मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
13 May 2025 - 12:23 pm

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5

माझी उत्तरे

प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते.

प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते. ती कशी घ्यायची हेही अगोदरच ठरलेले असते.

प्रश्न ३ - अशा मोठ्या घटनांमध्ये पडद्यामागे काय चालू आहे, ते सामान्य बुद्धीमत्तेच्या जनतेला कळणे अपेक्षित नसते. सिमला करार गुंडाळल्याची घोषणा पाकीस्तानने केली असल्याने ट्रंपच्या मध्यस्थीला सिमला कराराच्या आधारावर आक्षेप घेणे हास्यास्पद आहे.

प्रश्न ४ - अमेरीकेची व्यापार थांबविण्याची धमकी पोकळ होती. ते अमेरीकेला परवडणारे नाही. ती धमकी त्यांनी का दिली यावर मोदींनी भाष्य करावे अशी मी पण अपेक्षा करणार नाही. ही धमकी दिखाउ असायची शक्यता खूप वाटते. कालच्या मोदींच्या भाषणानंतर भारत अशा धमकीपुढे नमेल असे वाटत नाही.

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही. भारताचे उद्दीष्ट साध्य झालेले असल्याने, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे लक्षण नाही.उलट ट्रंपला अनुल्लेखाने मारले हे मला अतिशय आवडले

समाजविचार

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

13 May 2025 - 12:31 pm | युयुत्सु

आज शरद पवार यांच्या तोंडी छापून आलेले विधान (अमेरीकेची मदत घ्यायची काय गरज? -म०टा०) केवळ संतापजनक नाही तर सैन्यदलांच्या कामगिरीचा अपमान करणारे आहे. या गृहस्थांनी काश्मिरप्रश्नावर स्वत: संरक्षण मंत्री असताना कोणतीही ठोस पवले उचललेली नाहीत.

युयुत्सु's picture

13 May 2025 - 12:40 pm | युयुत्सु

सरकारचे समझौता करून सरकारचे चुकले असे ज्यांना वाटते त्यांनी clausewitz याचे ऑन वॉर आणि सन त्सु याचे द आर्ट ऑफ वॉर ही पुस्तके १ल्या कव्हर पासून शेवटच्या कव्हर पर्यंत वाचावी आणि मग मतप्रदर्शन करावे.

आग्या१९९०'s picture

13 May 2025 - 1:05 pm | आग्या१९९०

धागा वाचताना Bhaghat Ram चा यू ट्यूब चॅनेल बघितल्याचा फिल येतोय.

तसा फिल येणे स्वाभाविक आहे पण देश कसा चालवला जातो हे मला बर्‍यापै़की जवळून बघायला मिळाले आहे. कोणत्याही आक्रमक भूमिकेत आपले नुकसान कमीतकमी ठेवणे शहाणपणाचे आहे. धाडसी निर्णय घेतल्यावर जनता कशी उलट्या बोंबा मारते ते नोटबंदीच्या वेळेला बघायला मिळाले.

१.जगात अगोदरच दोन युद्धे प्रलंबित आहेत.
२. ट्रंपने पूर्वीच पाकिस्तानची मदत थांबवली होती.
३. आइएमएफमध्ये इतर देशही पुंजी लावतात आणि मग त्यातून कर्ज दिले जाते.
४. त्या कर्जाचे वितरण करायचे का नाही यावर विचार केला जाईल असे ट्रंपने पाकला सांगितल्यावर पाकने शस्त्र संधीच्या वार्ता सुरू केल्या.
५. पाकच्या विनंतीला मान देऊन किती टक्के आणि कोणत्या अटींवर संधी करायची ते भारताच्या अधिकारात आहे.
बघू पुढे काय होते.
यावर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. इंदिरा गांधी बऱ्याच होत्या असे कॉन्ग्रेसने म्हटले आहे.परंतू आता बांगला देश भारताला कसा भारी पडत आहे, वाकुल्या दाखवत आहे ते आपण पाहतोच आहोत.

