दोष व्हीआयपी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
25 Mar 2025 - 8:33 am

देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी. कारण दुर्योधनाला माहीत होते, जो पर्यन्त कुरुक्षेत्रच्या युद्ध भूमीवर पितामह भीष्म आहेत, तो पर्यन्त पांडवांचा विजय होणे शक्य नाही. राजा जिवंत असेल तरच युद्ध जिंकणे किंवा शत्रूपासून राज्याची सुरक्षा करणे संभव असते. बिना राजा राज्य सुरक्षित राहू शकत नाही.

आज एसपीजी भारताच्या प्रधानमंत्रीची सुरक्षा करते. एसपीजीत प्रतिनियुक्ती वर सुरक्षा दलांतून अंगरक्षक भरती केले जातात. अंगरक्षक निश्चित अवधिसाठी नियुक्त केले जातात. एसपीजीचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्रीचे अंगरक्षकांची ड्यूटी कोण करणार हे नियमिपणे ठरवत राहतात. आज परिस्थिति पाहून एसपीजी प्रधानमंत्रीचे कार्यक्रम ही बदलू शकते. प्रधानमंत्रीला त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरज नसते. ते त्यात हस्तक्षेप ही करत नाही. या शिवाय एसपीजी असो किंवा प्रधानमंत्री कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कसून चौकशी होते. त्यांच्या परिवाराची ही चौकशी केली जाते. (दर दोन ते तीन वर्षानी नियमित पणे माझ्या घरच्या सर्वांची चौकशी होत होती) त्यानंतरच त्यांची नियुक्ती होते. थोडी ही शंका असेल तर त्यांची नियुक्ती केली जात नाही किंवा केली असेल तर त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात पाठवून दिले जाते.

एसपीजीच्या स्थापने पूर्वीही सुरक्षा दलांचे कर्मचारी प्रधानमंत्रीची सुरक्षा करायचे. सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी अंगरक्षकांची नियुक्ती करायचे. शंका असेल तर अंगरक्षकांना बदलण्याचा अधिकार ही त्यांना होता. पण त्याकाळी प्रधानमंत्रीच्या इच्छेनुसार अंगरक्षक कितीही वर्ष तिथे काम करू शकत होते. ही सुरक्षा यंत्रणेची सर्वात मोठी चूक होती.

जे अधिकारी प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी जवाबदार असतात. त्यांच्यात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीच्या इच्छेच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याची क्षमता ही असली पाहिजे. मी एसपीजीत होतो तेंव्हा प्रधानमंत्री नेहरूजींच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली होती. त्यात किती सत्य होते, हे अजूनही मला माहीत नाही. एकदा भाषण संपल्यावर जनता त्यांच्या भोवती गोळा झाली. कुणाला त्यांचे चरण स्पर्श करायचे होते, कुणाला हात मिळवायचे होते. कुणाला त्यांच्याशी बोलायचे होते. पण असे करताना पंडितजींना लोकांचे धक्के लागत होते. त्यांच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍याला वाटले, लोकांचे प्रेम जरा अति होत आहे. तो पंडित नेहरू जवळ गेला. त्यांचे हात पकडून त्यांना थोड्या दूर उभ्या असलेल्या कार जवळ ओढत घेऊन जाऊ लागला. पंडित नेहरूंनी विरोध केला, पण अधिकार्‍याने त्याकडे लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले. अधिकार्‍याला वाटले, आता प्रधानमंत्री त्याला फायर करतील. पण नेहरूजींनी त्याच्या कर्तव्य परायणता आणि समय सूचकतेचे कौतुक केले. मला वाटते या गोष्टीचा एकच उद्देश्य होता, राष्ट्र प्रमुखाची सुरक्षा, ही राष्ट्र प्रमुखाच्या इच्छेपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, हे राष्ट्र प्रमुखाच्या सुरक्षेत असलेल्या सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या अंगरक्षक दलात दोन सिख ही होते. अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती. त्यांचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी सोबत पारिवारिक स्नेह संबंध ही स्थापित झाले होते. आपरेशन ब्लू स्टार नंतर सिखांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या होत्या. प्रधानमंत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना त्या दोन्ही सिख अंगरक्षकांना प्रधानमंत्रीच्या सेवेतून मुक्त केले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी आपली शंका प्रधानमंत्रीला बोलावून दाखविली आणि त्यांची बदली करण्याची अनुमति मागितली. साहजिक होते, प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी ती दिली नाही. नियमांनुसार अधिकारी त्या सिख अंगरक्षकांची बदली करू शकत होते. प्रधानमंत्रीची अनुमति घेण्याची गरज नव्हती. इथे ही स्वामीची इच्छा स्वामी निष्ठेवर भारी पडली. अधिकार्‍यानी स्वामी हिताचा निर्णय घेतला नाही. त्यांच्या चुकीचा परिणाम प्रधानमंत्री सहित हजारो लोकांना जीव गमवावा लागला.

छत्रपति संभाजी राजांच्या काळी राजाला अधिकान्श निर्णय स्वत: घ्यावे लागायचे. जनतेत जाऊन न्याय निवडा ही करावा लागत असे. त्यासाठी राज्यभर फिरावे लागत असे. छत्रपति संभाजी राजांना शत्रू आपल्यावर चालून येत आहे. ही माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या सोबत अंगरक्षक, मित्र आणि सरदार ही होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्यांनी सारासार विचार केला असता तर त्यांना समजले असते. मुगल फौजेला राजा कुठे आहे ही माहिती मिळाली आहे. याचा अर्थ फितुरी झाली आहे. राजा सोबत किती सैनिक आहे, हे ही मुगल फौजेला माहीत झाले असेल. मुगलांनी राजांच्या मागावर निवडक आणि प्रशिक्षित सैन्य पाठविले असेल. ते वेगाने इथे पोहचण्याचा प्रयत्न करतील. जे फितूर झाले आहेत, ते मुगल फौजेचा मार्गदर्शन ही करू शकतात. अश्या बिकट परिस्थितीत बिना अधिक विचार करता छत्रपति संभाजी राजांना त्वरित तेथून हलविले पाहिजे होते. पण काय झाले. राजांचे सर्व सोबती स्वामी भक्त होते, स्वामी आज्ञाचे पालन करताना मरण पत्करू शकत होते. पण परिस्थितीचा सारासार विचार करून स्वामींच्या हिताचा निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरले.

या घटनांपासून एकच धडा मिळतो. शत्रूला तुमच्या राजाला नष्ट करायचे असते. त्यासाठी समोरा-समोर युद्धा एवजी तो साम, दाम, दंड, भेद हे सर्व हत्यार ही वापरू शकतो. तो फितुरांची मदत ही घेऊ शकतो. राजाच्या सुरक्षेत असलेल्या सर्व अधिकार्‍यांना, सरदारांना हे माहीत असले पाहिजे. त्यांच्यात राजाच्या सुरक्षेसाठी, राजाच्या इच्छे विरुद्ध ही जाण्याचे धाडस असले पाहिजे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी असो किंवा छत्रपति सभाजी राजे दोघांचे प्राण वाचले असते जर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या जवाबदार अधिकार्यांनी स्वामीची सुरक्षा प्रथम ह्या सिद्धांतंनुसार निर्णय घेतला असता.

