बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय?
मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.
आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात. हायची सरासरी ओलांडली असल्याने ते मार्केटमध्ये "बैलांचे" आगमन झाले आहे. पण माझ्यामते हे "देशी बैल" (डीआयआय) आहेत.
आकृती २- निफ्टीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. हे मी विकसित केलेले अत्यंत गुणी आणि भरवशाचे तंत्र मार्केट वर/खाली (५/९५%) जायच्या संभाव्यता अतिशय अचूक दाखवते.
आकृती ३ - सोन्याचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. सोने वर/खाली (१७/८३%) जायच्या संभाव्यता
आकृती ४ - युयुत्सुनेटचे पुढील आठवड्याचे भाकीत - मार्केटमध्ये थोडी नफेखोरी होण्याची शक्यता.
जाताजाता - मार्केट "प्रेडीक्ट" करता येते का? असे जर कुणी विचारले, तर माझे उत्तर सध्यातरी "ठराविक मर्यादेत (अल्पकालीन दिशेपुरते) नक्की "प्रेडीक्ट" करता येते असे आहे...
युयुत्सुनेटचे मागील भाकीत - https://www.misalpav.com/node/52793
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
प्रतिक्रिया
22 Mar 2025 - 11:25 am | आंद्रे वडापाव
तसा मी मिपावर शनिवार रविवार फिरकत नाही ..
पण युयुत्सु आपल्या या भाकितासाठी एक डोळा ठेवून येतो गेल्या काही आठवड्यांपासून ...
आपल्या भाकिताजवळपास माझीही या येत्या आठवड्यकडून अपेक्षा आहे ..
देशी बैल २३७०० पर्यंत नेल्यासारखं दाखवतील पण बाजार तिकडून पलटी मारेल ६६% अपेक्षा
किंवा सरप्राईस देण्यासाठी २४७०० पर्यंत नेतील अन तिकडून पलटी मारतील ३४% अपेक्षा ...
पण आपल्या अपेक्षांना बाजार काय भीक घालेल (अशी भीती माझ्या मनात ) जर मी (ऍव्हरेज पर्सन) या अपेक्षा ठेवून आहे ... हे तर ऑपेरेटर्सला सुद्धा माहिती असेल ... म्हणून ते कधी दारामागून येऊन आपल्याला भॉ करून दचकवतील ... त्यामुळे हीच धाकधूक ठेवून घाबरत घाबरत एक एक दिवस घालवावा लागतो मला ...
22 Mar 2025 - 11:30 am | युयुत्सु
२४७०० हा आकडा कुठून काढला
22 Mar 2025 - 1:37 pm | आंद्रे वडापाव
२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )
२४७०० हा दुसरा रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )
22 Mar 2025 - 2:37 pm | आग्या१९९०
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर बॉटच्या जवळ असल्याने प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाढली आहे. मार्च अखेरचा निफ्टी रेसिस्टेन्स २४३८१ आहे.
22 Mar 2025 - 6:26 pm | युयुत्सु
आग्या१९९०
मालक, RSI आणि इतर अनेक इंडिकेटरचा पार चिपाड होई पर्यंत कीस काढला आहे. त्यात असे लक्षात आले की त्याला प्रेडीक्टीव्ह व्हॅल्यू काहीही नाही. तो lagging indicator आहे. RSI ठराविक असताना व्हॉल्युम कसा अहे यावर त्याची उपयुकतता ठरते.
22 Mar 2025 - 7:22 pm | आग्या१९९०
बरोबर आहे. कुठल्याच एका इंडिकेटरवर भरोसा ठेवून ट्रेडिंग करणे धोकादायक असते. तरीही ठराविक इंडिकेटरचा वापर करून चांगला नफा कमावता येतो.
22 Mar 2025 - 1:46 pm | श्रीगुरुजी
परकीय चलन बाजार, विशेषतः युरोसाठी, काय भाकीत आहे? आजचा भाव १ युरो = ९३.०८७० आहे. ९२ पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे का?
22 Mar 2025 - 6:19 pm | युयुत्सु
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल असा माझा अंदाज आहे. कधी ते सांगता येत नाही. युयुत्सुनेट इथे वापरता आले नाही कारण व्हॉल्युम उपलब्ध नाही.
23 Mar 2025 - 12:00 pm | युयुत्सु
इकड्चं तिकडचं
१. काल एक माहितीपट बघत असताना काही मनोरंजक माहिती समजली की डीपसिकचा संस्थापक अगोदर एक ट्रेडर होता आणि हेज फंड चालवायचा. त्याने तयार केलेल्या अल्गोरिदमने खुप पैसा मिळवून दिला. या पैशातून त्याने जीपीयु खरेदी केले आणि डीपसिक ए०आय० ची निर्मिती केली.
२. ग्रोक ए०आय० ने भारत सरकारला उचकवलं असलं तरी "संशोधन-मदतनीस" म्हणून त्याचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. त्यात थापा सध्यातरी कमी सापडल्या आणी अहवालाचा दर्जा उत्तम होता
भारतीय लोक अजूनही ए०आय० बद्दल किरकिरच जास्त करत आहेत. ग्रोक वर बंदी घातली तर मी सरकारवर बंदी घालणार हे मात्र नक्की :)
23 Mar 2025 - 12:42 pm | आंद्रे वडापाव
अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी, ग्रोक आहे...
चायना कडे डीप सिक आहे, कारण त्यांच्याकडं
सायंटिफिक टेम्परामेंट आहे, ए आय त्यांची प्रायोरिटी आहे...
आपल्याकडे औरंगजेबचा आत्मा आहे...
27 Mar 2025 - 5:28 am | वामन देशमुख
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे भाकीत खरे होताना दिसत आहे, अजून दोन दिवस आहेत हा आठवडा, महिना आणि वर्ष संपायला.
---
या धाग्यावर तरी अप्रस्तुत प्रतिसाद येऊ नयेत ही वेडी आशा.
27 Mar 2025 - 7:52 am | युयुत्सु
तुम्ही मनापासून दिलेली दाद उत्साहवर्धक आहे. मनःपूर्वक धन्यवाद!