वायुसेनेतील आठवणी - कॉपल पांडे जी एस – भाग ३
“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”
"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."
(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”)
माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं…
दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं. मी चेहरा थोडा उग्र केला, आणि त्याने लगेच सॅल्यूट करत म्हटलं:
“गुड आफ्टरनून सर, धिस इज कॉपल पांडे रिपोर्टिंग!”
“यस कॉपल पांडे, आता काय हवं आहे तुला?” मी विचारलं.
“नथिंग सर, आय वॉज वेटिंग फॉर यू. आय वॉज लिटिल अफ्रेड टू कम टु युवर ऑफिस. सर, आय नो… व्हेनेव्हर आय मिट यू, समथिंग हॅपन्स… अँड देन युअर फेस डझन्ट लूक हॅपी!”
(“काही नाही सर, मी तुमची वाट बघत होतो. तुमच्या ऑफिसमध्ये यायला थोडा घाबरत होतो. सर, मला माहीत आहे… मी तुम्हाला जेव्हा भेटतो, आणि मग काहीतरी होतं… आणि मग तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!”)
त्याच्या मिश्किल पण प्रामाणिक उत्तरावर मी हसलो.
"खरं आहे!"
“गुड न्यूज सर! टुमारो इज सॅटरडे. बालगंधर्व कला दालनात आमच्या अभिनव कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आर्ट एक्झिबिशन आहे. सर, आय हॅव कम विथ इन्विटेशन… बट नो कार्ड. प्लीज कम इन युअर युनिफॉर्म सर.”
त्याच्या उत्साहामुळे मी म्हणालो:
"ओके, मी येतो."
दुसऱ्या दिवशी मी पोहोचलो. पांडे स्मार्ट सिव्हिल ड्रेसमध्ये मला रिसीव्ह करायला उभा होता. माझ्या युनिफॉर्मकडे बघून तो म्हणाला:
“सर, यू लुक व्हेरी हँडसम!”
प्रदर्शन अतिशय कलात्मक होतं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेची उत्तम मांडणी केली होती.
पण काही वेळात पांडे गायब झाला! काही वेळाने तो कॉलेजच्या फॅकल्टी स्टाफसह परत आला.
"सर, धिस इज अवर स्टाफ. दे हॅव हेर्ड ए लॉट अबाउट यू. आय टोल्ड देम एव्हरीथिंग अबाउट द एअर फोर्स अँड यू!"
(“सर,हा आमता टीचिंग स्टाफ आहेत. त्या शिक्षकांपैकी एक म्हणाले:
एक म्हणाले आम्ही एअर फोर्सबद्दल आणि तुमच्याबद्दल सगळं ऐकले आहे जीएसकडून.”)
“GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं.”
दुसरे म्हणाले:
“आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं.”
ते पुढे म्हणाले:
“GS ला आम्ही फक्त विद्यार्थी म्हणून पाहत नाही. तो आम्हाला स्टाफ मेंबरसारखाच वाटतो. त्याचे विचार, संवादकौशल्य… तो बोलतो तेव्हा एखाद्या प्रशिक्षकाने वर्ग घेतोय असंच वाटतं. अहमद गुलाम कुम्हार या कुंभाराला त्याने दिलेलं पाठबळ आम्ही कधीच विसरू शकत नाही.”
मी पांडेला शोधत होतो… पण तो पुन्हा गायब!
शेवटी, पांडे आला आणि म्हणाला:
"सर, प्लीज कम विथ मी."
त्याने मला एका कोपऱ्यात नेलं, जिथे अहमद गुलाम कुम्हार या म्हाताऱ्या कुंभाराचं प्रदर्शन होतं. त्याने अनेक मातीची भांडी मांडली होती. हात जोडून वाकत तो म्हणाला:
“सलाम साहब…
(“ते आमचे साहब आहेत – त्यांच्या मुळे तुम्ही आज इथे आहात.”)(“मेहरबानी जनाब.”)
त्याचं कौतुक म्हणून मी माझ्या खिशाला झेपेल अशी एक मातीची कलाकृती विकत घेतली.
...
(काही दिवसांनी एक दिवस पांडे माझ्या घराच्या दरवाज्याशी हजर झाला. चेहऱ्यावर चिंता.)
(“सर, एक तातडीची गरज आहे. आत यायला हरकत नसेल तर?”)