व्हीआयपी सुरक्षा ही सामूहिक जिम्मेवारी असल्याने कुणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण फक्त इतिहासातून धडा घेऊ शकतो. प्रत्येक राजकर्त्यांने समर्थांचे बोल "अखंड सावधान असावे... नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

25 Mar 2025 - 9:48 am | युयुत्सु

आपल्याकडे व्हिसल-ब्लोअरना गप्प बसवायची आत्मघातकी प्रवृत्ती जोपासली गेली आहे. त्याचे परिणाम वर पासून खालपर्यंत दिसतात.

आंद्रे वडापाव's picture

25 Mar 2025 - 10:26 am | आंद्रे वडापाव

आपल्याकडे गेल्या १२-१४ वर्ष्यात, चित्रपट पाहून इतिहासाचे आकलन करण्याचे फॅड पुन्हा वाढीस लागले आहे.

कि जे समाजासाठी धोकादायक आहे पण असो ...

चित्रपट निंर्माता दिग्दर्शक कलाकार , "सदर कलाकृती काल्पनिक आहे " असे डिस्क्लेमर देऊन , (उतेकर आणि कौशल )
करोडो कमावून , सध्याला विदेशात चिल मध्ये सुट्टी उपभोगत आहे ...

ते हि असो ..

दोन तीन वेगवेगळ्या घटना (वेगळ्या कालखंडात झालेल्या ) यांची सरमिसळ करून , "आधीच आपुल्या मनीचे टार्गेट पर्यंत कन्क्लुजन येईल अश्या पद्धतीने लेख लिहिण्याची परंपरेला अनुसरून , काही लेख वाचनात येत असतात.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या करंट लोकेशन आणि त्यांचे संख्याबळ याबाबतची अल्ट्रा सेंसेटिव्ह बित्तं बातमी, शत्रूला कंसीस्टंली , महाराजांचे स्वकीय नातेवाईक व काही थिंक टॅंक स्ट्रॅटेजिस्ट प्रोव्हाइड करत होते ... महाराज पकडले गेले तत्क्षणी त्यांची हत्या न करता त्यांना टॉर्चर करत पुढील एक महिना व अधिक दिवस ठेवण्यात आलेले ... त्या काळात कुठलाही मराठा, ब्राम्हण, किंवा कुठल्याही समाजाने सुटकेचे प्रयन्त केलेले दिसत नाही ...
कारण युनिव्हर्सल होते , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"...

१८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे
१. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे
२. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%)

तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ...

पण तुमची आयडिया चांगलीये ... अनेक गोष्टींची सरमिसळ करून लेख लिहिण्याची ...

युयुत्सु's picture

25 Mar 2025 - 10:44 am | युयुत्सु

< त्या काळात कुठलाही मराठा, ब्राम्हण, किंवा कुठल्याही समाजाने सुटकेचे प्रयन्त केलेले दिसत नाही ...>

हे मात्र बोचरे सत्य!!!

स्वरुपसुमित's picture

25 Mar 2025 - 5:27 pm | स्वरुपसुमित

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
https://www.misalpav.com/node/28912

आंद्रे वडापाव's picture

25 Mar 2025 - 5:40 pm | आंद्रे वडापाव

१८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे
१. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे
२. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%)

तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ...

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Mar 2025 - 11:37 am | चंद्रसूर्यकुमार

१९९९ किंवा २००० सालची गोष्ट असेल. इंग्लिश भाषेवर चांगली पकड यावी म्हणून मी त्याकाळी दररोज 'द हिंदू' हे वर्तमानपत्र वाचायचो. त्यातील लेखांमधील राजकीय मते अजिबात म्हणजे अजिबात पटायची नाहीत. तरीही त्या लेखांमधील इंग्लिश भाषेची पातळी अगदी उच्च दर्जाची असायची म्हणून मी ते वर्तमानपत्र दररोज वाचायचो. त्यात कोणा पत्रकाराचा लेख आला होता. त्यात त्याने पंडित नेहरूंची आठवण सांगितली होती. गोष्ट होती १९६३ सालची. तेव्हा नेहरू ओरिसात राऊरकेलाला गेले होते आणि तो लेख लिहिणारे पत्रकार तेव्हा नुकतेच कॉलेजात गेले होते म्हणजे १६-१७ वर्षे वयाचे असतील. त्या पत्रकाराला नेहरूंची सही पाहिजे होती. नेहरू उघड्या जीपमधून जात असताना आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी केलेले अभिवादन स्विकारत, मधेमधे एखाद मिनिट थांबत नेहरू पुढे चालले होते. पत्रकार नेहरूंच्या जीपजवळ गेला आणि आपली वही पुढे करत- 'पंडितजी तुमची सही हवी होती' अशाप्रकारचे वाक्य बोलला. त्याने वही पुढे केली खरी पण गर्दीमध्ये त्याच्याकडचे पेन कुठेतरी खाली पडले होते. तेव्हा त्याचा कावराबावरा झालेला चेहरा बघून नेहरूंनी हसत त्याला म्हटले- अरे काही हरकत नाही. माझ्याकडे पेन आहे. असे म्हणत आपल्याकडील पेन घेऊन त्यांनी त्या वहीवर सही करून त्याला दिली.

त्याकाळी पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था तितकी कडक नसायची असे दिसते. माझ्या संस्थेत दीक्षांत समारंभाला तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आले होते कारण आमच्या संस्थेला त्यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती. आमच्याच संस्थेत जुने फोटो लावले होते त्यावरून समजले की १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दीक्षांत समारंभाला आल्या होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थी पण वावरत होते. आमच्या दीक्षांत समारंभाला मात्र पंतप्रधानांच्या आजूबाजूलाही कोणालाही फिरकायची संधी नव्हती. तसेच उभे राहून कोणीही फोनवर फोटो काढू नयेत अशी सक्त ताकिद आम्हाला दिली होती. पंतप्रधान येणार ते गेट आणि आजूबाजूचा परिसर ते यायच्या तासभर आधीच सील केला होता आणि तिथून कोणालाही सोडत नव्हते. त्यामुळे आम्हाला तिथे आधीच जाऊन उन्हात बसावे लागले होते.