रात्रीचे चांदणे's picture

13 May 2025 - 1:33 pm | रात्रीचे चांदणे

शस्त्र संधी? नंतर बहुतेक लोकं नाराज आहेत. ह्या माघे मीडियाने वाढवलेल्या अवास्तव अपेक्षा कारण असू शकेल का? म्हणजे ८ मेच्या रात्री आपण इस्लामबादवर तिरंगा फडकावणार होतो, त्यामानाणे अतिरेक्याच्या नऊ अड्डयावर आणि पाकिस्तानचे नऊ दहा एअर बेस उद्वस्थ केले म्हणजे त्यामानाने फारच मामुली गोष्ट.
युद्धात कांय धडा घायचा तो आपली आर्मी घेईलच पण सरकारने मात्र आपल्या मीडियावर कारवाई केलीच पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर मात्र आपलं लॉन्ग टर्म मध्ये फार मोठं नुकसान होणार आहे.जगताला एकही देश आणि आपले नागरिक सुद्धा आपल्या मीडियाला सिरिअसली घेत नाहीत किंवा घेणार नाहीत.

युयुत्सु's picture

13 May 2025 - 1:39 pm | युयुत्सु

अगदी बरोबर. याचबरोबर पाकिस्तानचे चार तुकडे होणार या अपेक्षेने पण बराच गोंधळ उडाला.

स्वरुपसुमित's picture

13 May 2025 - 2:30 pm | स्वरुपसुमित

मी पाकिस्तानी फोरुम पण बघतोय
पार बोट थर थर कापत होते वरुन मेमे बनवले आहे

मोठ्या मोठ्या शहरात शंभर सव्वाशे माणसे मारल्यावर.
जो महाभयानक हल्ला मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानवर सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात लढवलेला होता. तेव्हा त्यांनी जे हल्ले केलेले होते ते.थेट पाकिस्तानचेही बाहेर जाऊन थेट अफगाणिस्तान पर्यंत धडकत होते. त्याकवेळेस जितके आतंकवादी तळ पाकिस्तनांचे उध्वस्त केले होते ती निव्वळ ऐतिहासिक अशी कामगिरी होती. आजही पाकिस्तानी लोकांमध्ये सोनिया आणि मनमोहन या नावांची दहशत 2008 च्या हल्ल्यामुळे बसलेली आहे.
तेव्हा चीन आणि अमेरिका मनमोहन यांच्या इतक्या भयानक दबावात होते की युद्ध थांबेपर्यंत त्यांनी चक्क विपश्यना आणि ध्यानधारणा करत मौन बाळगले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2025 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, मा.पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी कामगिरी केली त्यामुळे आपण खुश असाल ना ? की नाही.

-दिलीप बिरुटे

धाग्याच नाव चुकले आहे

युयुत्सु's picture

13 May 2025 - 5:04 pm | युयुत्सु

<<धाग्याच नाव चुकले आहे>>

काय हवे होते? ;)

सौन्दर्य's picture

13 May 2025 - 11:25 pm | सौन्दर्य

धाग्याचे नाव 'मोदींचे भाषण व त्यावर घेतलेले बालिश आक्षेप' असे असायला हवे होते असं मला वाटतं.

धर्मराजमुटके's picture

13 May 2025 - 11:53 pm | धर्मराजमुटके

मी भाजपा समर्थक असलो तरी मोदींची थेट भाषणे पाहत नाही. ती एकंदरीत रटाळ असतात. त्यापेक्षा मला अमित शहा यांची रोखठोक आणि टू द पॉईंट शैली आवडते.

सोत्रि's picture

14 May 2025 - 7:01 am | सोत्रि

टू द पॉईंट!!

- (पॅाईंटेड) सोकाजी

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2025 - 3:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रम्प ह्यांनी जे वक्तव्य केले त्यातून पडद्यामागे काय घडले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो.
विधान १- आम्हाला भारताबरोबर खूप व्यापार करायचा आहे.
विधान २- आम्हाला पाकिस्तानबरोबरही खूप व्यापार करायचा आहे.
"I said let’s do some trade," Trump said
Trump said he had offered trade incentives to both New Delhi and Islamabad to de-escalate tensions.
पुन्हा ट्रम्प तात्यांनी दाखवुन दिले - की मला दोन्ही देश सारखेच आहेत. आता हे वक्तव्य जर खोटे आहे तर भारत/पाकिस्तानतर्फे काही खुलासा आला का? "की ट्रम्प खोटे बोलत आहेत? की नेहमीप्रमाणे समर्थक म्हणणार- "मोदींनी कशाला खुलासा करायचा? ट्रम्प वाट्टेल ते बोलतील"
किती जवान मारले गेले, किती जखमी झाले ह्याची माहिती आता तरी मिळू शकेल का?

https://economictimes.indiatimes.com/news/india/i-said-lets-do-some-trad...

