग्याम्बो यांनी दिलेल्या पद्धतीप्रमाणे हा लेख वाचता येतो आहे. पण गूगलसुद्धा कॅशे मेमरी किती दिवस ठेवणार हा प्रश्न आहेच.
इथे पेष्टवला तर चालेल का? कोणताही व्यावसायिक हेतू नसल्याने प्रताधिकाराचं लफडं नसावं.
संमंने कृपया मार्गदर्शन करावे.