मे १९७१ मध्ये स्टेट बँकेच्या संसद भवन मार्गावरील शाखेत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यालयातून त्यांचे सचिव पी.एन.हक्सर यांनी मॅनेजर वेदप्रकाश मल्होत्रांना फोन केला आणि पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हटले. थेट पंतप्रधानांना आपल्याशी का बोलायचे असेल हा विचार ते करत असताना पलीकडून इंदिरा गांधींसारखा आवाज आला आणि थोड्या वेळात तिथे एक व्यक्ती येईल त्या व्यक्तीला ६० लाख रूपये द्यावेत असे सांगितले गेले. बांगलादेशात एका महत्वाच्या सिक्रेट मिशनसाठी ते पैसे वापरायचे आहेत असे सांगितले गेले. त्याप्रमाणे वेदप्रकाश मल्होत्रांनी एका गोर्‍या गोमट्या व्यक्तीला ६० लाख रूपये दिले. त्याकाळी ६० लाख ही आतापेक्षा कितीतरी मोठी रक्कम होती. आपल्याला फसविले गेले आहे अशी कुणकुण लागताच वेदप्रकाश मल्होत्रांनी थेट संसदभवनात धडक मारली आणि पहिल्यांदा पी.एन.हक्सर यांची आणि नंतर इंदिरा गांधींचीही भेट घेतली. संसदेचे अधिवेशन चालू असल्याने इंदिरा गांधी संसदभवनातील आपल्या कार्यालयात होत्या. दोघांनीही आपण असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले. ते पैसे घेणारा माणूस होता रूस्तम सोहराब नगरवाला हा गृहस्थ आणि ते नगरवाला प्रकरण १९७१ मध्ये खूप गाजले होते. सांगायचा मुद्दा म्हणजे असा कोणीही माणूस त्यावेळेस थेट आधी अपॉईंटमेंट न घेता पंतप्रधानांना जाऊन भेटू शकत होता. आताच्या काळात पंतप्रधान सोडाच त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ अधिकार्‍यालाही असे थेट भेटता येईल का याची शंकाच वाटते.

बहुदा विजय तेंडुलकरांनी असाच एक किस्सा लिहिला आहे, मला आठवतो तेवढे लिहितो.

जुन्या काळी गृहमंत्री सरदार पटेल लोकांना सकाळी त्यांच्या प्रभात फेरीच्या वेळी भेटीची वेळ देत, त्यावेळी त्यांच्या फिरण्याच्या मार्गावर, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली अशी ठिकाणे ते नेमून देत, आणि त्या जागी पहाटे लोक त्यांना भेटत. एकदा पेपरात नेहरू पुण्यात येणार अशी बातमी एका तरुण पत्रकाराने वाचली. त्यांचा मुक्काम राजभवनात असणार, हे माहीत झाल्याने तो नेहरूंची मुलाखत घेण्यास थेट तिकडे पोचला. तिथल्या खोलीचे दार वाजल्यावर खुद्द नेहरूंनीच दार उघडले, आणि विचारले, "यंग मॅन, व्हॉट डू यू वॉन्ट?" थेट पंतप्रधान असे भेटतील आणि दार उघडतील ही अपेक्षा त्या पत्रकाराला नसल्यामुळे त्याची दातखिळीच बसली आणि त्याला काहीही बोलता येईना. काही वेळाने त्याची परिस्थिती नेहरूंच्या लक्षात आल्यावर मग त्याची भीती घालवून त्याची योग्य ती संभावना करून त्याला परत पाठवले. एकंदर सुरक्षेचे अवडंबर ही आपल्या पिढीत आलेली गोष्ट आहे, ती पूर्वी नव्हती.

कानडाऊ योगेशु's picture

27 Mar 2025 - 12:13 am | कानडाऊ योगेशु

सुरक्षेची गरज ही केवळ वी.आय.पी मंडळींसाठीच अशी राहीलेली नाही. सर्वसामान्या सार्वजनिक जागीही झाली आहे. जुन्या हिंदी वगैरे चित्रपटांमध्ये मुंबई व दिल्लीविमानतळे दिसतात तेव्हा सध्या कार्यरत असलेली सुरक्षा यंत्रणेचा मागमूस अजिबात दिसत नाही. व्ही.आय.पीं साठी लागणार्या कठोर सुरक्षा यंत्रणेचे भूत हे आत्मघातकी हल्लेखोरांमुळे अस्तित्वात आलेले आहे आणि विमानतळ वा तत्सम ठिकाणी असलेली सुरक्षा यंत्रणा ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अजुनच कठोर झाली.

विवेकपटाईत's picture

25 Mar 2025 - 11:45 am | विवेकपटाईत

या लेखात फक्त सुरक्षा यंत्रणाची चूक दाखवली आहे. राजनेता फक्त आजच्या व्होट बँक साठी जातीची राजनीति करतात. त्यांच्या आहारी जाऊन प्रतिसाद देतांना कोणालाही दोष देऊ नये, कारण या धाग्याचा तो हेतु नाही. बाकी कुणालाही त्या वेळची परिस्थिति माहीत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Mar 2025 - 12:01 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या वडिलांनी सांगितलेला किस्सा
केव्हातरी साल माहीत नाही पण वडील १२-१४ वर्षांचे असतील. इंदिरा गांधी धुळ्यात येणार होत्या, प्रचंड गर्दी जमलेली होती, हेलिकॉप्टर ला हेलिपॅड दिसले नाही किंवा गर्दी हेलिपॅड पर्यंत पोहोचली असे काहीतरी झाले असावे पण हेलिकॉप्टर नियोजित जागी ना उतरता त्याच मैदानापासून थोडे लाम्ब एका पटांगणात उतरले, आजबाजूला काहीही नव्हते, वडील त्यावेळी जवळच होते, ते हेलिकॉप्टर जवळ पोहोचले ५-१० मिनिटानी २ अँबेसेडर आणी एक पोलीस गाडी आली आल्या त्यातून २ स्थानिक नेते उतरले, हेलिकॉप्टर मधून इंदिरा गांधी उतरल्या, हार तुरे झाले, इंदिरा गांधीनी घातलेला हार वडिलांच्या हातात दिला नी त्या एम्बेसेडर मधून मार्गस्थ झाल्या त्यावेळी तिथे फक्त ५ लोक होते.

अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती.

पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते. अतिरेकी खलिस्तानवाल्यांनी पवित्र सुवर्ण मंदिराचा आश्रय घेणे हे कित्येक शिखांनाही पसंत पडले नव्हते. लेखक खुशवंत सिंहांनाही हे चुकीचे वाटलेले.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2025 - 7:29 pm | श्रीगुरुजी

सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून अतिरेक्यांचा नि:पात केलेलाही खुशवंत सिंहांना आवडला नव्हता.

धरलं तर चालतंय आणि सोडलं तर पळतंय ही गत झाली होती. बोलणी करून मिटवणेही शक्य नव्हते. अतिरेकींचा उत्साह वाढला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Mar 2025 - 9:03 pm | अमरेंद्र बाहुबली

कुठे त्या पोलादी इंदिरा गांधी! कुठे ते अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी कंदहारला सोडणारे! असो!

युयुत्सु's picture

26 Mar 2025 - 11:49 am | युयुत्सु

अनेक वर्षांपूर्वी या प्रकरणाच्या अंतःप्रवाहांवर उजेड टा़कणारा एक लेख म्०टा० मध्ये प्रसिद्ध झाला होता. कुणी लिहीला ते आठवत नाही पण त्यात असा खुलासा केला गेला होता की त्या विमानात एक 'अतिमहत्त्वाची व्यक्ती' होती. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी काही युरोपिअन देशांचा दबाव होता. आता ही कहाणी खरी की खोटी हे कळायला मार्ग नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2025 - 12:08 pm | अमरेंद्र बाहुबली

वाजपेयींचा पीए की पीए चे नातेवाईक असे काहीतरी प्रकरण होते, त्याना वाचवण्यासाठी अतिरेक्याना पाहिजे त्या सवलती देण्यात आल्या! व्हीआयपी कल्चर हो व्हीआयपी! असो. ह्या धाग्याचा मुख्य उद्देश सुरक्षे संबंधी आहे.

