सैरभैर डायरी - १

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
31 Dec 2025 - 7:28 pm

बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता.
माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते..
पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये"

इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही. पिक्चर असेल तर जेवणाचे हाल होणार, म्हणून मेसला दाबून जेवून विजयमध्ये पिक्चरला निघालो. कात्रजवरुन ४२ नंबर पकडून बाजीराव रोडला उतरलो.
किश्याच्या कोचिंग खाली वाट बघता ए बी सी मध्ये सुट्टा मारला. .. किश्याचा कोचिंगमधल्या पोरींना इंजिनिअर करणारा पोरगा जाम भारी वाटायचा.आपणपण फुकट रुबाब मारायचो,थोडा इंग्लिश झाडायचो,कुठ खडा बसला तर बसला.त्यांचा ग्रुप आल्यावर हिला आग्रह तिला बोलाव यात लेट झाला. अंधारात पॉपकॉर्न शोधता येइल या आशेवर रीक्षा करून तिथे गेलो तर 6 चा शो हाऊसफुल. किश्याला शिव्या हासडून पुढे काय करायचं विचार करत बसलो.. काळया मनाचा..किश्या चांगल्या दानतने पिक्चर दाखवत नाही यावर सगळ्याचे एकमत झाले.9 पर्यंत थांबायची पोरींची तयारी नव्हती,पोरी गेल्या. कॉर्नर सीटची संधी गेली म्हणून अजून वैताग त्यात रीक्षाने खिसा हलका झाला होता. खाया पिया कुछ नही , ग्लास तोडा बारा आना .. आता 9 चां पिक्चर म्हणजे जेवणाची जुळणी करायला लागणार.. अपेक्षेप्रमाणे किश्याचे हात वर!

पैसा नाय ,पोरी नाय, ३ तास टाइमपास करावा तर साला पिक्चर पण नाय,डोकं गरम झालं!
"भोकात गेला पिक्चर! चल, प्यासाला बसून क्वार्टर मारू."
किश्या गंभीर होत म्हणाला, "तू एकावर थांबत नाय आणि आपण काय तिथ लफड करणार नाय."

चल.रे.. जिथ इछा तिथ वाट टाइप थातूर मातुर सांगून दगडूशेठला नमस्कार करून पुढे निघालो..
तिथ लहर फिरली "किश्या चल गल्लीत राऊंड मारू, तसपण ७ वाजता कुठे पितो, थोडा लेट जाऊ,"

असे म्हणत रंग रांगोटी केलेले चेहरे न्याहाळत पुढे जात होतो

बहुतेक आमच्या रीकाम्या खिशाची सावली आमच्या चेहर्‍यावर दिसत होती. कोणी बघेना ,हात करेना.
"आपण सडकछाप !साला कोणी खुणावत पण नाही " ही सनक डोक्यात जात होती. पैसा मांगता है बॉस !!

कोपऱ्यात एक पडदा लावलेला गाळ्यात मटका टाईप एक आकडी लॉटरी चालू होती. किश्याला बोललो" चल पत्ती लावू"
तो गांगरला तो पैल्यापासून गांडू , "अरे, खायचा प्यायचा ना भाऊ, इथे गेले तर मेसला जायला लागेल.क्वार्टर तर विसरून जा"

-"गाढवाच्या गांडित घाल क्वार्टर.. भेंचोद !रांडा भाव देईनात .. कपाळावर छापला आहे आपल्या.. भिकारी आहे आपण "
"जियेंगे तो शान से.. नायतर नाय"

अशा वेळी हिंदी डायलॉगच का सुचतात ? आता पडलेला मोठा प्रश्न !

आत जाऊन नशीब आजमावला , छक्का लावला.. आणि १ का १० झाला ना भाई.. १००० खिशात..किश्यानेपप्पी घ्यायचा बाकी ठेवला होता..

बाहेर आलो तशी आपली चाल बदलली होती. गरम खिसा माणसाची हालचाल , बोलचाल सगळ बदलतो. बहुतेक त्या बायांना पण वास लागला होता.आता डोळे मारणे चालू झाले. "देखा अपना जलवा किशोर भाई"