मी म्हणालो, इथे नको ऑफिसात ये. पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती.
बर बैस म्हटल्यावर तो अंग चोरून बसला.
(“सर, मला तुमच्याकडून एक पत्र लिहून घ्यायचं आहे.”)
(“माझी मदत फक्त तुम्हीच करू शकता.”)
माझ्याशिवाय या जगात तुला कोणी सापडत नाही का मी फटकारले.
"फर्स्ट, हॅव टी. आणि बोल."
पांडे म्हणाला:
"सर, यू आर द ओन्ली वन हू कॅन हेल्प मी. आय मेट धिस ओल्ड मॅन – अहमद कुम्हार – हू लॉस्ट हिस फॅमिली इन भुज अर्थक्वेक. ही वॉज स्ट्रगलिंग. ही नीडेड क्ले अँड इंस्ट्रुमेंट्स टू स्टार्ट मेकिंग पॉटरी अगेन. ही डिड नॉट टेक आल्म्स. सर, विथ युअर रेफरन्स लेटर, आय कॅन रीच पीपल लाईक अनु आगा मॅडम, राहुल बजाज सर..."
मी डिक्टेशन सांगायला लागलो. त्याने शेवटी विचारलं:
"सर, मे आय अॅड वन लाइन?"
"गो अहेड. बट ब्रिंग द टाईप्ड लेटर टुमारो मॉर्निंग फॉर सिग्नेचर."
"डोंट वरी सर. ७:३० ला टेबलवर असेल."
सकाळी ऑफिसमध्ये गेलो तर एक सुंदर पॅडवर अत्यंत सुबक प्रिंटसारखं वाटणारं हँडरिटन पत्र होतं. वाचलं. शेवटी लिहिलं होतं:
“We the armed force personnel can appreciate the art. But we need the assistance of those who are lovers of writers, painters, sculptors and admirers of artists and their arts. If you don’t come forward, who will?”
(“आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्या सारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?”)
हे वाचून मी थक्क झालो. आणि सगळं समजूनही गेलो...
त्या सुंदर अक्षरातील पत्रावर जपून सही केली की त्यामुळे ते विद्रूप दिसणार नाही!
त्या पत्राचा खूप प्रभाव पडला. अहमद कुम्हार आनंदाने आपल्या गावी गेला.
...
आर्ट एक्झिबिशनच्या कार्यक्रमात, मी फक्त पाहुणा म्हणून आलो होतो. पण आयोजकांनी मला व्यासपीठावर बसवलं – ते ही डॉ. भटकर यांच्या शेजारी!
डॉ. भटकर मंचावर आले आणि माझ्या युनिफॉर्मवरच्या नावाच्या पट्टीकडे पाहून म्हणाले: “अरे, तुम्ही विंग कमांडर ओक आहात? मी तुमचं नाडी शास्त्रावरचं पुस्तक वाचलंय – अप्रतिम आहे!”
त्यांनी पारितोषक वितरण करून आयोजकांना विनंती केली – मी भाषण आधी करतो. त्यांनी कलाविषयावर बोलून थोडक्यात विषय वळवला:
"स्टुडंट्स, यू मे नॉट नो – धिस पर्सन हॅज रिटन द फर्स्ट मीनिंगफुल बुक ऑन नाडी शास्त्र. इट्स अॅन अमेझिंग सायन्स.
(“विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कदाचित माहित नसेल – पण या व्यक्तीने नाडी शास्त्रावर पहिलं सखोल पुस्तक लिहिलं आहे. हे एक विलक्षण शास्त्र आहे. ते याबाबत अधिक चांगलं समजावून सांगतील. ही विल एक्सप्लेन बेटर." मी. आय रिक्वेस्ट हिम टू डिस्ट्रिब्युट रेस्ट ट्रॉफीज. असे म्हणून ते निघून गेले!
मी आश्चर्यचकित झालो. भाषणाला तयार नव्हतो. पण नाईलाजाने उभा राहिलो!
(“माफ करा – मी कधीही ब्रश हातात घेतलेला नाही. पण आज मला चित्रकलाकारांचा गौरव करायला सांगितलं गेलं आहे… तरी मी बोलतो – मराठीत.”)
भाषणाच्या शेवटी मी म्हणालो:
(“तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे.”)
भाग ३ पूर्ण
क्रमशः