रामचंद्र's picture

27 Mar 2025 - 4:46 pm | रामचंद्र

दुसऱ्या दुव्यानुसार तोमरप्रकरणी कुठलीही कारवाई तर झाली नाहीच मात्र अमेरिकेतलं उत्तम पोस्टिंग मिळालं हे वाचून अशाच इतर घटनांची आठवण झाली. आपल्याकडं जनहित, देशहितापेक्षा बड्या लोकांशी असलेले संबंध, वशिले महत्त्वाचे ठरतात हेच खरं.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 7:59 pm | श्रीगुरुजी

जवळपास २५ वर्षांनंतर ही माहिती कोठून मिळाली? मुळात त्या विमानात डेलारू चा एक मुख्य माणूस होता ही माहिती कोठेही नाही. तो जर अब्जाधीश होता तर जनता वर्गातून का प्रवास करेल? रॉकडे म्हणे अपहरणाची माहिती होती? अशी माहिती होती व विमानात एक अतिमहत्त्वाचा माणूस होता तर रॉ का गप्प राहील?

मुळात मूर्ख नेपाळ्यांनी अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांना मोकळे रान दिले होते. भारत-नेपाळ सीमेवर त्या काळात मदरशांची संख्या अडीच पट वाढली होती व भारतात घुसण्यासाठी पाकडे अतिरेकी नेपाळमध्ये येऊन मदरशात राहून भारतात घुसायचे. विमान अपहरणाचा कट नेपाळमध्ये शिजला. एका पाकिस्तानी विमानातून ते ४-५ अतिरेकी नेपाळमध्ये विमान उतरल्यानंतर टर्मिनलमध्ये जाण्याऐवजी थेट इंडियन एअरलाईन्सच्या विमानात गेले. काठमांडू विमानतळावरील नेपाळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी बोर्डिंग पास तयार ठेवले होते व कोणतीही तपासणी न होते त्यांना थेट विमानतळ प्रांगणातून इंडियन एअरलाईन्सच्या विमानात जाऊ दिले गेले. त्यातूनच पुढे अपहरण झाले.

ते विमान अमृतसरला जेमतेम ३५-४० मिनिटे होते. इतक्या कमी वेळात कोणतेही कमांडो दिल्लीतून तेथे पोहोचणे अशक्य होते. इतक्या कमी वेळात प्रवाशांना इजा होऊ न देता अतिरेक्यांना अडविण्यासाठी एखादी योजना बनविणे सुद्धा अशक्य होते.

विमानात इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरमधून शार्प शूटर पाठवून सर्वप्रथम विमानाची चाके पंक्चर करणे असा एक निर्णय घेतला गेला. परंतु टँकर जवळ येताना अतिरेक्यांना संशय आला व त्यांनी वैमानिकाच्या गळ्याला चाकू लावून विमानोड्डण करायला लावले. तेथून लाहोरमध्ये नेऊन इंधन भरून दुबई व तेथून कंदाहारला नेण्यात आले. दरम्यान रूपेन कट्यालला अत्यंत क्रूर पद्धतीने मारून दुबई विमानतळावर त्याचा मृतदेह फेकण्यात आला.

कंदाहारला पोहोचल्यावर तालिबानने तात्काळ विमानाभोवती धावपट्टीवर रणगाडे उभे करून व शेकडो तालिबानी सैनिक उभे करून कोणत्याही प्रकारची कारवाई अशक्य करून टाकली.

१७० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत नाईलाजाने भारताला ३ अतिरेकी सोडावे लागले. सुरूवातीला चाच्यांनी ४० अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती. परंतु अजित डोवाल व इतरांनी अतिशय चतुराईने बोलणी करून ही मागणी ३ अतिरेक्यांवर आणली.

सर्वात प्रमुख धाडस परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांचे होते. १७० प्रवाशांना सुखरूप सोडवून आणण्यासाठी ते स्वतःहून कंदाहारला गेले. ते तेथे पोहोचल्यावर चाच्यांनी त्यांनाही डांबून ठेवून अधिक मागण्या केल्या असत्या तर परिस्थिती अजून खूप अवघड झाली असती कारण भारताकडे एकही पर्याय नव्हता.

८-९ दिवस विमानात डांबून ठेवलेल्या १७० प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सर्व स्वच्छतागृहे पूर्ण भरून तुंबली होती. २४ तास आसनात बसून रहावे लागले. लहान मुले, महिला, वृद्ध यांचे खूप छान हाल झाले. रूग्णांना ८ दिवस औषधे मिळाली नाही. संपूर्ण विमानाचा नरक झाला होता. अश्या परिस्थितीत त्यातल्या त्यात कमी किंमत देऊन भारताने यशस्वीपणे एक वगळता उर्वरीत सर्व प्रवासी सुखरूप परत आणले.

मूर्ख नेपाळी आणि दुष्ट पाकडे व तालिबान्यांमुळे भारताला हे सहन करावे लागले. नेपाळवर विश्वास ठेवल्याची प्रचंड किंमत भारताला मोजावी लागली.

भारताने गुडघे टेकले वगैरे जे बरळतात ते महामूर्ख आहेत. त्यांना काडीचीही अक्कल नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करणे हे भारतात व अनेक देशात अनेकदा घडले आहे कारण मानवी जीवनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते.

भारतात यापूर्वी १९८९ मध्ये ५ अतिरेकी, १९९१ मध्ये २-३ अतिरेकी व त्यानंतरही अनेकदा अतिरेक्यांना सोडण्यात आले होते. १९९३ मध्ये लष्कराने हजरतबाल मशिदीत अडकविलेल्या ७-८ अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानला पोहोचते करण्यात आले होते कारण त्यांनी मशीद उडवायची धमकी दिली होती.

काही वर्षांपूर्वी हमासने पकडलेल्या २ इस्राएली सैनिकांच्या सुटकेसाठी इस्राएलने शेकडो हिजबोल्ला अतिरेकी सोडले होते कारण त्यांच्यासाठी त्या २ सैनिकांचे प्राण महत्त्वाचे होते.

त्या विमानातील १७० प्रवाशांना सुखरूप परत आणणे हे भारताचे मोठे यश होते.

आता काही महामूर्ख शेणके आपली नसलेली अक्कल पाजळत येतील. अश्यांच्या बरळण्याला कोणीही काडीचीही किंमत देत नाही.