युयुत्सु's picture

14 May 2025 - 4:36 pm | युयुत्सु

सौ० कुरसुंदीकर

आपण फारच "उथळपणे" या घटनांचे विश्लेषण करत आहात. मला स्वतःला पुढील विश्लेषण जास्त वास्तववादी वाटते.

https://www.youtube.com/watch?v=vNbjwnNdEGM

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2025 - 3:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही
भारत पाकिस्तानला धडा शिकवणार होता(निदान तशी अपेक्षा होती). ट्रम्प ह्यांनी मध्यस्थी केली(व्यापार वाढवुया म्हणून) असे ते म्हणतात. मग युद्धबंदी झाली. म्हणजे व्यापार वाढणार म्हणून भारताने अमेरिकेला होकार दिला असाच अर्थ निघतो ना? आणि "पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.
मग प्रश्न असा पडतो की ऑपरेशन सिंदूरने नक्की काय साधले?

चंद्रसूर्यकुमार's picture

14 May 2025 - 4:12 pm | चंद्रसूर्यकुमार

"पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.

तसे पाकिस्तानी अधिकारी असे बरेच काही बोलत असतात. इतका मार खाऊनही आम्हीच जिंकलो असा दावाही ते करत आहेतच. म्हणून लगेच असल्या बाष्कळ दाव्यांची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत बसायचे का? जर आपण नुसत्या पीओकेमध्येच नाही तर पंजाबमध्ये पण बिनबोभाट हल्ले करू शकत असू आणि पाकड्यांचे १०-१२ हवाईतळ उध्वस्त करू शकत असू तर ते ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी फलित मानायचे की नाही? आपले सैन्य काय बोलत आहे त्यावर विश्वास ठेवायचा नाही पण कुठचातरी वायझेड पाकडा लष्करी अधिकारी काहीतरी बरळला म्हणून आपल्याच सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे- हो की नाही माई?

रात्रीचे चांदणे's picture

14 May 2025 - 4:13 pm | रात्रीचे चांदणे

भारताने स्पष्ट सांगितलंय की अमेरेकीने कोणताही माध्यस्थीचा role play केला नाही आणि मान्यही नाही. मोदींनी पण घटनाक्रम भाषणात सांगितला आहे.
पण ट्रम्पच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना आहे हे मान्य कराव लागेल.

युयुत्सु's picture

14 May 2025 - 4:37 pm | युयुत्सु

प्रत्येक राजाला शत्रुबरोबर लढताना एक युद्ध स्वकीयांबरोबर करावे लागते, जे सर्वात वेदनादायी असते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2025 - 7:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

२६-११ चा हल्ला झाला होता तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.
इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?
काँग्रेसचा राजा आज सत्तेवर असता तर भाजपावाल्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता की नाही?

स्वधर्म's picture

16 May 2025 - 4:53 pm | स्वधर्म

कुठले युध्द?
मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा सामना केला नाही. कुणीही प्रश्नच विचारू नये असा सुरक्षित किल्ला त्यांना लाभला आहे.
दुसरे म्हणजे त्यांनी काहिही केले तरी त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लक्षावधी लोक त्यांनी तयार केले आहेत. उदा. जातनिहाय जनगणनेला केलेला विरोध पूर्ण १८० अंशात मत बदलून समर्थन केले, तरी समर्थक ब्र ही काढत नाहीत, नव्हे आता हेच कसे बरोबर हे सांगत आहेत्त. एवढ्या मोठ्या संखेने इतके एकनिष्ठ (स्वत:चा विचार नसलेले) समर्थक इतर कोणत्याही नेत्याला लाभले नव्हते. कसले युध्द?

युयुत्सु's picture

14 May 2025 - 7:12 pm | युयुत्सु

<इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?>

सर्व माहिती यथावकाश (युद्ध थांबल्यावर) बाहेर येतेच, इतकंच आत्ता सांगू शकतो.

<तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.>

मला संदर्भ कळला नाही. कृपया स्पष्ट्/नि:संदिग्ध लिहील्यास आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजणे सोपे जाईल.