गर्भलिंग आणि पर्यावरण

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
19 Jul 2025 - 12:09 pm

गर्भलिंग आणि पर्यावरण
=====================

गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते.

निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे. आईच्या रक्तातील लोहाची पातळी जनुकीय भाग्यापेक्षा लिंगनिश्चितीसाठी महत्त्वाची असते.

KDM3A नावाचा एक एन्झाईम केंदेकाम्लावरील काही खुणा (मार्कर) पुसून टाकण्यासाठी आवश्यक असतो. हा एन्झाईम कार्य करत नसेल तर लिंगनिश्चितीकरणारा Sry हा जीन शांत (अव्यक्त) राहतो. लोहाच्या कमतरतेमुळे KDM3A आपले काम करू शकत नाही.

संशोधकांच्या असे लक्षात आले की उंदरांच्या गर्भधारणेच्या काळात जेव्हा लिंगनिश्चिती होते तेव्हा लोहाची गर्भात मोठ्याप्रमाणात उलाढाल चालू होते. ज्या रासायनिक प्रक्रियाद्वारे ही उलाढाल होते ते मार्ग जर बंद पडले (उदा० लोहाची अन्नातील कमतरता, औषधे) तर उंदरामध्ये गर्भावस्थेतच लिंग बदल होतो म्हणजे जनुकीय रचना पुरुष असली तरी वृषणा ऐवजी बीजांडे तयार होतात.

काही जीवांमध्ये लिंगनिश्चितीसाठी पर्यावरण कसे काम करते हे बघणे मनोरंजक आहे- उदा० कासवे आणि मगरीमध्ये तापमान लिंगनिश्चितीचे महत्त्वाचे कारण असल्याचे लक्षात आले आहे.

माणसामध्ये मात्र अशी पर्यावरणाद्वारे लिंगनिश्चिती होत नसली तरी पर्यावरणाचा नंतरच्या लैंगिकविकासावर, जननक्षमतेवर प्रभाव पडतो. 5α-reductase या एम्झाईमची कमतरता असलेली XY मुले सुरुवातीला स्त्रैण दिसतात पण नंतर पौगंडावस्थेत ती पुरुष म्हणून विकास पावतात (माझ्या बघण्यात अशी काही उदा० आहेत).

Citation:
Okashita, N., Maeda, R., Kuroki, S. et al.
Maternal iron deficiency causes male-to-female sex reversal in mouse embryos.
Nature 643, 262–270 (2025).
PMID: 40468068

समाजविचार

प्रतिक्रिया

अजून तरी हे फासे कसे टाकायचे ते प्राण्यांच्या हातात नाही हे बरे आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Jul 2025 - 11:38 pm | प्रसाद गोडबोले

बरं