या अपहरण कांडावर मिपावर ३-४ धागे आहेत. त्यात अत्यंत सविस्तर चर्चा झाली आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Mar 2025 - 8:37 pm | चंद्रसूर्यकुमार

ते विमान लाहोरमध्ये उतरताना जवळपास इंधन संपले होते आणि विमान पडता पडता वाचले होते. एक गोष्ट कळत नाही. कॅप्टन देवी शरणने ते विमान पाकिस्तानात पाडले असते तर बरे झाले असते. जर दाट लोकवस्तीत किंवा धरण/उर्जा प्रकल्प अशा ठिकाणी पाडले असते तर अधिक चांगले. एक तर आपल्या सगळ्यांना ठार मारणार किंवा सगळ्यांना ओलीस ठेऊन दहशतवादी सोडवायची मागणी करणार हे त्या वेळची परिस्थिती पाहता त्याच्या लक्षात आले नसेल का? त्यावेळेस कारगील ५-६ महिने आधीच झाले होते आणि कारगील नंतर दहशतवादी हल्ले वाढायला लागले होते. नाहीतरी आपण एकतर मरणार आहोत किंवा जगलो तरी आयुष्यभर त्या प्रसंगाची आठवण जाणार नाही आणि आपल्याला ढाल बनवून काही हरामखोरांना सोडायला लागले ही त्रासदायक जाणीव घेऊन पुढचे आयुष्य जगावे लागणार त्यापेक्षा मरतामरता शत्रूचे पण होईल तितके नुकसान करावे हा विचार त्याने केला असता तर बरे झाले असते. समजा नागरी वस्तीत विमान पाडून तिकडच्या निरपराधांना मारायचे नसेल तरी मग उतरताना धावपट्टीवर त्याला विमान पाडता आले नसते का?समजा लाहोरमध्ये काय करायचे हे त्याला आयत्या वेळेस सुचले नसेल तर कंदाहारमध्ये उतरताना क्रॅशलँड करता आले नसते का हा प्रश्न नेहमी पडतो.

आता भविष्यात समजा तशी वेळ परत आली आणि दहशतवादी ते विमान पाकिस्तानात उतरवायला भाग पाडत असतील तर ते विमान पाडावे ही सूचना आपल्या सगळ्या वैमानिकांना द्यायला हवी.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Mar 2025 - 9:02 pm | चंद्रसूर्यकुमार

९/११ च्या हल्ल्याच्या वेळेस युनायटेड एअरलाईन्सचे एक विमान युए-९३ चे पण अपहरण झाले होते. आतल्या प्रवाशांना दोन विमाने न्यू यॉर्कमध्ये आणि एक वॉशिंग्टन डी.सी मध्ये इमारतीवर धडकले आहे हे कदाचित कळले असावे असे म्हणायला जागा आहे. आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे. तेव्हा प्रवाशांनी कॉकपिटच्या दारावर धडका देऊन कॉकपिटचे दार उघडले आणि विमान उडविणार्‍या अपहरणकर्त्यांशी झटापट सुरू केली. आपल्याच देशातल्या कुठल्यातरी महत्वाच्या इमारतीवर आपले विमान आदळण्यापेक्षा एवीतेवी मरणारच आहोत तर ते नुकसान टाळावे हा विचार त्या विमानातील प्रवाशांनी केला. शेवटी ते विमान पेनसिल्वेनियात एके ठिकाणी कोसळले. ते विमान कुठे पडेल,नागरी वस्तीत पडेल का की अन्य कुठे पडेल यावर आतल्या प्रवाशांचे काहीही नियंत्रण नव्हते. आयसी-८१४ च्या बाबतीत तर ते विमान पाकिस्तानात कुठेही पडले असते तरी नुकसान तिकडच्याच घाणेरड्या लोकांचे झाले असते. म्हणून वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात पाडायला हवे होते असे नेहमी वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
पण वर अतिशय बुळचट अश्या नेत्यांची बाजू घेऊन त्याच्या समर्थनार्थ अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेत! मुळात भाजपच्या नेत्याना विमानातील प्रवाशांची काहीही पडली नव्हती तर विमानातील एका खास व्हिआयपी साठी त्यांनी अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी सोडले, सोडलेल्या अतिरेक्याने पुढे काय कारनामे केले हे उघड आहे. भाजपच्या नेत्यांना व्हीआयपी लोकांना वाचवण्यासाठी अतिरेक्यापुढे गुडघे टेकण्याबद्दल काहीही लाजलज्जा वाटली नाही. मुळात विमानातील प्रवासी मेले असते तरी ते देशासाठीच मेले असते. सीमेवर सैनिक बलिदान देतात, हे विमानातले लोक देशासाठी मेले असते तर त्यांच्यासाठी तो सन्मानच असता! देशासाठी बलिदान काय फक्त सैनिकांच द्यायचे का? पण येणेकेन प्रकारे बुळचट नेत्यांचे समर्थन सुरुय!

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 9:29 pm | श्रीगुरुजी

काडीचीही अक्कल नसलेले महामूर्ख शेणके येऊन बरळणार हे भाकीत मी आधीच केले होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Mar 2025 - 9:51 pm | चंद्रसूर्यकुमार

तुम्ही +१ म्हणून जे काही लिहिले आहे त्याचा मी जे काही लिहिले आहे त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीये हे लक्षात आले नाही का? माझा मुद्दा हा की वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात कुठेतरी- नागरी वस्तीत नाहीतर निदान लाहोर विमानतळावर उतरताना तरी पाडायला हवे होते. तुम्ही +१ म्हणत जे काही लिहिले आहे त्याचा या मुद्द्याशी काय संबंध आहे? विमान एकदा कंदाहारला उतरल्यावर आपल्याला दहशतवादी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे पण तितकेच खरे. तालिबान आणि दहशतवाद्यांनी जसवंतसिंगांनाच बंदी बनवले असते तर मात्र आपले पूर्ण हसे झाले असते. नशीबाने तसे काही झाले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 10:00 pm | अमरेंद्र बाहुबली

ओके! लक्षात आले, तुमचे मत होते वैमानिकाने हे करायला हवे होते नाहीतरी मरणारच आहोत तर! त्याला सहमती म्हणून +१ दिला! पुढील प्रतिसादात मला म्हणायचे आहे की भारत सरकारने काही साले तरी अतिरेकी सोडायला नको होते भलेही ते १७० प्रवासी मेले असते. पण जेवढे मी वाचले आहे त्यानुसार विमानातील काही “खास” लोकांसाठी विमान कंधाहार पर्यंत जाऊ देण्यात आले नी नंतर आपल्याला काही करता येणार नाही असा देखावा उभा करून भारत सरकारने अतिरेकी सोडले. (काहीशे कोटींची रक्कमही दिली असेही वाचल्याचे आठवते.)

संग्राम's picture

27 Mar 2025 - 9:30 pm | संग्राम

तेव्हाची परिस्थिती आणि टेक्नॉलॉजी पाहता
"आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे." हे शक्य नसावे ...

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Mar 2025 - 9:45 pm | चंद्रसूर्यकुमार

९/११ च्या विमानांमधील प्रवाशांनी घरी कॉल्स केले होते हे त्यावेळेसही आले होते. आता आंतरजालावर पुढील दुवा मिळाला-
https://www.nps.gov/flni/learn/historyculture/phone-calls-from-flight-93...