किश्या शहाणा होता. त्याने वढतं प्यासा ला नेले. मस्त १-१ झाली.तसे पिक्चर आठवला.आज बघायचाच ते पण बाल्कनी!
रिक्षा पकडली डायरेक्ट मंगला! त्या एसी मध्ये अंधारात फुल धुंदी चढू लागली. बाहेर येऊन भुर्जी-पावने पोटाची आग थंड केली.. किश्या रूमवर चल म्हणाला पण त्या ढेकणांना रक्तदान करायची इच्छा नव्हती.. त्याला बोललो "जा तू"
वरती येऊन कोर्पोरेशनच्या पुलावर थांबलो.१ वाजून गेला होता.रातराणी किंवा शेयर रिक्षा ची वाट बघत थांबलो होतो.स्वारगेट पर्यंत गेला की पुढे जाता येता..
साइडला बघितला तर छम्मकछलो.
पोरींकडून झालेला अपेक्षाभंग , खिशातल्या नोटा,संध्याकाळचा करंट,पिक्चरची एसी हवा आणि पोटातील रमचे भयाण कॉकटेल अपरात्री १ वाजता डोक्यात घुमत होता.

आज आता इथे जज्ज करायला कोणी नव्हते की गांडु किश्या नव्हता ! आपणच बादशा ! जन्नत बोले तो यहीच!
बिनदिक्कत जवळ गेलो.. "क्या रे नाम तेरा.. "
ती हसली, "जो चाहें बोलो.. क्या फरक पडता है" .
भांचो! आता रांडापण डायलॉग देणार..

"पेठेत चालली का"..
पुन्हा शांतता. फुल्ल इग्नोर डोक्यात किक

"बस नहीं आने वाला.. चल ना रिक्षा से तेरे रूम पे चलते"

पुन्हा हसली, "कॉलेज का छोकरा हे ना तू ??"

कॉलेजवाला पोरगा समजून साली मला दरिद्री समजत होती.संध्याकाळची कळ पुन्हा तीव्र झाली..

"ए, जे पायजे ना सगळ हाय.. जास्त शानी बनू नको"

"बच्चा है तू" म्हणून हसून ती पुढे चालत निघाली..

बच्चा बोल के तो बात इगो पे आ गयी ना भाई!!

"ए मोना डार्लिंग.. लई फिरवल्या आणि निजवल्या पण तुझ्यासारख्या".. म्हणत मी पण तिच्या मागे झपाझप चालत गेलो..
मोना डार्लिंग रोखून बघत होती... "कॉलेज वाला छोकरा है ना तू.. घरवाला पुछता नहीं क्या? क्या करता है ऐसे टाईम को"
मी अजून मस्तीतच होतो.. "तेरे को क्या .. तू रेट बोल... वरना भाड में जा, मैं दुसरी देखता"

"चल मेरे साथ.. अभी किदर घुमेगा", म्हणून ती पुन्हा पुढे चालू लागली..

मी गपगुमान हिपॅनोटाइज झाल्यासारखा चालू लागलो.गप्पा मारत थोड्या वेळाने कसब्यापाशी पोचलो,मागून रिक्षा आली तसे आम्ही बसलो. मुद्दाम घसटून बसलो , ती काही बोलली नाही , स्टॉप येताच मी उतरायच्या आधी तिने ५० ची नोट रिक्षावाल्याला टेकवली,"इसको स्वारगेट छोड" . मी उतरताच बोलली , "घर जा दोस्त... ऐसे आधी रात घुमना नहीं .. अब यहां कुछ अच्छा नहीं होता.. ये अंधेरा अच्छा नहीं..खा जाता है" कुठली तरी जुनी जखम सलावी असा तिचा चेहरा वळवत गलीतल्या अंधारात दिसेनाशी झाली...

काही न सुचून मी उदास होऊन पाय ओढत रूमवर आलो.

समाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

31 Dec 2025 - 7:47 pm | कंजूस

डायरी वाचतोय.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2025 - 9:18 pm | टवाळ कार्टा

जमालीये, तात्याची आठवण येईल असे लिहिले आहे

गामा पैलवान's picture

1 Jan 2026 - 8:01 pm | गामा पैलवान

अगदी, अगदी !!
-गा.पै.

जबरदस्त सुरुवात मुनिवर. एकदम जीवंत वर्णन. येऊ द्या डायरीतली पुढची पाने भराभरा.

कांदा लिंबू's picture

1 Jan 2026 - 9:54 am | कांदा लिंबू

एक नंबर कपिलमुनी!

नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय.

पुभाप्र.

अभ्या..'s picture

1 Jan 2026 - 3:29 pm | अभ्या..

बेस्ट एकदम.
शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले.
.
एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच.
येऊद्या एकेक भाग पटापटा.

टर्मीनेटर's picture

1 Jan 2026 - 8:36 pm | टर्मीनेटर

जाम भारी मुनिवर्य 👍
सुहास शिरवळकर आणि जव्हेरगंज ह्यांची आठवण आली!
डायरीची पुढची पाने वाचण्यास उत्सुक आहे...