वन्स मोअर,

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
1 Jan 2009 - 9:52 pm

वन्स मोअर,
का पलिकडुन खुणावते आहे, मला कुणी
का आठवुन देते,जे विसरले, मला कुणी

चुंबनाचि गोडी, टाकली पुसुन, ओठावरुन मी
का करुन देते आठवण,अधर चाळवुन ,मला कुणी

फाडल्या, केल्या नष्ट ज्या प्रेम कविता मी
का ऎकवते आहे ,ते प्रेमगीत, मला कुणी

कधिराग,कधि अनुराग,कधि प्रेम,कधि आग,
कधि हो, कधि नाहि,का गोंधळुन टाकतय, मला कुणी

मुश्किलिन बुजत आहेत घाव, धरल्या खपल्या
का उकलत आहे त्या,दंतव्रण दाखवुन, मला कुणी

चुकलो,गमावल सारे, हरलो, ह्या खेळात मी
का करतय उद्युक्त पुन्हा, डाव खेळण्या, मला कुणी

पडला पडदा, संपली ,तिन अंकि शोकांतिका
का सारखा वन्स मोअर, देत आहे, मला कुणी

अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन

प्रेमकाव्यप्रतिभा

प्रतिक्रिया

अपूर्व_पाठक's picture

2 Jan 2009 - 1:58 pm | अपूर्व_पाठक

अविनाश,
कविता उत्तम आहे! मला फार कळत नाही, पण माझ्या मते ही गजल ह्या प्रकारात मोडू शकते.
सुरेश भटान्चे 'एल्गार' मिळाले तर जरूर वाचा. गझलेविषयी बारीक-सारीक माहिती दिलीये त्यात!

जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा ,
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही !!
~ सुरेश भट

तडकडताई सांगलीवाली's picture

2 Jan 2009 - 8:01 pm | तडकडताई सांगलीवाली

चांगली कविता... पण गझल नाही.

कविता उत्तम आहे! मला फार कळत नाही, पण माझ्या मते ही गजल ह्या प्रकारात मोडू शकते.
सुरेश भटान्चे 'एल्गार' मिळाले तर जरूर वाचा. गझलेविषयी बारीक-सारीक माहिती दिलीये त्यात!

अपूर्वजी, तुम्ही पुन्हा एकदा एल्गार जरूर वाचा. म्हणजे कवितेला गजल म्हणण्याची चूक होणार नाही.