हा दुवा .गोव्ह डोमेनवरचा म्हणजे अमेरिका सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांपैकी एका पानावर आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 9:39 pm | श्रीगुरुजी

भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता?

यापूर्वी १९७९ मध्ये इंदिरा गांधींना तुरूंगातून सोडा या मागणीसाठी बिहारमधील कॉंग्रेस कार्यकर्ते पांडे बंधूंनी देशांतर्गत विमानाचे अपहरण केले होते. त्यांना नंतर इंदिरा गांधींनी आमदारकी व मंत्रीपदे अशी कठोर शिक्षा दिली होती.

अपहरण झाले आहे हे लक्षात आल्यानंतर पुढे काय होणार, विमान कोठे नेणार, मागण्या काय आहेत हे देवी शरण यांना लगेच समजले असण्याची अजिबात शक्यता नाही. सर्वप्रथम प्रवाश्यांना सुरक्षित ठेवावे व दरम्यानच्या काळात भारत सरकार सुटकेसाठी प्रयत्न करेलच या विश्वासावर अत्यंत कणखरपणे त्यांनी परिस्थिती हाताळली. विमान पाकिस्तानवर आदळा हे सांगणे सोपे असते. जगातील कोणताही वैमानिक त्या प्रसंगात तसाच वागला असता.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Mar 2025 - 10:13 pm | चंद्रसूर्यकुमार

भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता?

तसा आपत्कालीन स्थितीचा- पाण्यावर विमान उतरवावे लागणे, विमानातील इंधन संपलेले असणे, विमानातील काही महत्वाची उपकरणे बंद पडणे, आग लागणे, ऑक्सिजन मास्क खाली येणे, विमानाला भोक पडून सीट बेल्ट न बांधलेले प्रवासी विमानाच्या बाहेर फेकले जाणे वगैरे घटनांचा प्रत्यक्ष सामना करावा लागणारे वैमानिक आणि कर्मचारी तसे कमीच असतात. तरीही यापैकी कोणतीही घटना घडल्यास परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना आणि कर्मचार्‍यांना देतात. १९८० आणि ९० च्या दशकात भारतात विमान अपहरणाच्या कित्येक घटना घडल्या होत्या. १९८० च्या दशकात ६, त्यापैकी १९८४ मध्येच ४ आणि नंतर १९९३ मध्ये भारतीय विमान अपहरणाच्या ४ घटना घडल्या होत्या. त्यामुळे विमान अपहरण झाले तर काय करावे याविषयी काहीही सूचना भारतातील वैमानिकांना दिली गेली नसेल हे असंभवनीय आहे, मला वाटते विमान अपहरण झाल्यास अपहरणकर्ते म्हणतील तसे करा पण प्रवाशांना सुरक्षित ठेवा अशीच सूचना वैमानिकांना दिली जाते.

आपण मरणारच असू तर मरता मरता शत्रूचे नुकसान करू ही 'किलर इन्स्टिंक्ट' आपल्या समाजात नाही. त्यामुळे वैमानिकाने तसे विमान लाहोरमध्ये पाडणे फारच कठीण होते. पण पाडले असते तर चांगले झाले असते. निदान यापुढील काळात तरी तशी वेळ आल्यास वैमानिकांनी तसे करावे असे वाटते.

असो.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 9:20 pm | श्रीगुरुजी

असं काही डोक्यात येण्यासाठी मेंदू शांत असावा लागतो. विमानातील इंधन संपत आलेले, विमानात बॉम्ब घेऊन ४-५ दहशतवादी, विमानात १७० प्रवासी अश्या परिस्थितीत कोणताही वैमानिक प्रवाश्यांच्या सुरक्षेलाच सर्वाधिक महत्त्व देणार. अश्या अपहरणप्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले असते का? विमान नागरी वस्तीवर आदळायचे किंवा कंदाहार्मध्ये क्रॅश लँडिंग करायहे हे सांगायला ठीक आहे. चाच्यांच्या नक्की काय मागण्या होत्या हे त्यावेळी देवी शरण यांना माहिती झाले होते का? प्रत्यक्षात विमानातील १७० प्रवाशांचे प्राण वाचविणे हेच वैमानिकाचे एकमेव काम असते आणि ते त्यांनी प्रचंड दबावाखाली भीषण परिस्थितीत उत्तम पार पाडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 9:36 pm | अमरेंद्र बाहुबली

बुळचट असला म्हणून काय झाले भाजपाचा आहे म्हणून घे बाजू! हा प्रकार अत्यंत डोक्यात जाणारा आहे.

म्हात्रे पूल मात्र यास अपवाद आहे. नाव हीच या पुलाची ओळख आहे. परंतु, पुलावरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे म्हात्रे कोण, असा प्रश्न मात्र जरूर पडत असेल.
तर हे म्हात्रे म्हणजे हुतात्मा रवींद्र म्हात्रे. मकबूल बट्ट या दहशतवाद्याला एका पोलिस अधिकाऱ्याच्या खून प्रकरणात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अमानुल्लाखान या दहशतवाद्याने मकबूल बट्टला मुक्त करण्याची केलेली मागणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धुडकावली. यामुळे अमानुल्ला खानने भारताचे ब्रिटनमधील उपउच्चायुक्त रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण केले. मकबूल बट्टच्या मुक्ततेच्या बदल्यात म्हात्रे यांची सुटका करण्यात येईल, असा प्रस्ताव त्याने समोर ठेवला; पण बट्टची सुटका केली जाणार नाही याची खात्री पटल्यावर म्हात्रे यांची हत्या करून त्यांचे शव बर्मिंगहॅमच्या रस्त्यावर फेकून देण्यात आले. त्यानंतर बट्टला ११ फेब्रुवारी १९८४ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. 'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते. देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांचे नाव या पुलाला देण्याचा ठराव पुणे महापालिकेने केला. या पुलामुळे कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता यांना पर्याय मिळाला आणि आसपासचा परिसर आणखी जवळ आला आहे. तेव्हापासून हा पूल 'म्हात्रे पूल' म्हणून ओळखला जातो. इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी 'मटा'शी बोलताना या इतिहासाला उजाळा दिला.

https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/mhatre-pool-symbol-...

इंदिरा गांधींना ही बुळचट पणा दाखवून अतिरेक्यांपुढे गुडघे टेकण्याची संधी होती पण त्या भाजपच्या नव्हत्या नी देशभक्त देखील होत्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 9:39 pm | अमरेंद्र बाहुबली

'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते.
असे सात्वन त्या व्हीआयपीच्या आई वडिलांचेही करता आले
असते भाजपेयीना! पण भाजपेयींच्या दृष्टीने देश कधीही महत्वाचा नसतो!

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 9:43 pm | श्रीगुरुजी

अजिबात अक्कल नसलेला इतका मूर्ख माणूस वारंवार प्रत्येक धाग्यावर अत्यंत मुर्खासारखे बरळत असतो, याची शरम वाटते.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2025 - 9:44 pm | श्रीगुरुजी

मिपावर येणे थांबवावे असे वाटू लागले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 9:47 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रतिवाद करणे जमत नसेल तर तसे सांगा! वर मी इंदिरा गांधींचेही उदाहरण दिले आहे, ते पण बरळणे का? असो! ह्यापुढे मी तुमच्या कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद करणार नाही!

सुबोध खरे's picture

28 Mar 2025 - 10:25 am | सुबोध खरे

श्रीगुरुजी

कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

कळफलक आहे म्हणून तो बडवलाच पाहिजे या मनोवृत्तीच्या माणसाशी वाद घालण्याचा फायदा काय?

पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते.

कवीवर्य सुधीर मोघे म्हणतात,
मनं काळोखाची गुंफा,मनं तेजाचे राऊळ

मनाचा ठाव कुणालाच लागत नाही.......

शिख समुदाय हा अतिशय धार्मिक आपल्या धर्मासाठी काहिही करण्यास तयार असतो. काहिही म्हणजे स्वताचे प्राण सुद्धा. शिखांच्या गुरूनीं स्वता आणी कुटुंब धर्म रक्षणार्थ खर्ची घालून एक उदाहरण कायम केले. अशा कट्टर समुदायाच्या खोलवर, शतकानुशतके रूजलेल्या श्रद्धास्थानवर हल्ला झाला तर समुदाय काय आणी कसे रिऍक्ट करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. शतकानुशतके इमानदार आणी कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ अशा शिख पलटणीने उठाव केलाच ना! मग अफवा, चिथावणी,गैरसमज, राजकारण काहीही कारण असो.

तत्कालीन पंतप्रधान यांनी भावना,राजकारण इत्यादीच्या अहारी जाऊन सुरक्षा सल्लागारांची म्हणणे डावलले. दोन अंगरक्षक तात्पुरते हटवले असते तर पुढचे परिणाम झाले नसते. यातही अनेक निरपराध लोकंच गेले त्यात शिखांची संख्या जास्तच असेल.

चार वर्ष पंजाब मधे ऑपरेशन ब्लू स्टार च्या कालावधीत बघितलेली,अनुभवलेल्या परिस्थितीनुरूप माझे मत बनले आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीच्या काळात मी दिल्लीतच होतो.

हे माझे वैयक्तिक मत आहे. इंदिराजी एक सशक्त प्रधान मंत्री होत्या यात शंकाच नाही तसेच शिख समुदाय या बद्दल ही नितांत आदर आहे.

@अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे.

चांगला लेख आणि चांगले माहितीपूर्ण प्रतिसाद!

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2025 - 10:17 am | अमरेंद्र बाहुबली

@अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे.
माफ करा कर्नल साहेब! पण देशासाठी भावना वगैरे बाजूला ठेवून कर्तव्यदक्षता दाखवणे सोपे नाही. इंदिराजींनी ते दाखवले! असो! विषयांतर होईल इथे म्हणून जास्त लिहीत नाही. हवे तर खफ वर लिहिता येईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Mar 2025 - 10:33 am | चंद्रसूर्यकुमार

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते.

आपल्याकडे बोफोर्स प्रकरण गाजत होते तेव्हा बोफोर्स कंपनी स्वीडनची असल्याने तिथेही काही प्रमाणात ते प्रकरण गाजत होते. त्यावेळेस स्वीडनचे पंतप्रधान ऑलेफ पामे यांची राजधानी स्टॉकहोममध्ये हत्या झाली. ती कधी? तर ते चित्रपटगृहातून चित्रपट बघून बाहेर पडून रात्री मेट्रो स्टेशनवर जात असताना. म्हणजे देशाचे पंतप्रधान सामान्य लोकांप्रमाणे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतात, इतकेच नव्हे तर मेट्रो पकडून आपल्या घरी परत जातात ही परिस्थिती तेव्हा तिकडे होती. फुकाच्या मानवतावादाच्या मागे लागून निर्वासितांच्या नावावर रानटी टोळ्या आपल्या देशात घेण्यापूर्वी स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे हे नॉर्डिक देश हे सर्वार्थाने भूतलावरील स्वर्ग होते असे म्हणायला हवे. पण आता नाही :( ओलाफ पामेंच्या हत्येच्या संदर्भात सुरक्षायंत्रणांना काही खबरा मिळाल्या होत्या की नाही कल्पना नाही. की १९८० च्या दशकात पंतप्रधानांसाठी खूप सुरक्षाव्यवस्था ठेवायचीच मुळात गरज वाटली नव्हती कोणाला माहिती.

अमेरिकेतील २००८ च्या अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल लागल्याच्या दुसर्‍या दिवशी पराभूत उमेदवार आणि अ‍ॅरिझोनाचे सिनेटर जॉन मॅककेन फिनिक्स शहरात सुपरमार्केटमध्ये खरेदी करत होते हे त्यावेळेस बातम्यांमध्ये बघितल्याचे आठवते. आपल्याकडे असे होईल का?

नेटफ्लिक्सवर पूर्वी 'रोड टो द व्हाईट हाऊस' म्हणून एक मस्त सिरीज बघितली होती. दुर्दैवाने ती सिरीज आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध नाही. त्यात बघितले की बिल क्लिंटन १९९२ च्या निवडणुकांमध्ये जिंकले. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे नोव्हेंबर १९९१ मध्ये ते त्यांच्या सहकार्‍याबरोबर वॉशिंग्टन डी.सी मध्ये एका कॅफेमध्ये कॉफी प्यायला गेले होते. त्यावेळेस बिल क्लिंटन हे अरकॉन्सॉ या राज्याचे गव्हर्नर होते. आपल्याकडे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री- समजा देवेंद्र फडणवीस, नितीश कुमार किंवा सिद्दरामय्या वगैरे दिल्लीत अशा कोणत्या ठिकाणी जाऊन सहजपणे वावरतील का? शक्यता कमी.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 10:21 pm | अमरेंद्र बाहुबली

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते.
गेले २ दिवस हा व्हिडिओ शोधत होतो, शेवटी मिळालाच!
बल्गेरियाच्या अध्यक्षांचा हा मजेशीर व्हिडिओ नक्की पहा!
https://youtu.be/UXpdzojh27c?si=NToE3zRlxB-m5vX2

सुबोध खरे's picture

27 Mar 2025 - 7:13 pm | सुबोध खरे

बहुसंख्य युरोपीय देशांत अनेक पक्षांचे कडबोळे सरकार असते त्यामुले एका वर्षात तीन चार पंतप्रधान पण असू शकतात.

अगदी इंग्लंड मध्ये सुद्धा गेल्या १० वर्षात सहा पंतप्रधान झाले आणि फ्रान्स मध्ये सात. ( फ्रान्स मध्ये पंतप्रधानापेक्षा राष्ट्राध्यक्ष जास्त महत्त्वाचा असतो)

Italy has its 68th government in 76 years. Why such a high turnover?

https://www.euronews.com/my-europe/2022/10/21/italy-is-set-for-its-68th-...

त्यामुळे एक पंतप्रधान "गेला" तर तितका फरक पडत नाही.

याउलट भारतात, अमेरिकेत, चीन मध्ये किंवा रशिया सारख्या देशात पंतप्रधान/अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्याच्या केवळ आजारी पडण्यामुळे किंवा जखमी होण्यामुळे फार मोठी उलथा पालथ होऊ शकते. यामुळे या देशांत पंतप्रधान/अध्यक्ष याना प्रचंड सुरक्षा व्यवस्था लागते.

जॉर्ज सोरोस सारखे पाताळयंत्री जगभर अशी उलथापालथ करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत असतात. आताच अमेरिकन निवडणुकीपूर्वी श्री ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्यातून ते सुदैवाने वाचले.

यातून इस्लामी दहशतवाद जन्माला आल्यापासून जगभर सुरक्षा व्यवस्थांचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

९/११ झाल्यानंतर विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेसाठी प्रचंड पैसे आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे.

२००० साली गोव्याला मी आईला सोडण्यासाठी लष्करी गणवेशात विमानापर्यंत गेलो होते. आता हि गोष्ट अशक्य आहे.

बाकी श्री लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला. अशीच स्थिती डॉ होमी भाभा आणि अनेक अणुशास्त्रज्ञांची झाली आहे.

11 Indian Nuclear Scientists Died Unnatural Deaths in 4 Years:https://www.ndtv.com/india-news/11-indian-nuclear-scientists-died-unnatu...

हि २०१५ ची बातमी आहे. यानंतर भारत सरकारने त्यांची सुरक्षा आणि गुप्तहेरखाते यायचा भरीव वाढ केली आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली

वर चर्चा झालेल्या कंदहार प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे:

1. अमृतसरमध्ये वेळ वाया घालवणे – अपहरणकर्त्यांना मदत?
• विमान अमृतसरमध्ये 45 मिनिटे थांबले होते, आणि तेव्हा कारवाई करणे सर्वांत सोपे होते.
• एनएसजी (कमांडो) पथक वेळेत पोहोचले नाही, आदेश मिळाले नाहीत, आणि विमान सहज निघून गेले.
• काही अहवालांनुसार, हा उशीर मुद्दाम घडवून आणण्यात आला.

2. सरकारला आधीच माहिती होती?
• अपहरण झाल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणांना “हायजॅकिंगचा धोका” असल्याची माहिती मिळाली होती.
• तरीही नेपाळमध्ये सुरक्षा ढिसाळ ठेवण्यात आली आणि अपहरणकर्ते सहज आत गेले.

3. सरकारने दबाव न आणता दहशतवाद्यांना सहज मागण्या मान्य केल्या?
• तीन कुख्यात दहशतवाद्यांची सुटका तर केलीच, पण त्यांच्यासोबत काहीशे कोटी रुपयेही दिले गेल्याची शक्यता आहे.
• मसूद अझहर, उमर शेख यांना सोडल्यामुळे पुढे 2001 चे संसदेवरील हल्ले आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यासारख्या मोठ्या दहशतवादी घटना घडल्या.
• जर सरकार खरोखरच प्रयत्न करत असते, तर किमान एक-दोन अटींवर तडजोड करून हा सौदा केला असता.

4. कंदहारला विमान जाऊ दिल्यावर भारत हतबल बनला – हे ठरवून केलं गेलं?
• एकदा विमान तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदहारमध्ये गेले की, भारताला लष्करी कारवाई करणे अशक्य होणार हे सरकारला माहीत होते.
• मग “आमच्याकडे पर्याय नव्हता” असा प्रचार केला गेला.
• जर सरकारला थांबवायचे असते, तर अमृतसरमध्येच एखादी युक्ती केली असती.

5. सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि गुप्त डील?
• तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी नंतर सांगितले की, “मी या निर्णयाच्या विरोधात होतो, पण मला वेगळ्या परिस्थितीबद्दल सांगण्यात आलं.”
• यावरून असे वाटते की सरकारच्या उच्च पातळीवर काही वेगळाच खेळ सुरू होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Mar 2025 - 11:04 pm | अमरेंद्र बाहुबली

एक प्रश्न आहे, समजा आज भारत पाकिस्तान बांगलादेश मिळून अखंड भारत असता! भारत आज राजकारणाच्या बाबतीत बराच सुशिक्षित आहे, सत्ता मिळवायची म्हणून मोठ्या नेत्यांच्या हत्या भारतात झालेल्या नाहीत, इंदिरा गांधी नी राजीव गांधी ह्यांच्या हत्या झाल्या पण त्यामागे मोठे राजकीय कारण होते त्या हत्या कुणातरी नेत्याने आपल्या मार्गातील काटा काढावा म्हणून झालेल्या नाहीत, पण पाकिस्तानात मात्र अश्या हत्यांची मोठी परंपरा आहे, समजा अखंड भारत असता तर आज पाकिस्तातील नेते भारतीय नेत्यात राहून सुशिक्षित राजकारणी असते की भारतीय राजकारणी त्यांच्यात राहून बिघडले असते?

रात्रीचे चांदणे's picture

28 Mar 2025 - 5:58 am | रात्रीचे चांदणे

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती. फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Mar 2025 - 9:54 am | चंद्रसूर्यकुमार

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती.

सहमत आहे.

pathan

असल्या घाणीबरोबर आपण सुखाने राहू शकलो असतो अशी कल्पना करणेच मुळात चुकीचे आहे.

फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.

सहमत. फाळणी झाली त्यात लाहोर तिकडे गेले हे वाईट झाले. १९४७ मध्येही लाहोरमध्ये हिंदू आणि शीख बहुसंख्या होती. असे म्हणतात की नेहरूंना काश्मीरला (खरं तर जम्मूला) भारताशी जोडणारा एकमेव रस्ता पठाणकोटमार्गे जात होता त्यामुळे पठाणकोट असलेला गुरदासपूर जिल्हा भारतात पाहिजे होता. त्या जिल्ह्यात ५१% मुस्लिम होते आणि ४९% हिंदू-शीख. एक शक्करगड तालुका वगळता उरलेला गुरदासपूर जिल्हा भारतात आला. आणि त्या बदल्यात लाहोरवरील हक्क सोडला. खखोदेजा. त्यातून वाईट असे झाले की मार्च-एप्रिल १९४७ मध्येच रावळपिंडी आणि वायव्य सरहद्द प्रांतात दंगली सुरू झाल्यावर सुरवातीला अनेक हिंदू आणि शीख निर्वासित लाहोरला आले कारण लाहोर पाकिस्तानात जाणार नाही हा विश्वास होता. त्यांना दुसर्‍यांदा विस्थापित व्हावे लागले.

पाकड्यांच्या मागण्या तर भयानक होत्या. त्यांना दिल्ली आणि कलकत्ता पण पाकिस्तानात हवे होते. दिल्ली शहरात त्यावेळी थोडीशी मुस्लिम बहुसंख्या होती. जो काही पाकिस्तान मिळाला त्याला ते 'मॉथ इटन पाकिस्तान' असे म्हणायचे.