रासपुतीन ते पुतीन (ऐसी अक्षरे -२३)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Jan 2025 - 4:52 pm

रासपुतीन ते पुतीन -
लेखक-पंकज कालुवाला
२
आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले. यात आतापर्यंत रशियाचे नेतृत्व ज्यांनी केले त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा आहे. रशिया एका मोठा भूभाग असलेला प्रदेश इतकीच सामान्य माहिती. रशियाबाबत बरीच माहिती मिळाली, इतर वाचकांसाठी ही माहिती अधिक नसेल पण माझ्यासाठी भरपूर म्हणावी लागेल.
१
१.रशियात झारराज्याचे साम्राज्य कायम संकटात होते, कामगारचळवळ महायुद्‌ध अशा अनेक संकटात रासपुतिन सारख्या पाखंडी बाबाचा त्यांनी आधार घेतला? सुरूवात वैयक्तिक कारणांमुळे - मुलाची तब्येत ठीक करणे होते. पण या रासपुतिनने हळहळू सर्व घराणे, इतर लोकांना कट्पुतली केले होते.
रास पुतिन ...किती खुनशी दिसत आहे...
३
२.१९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर सोव्हिएट कम्युनिस्ट पर्व सुरु झाले. यात 'बोल्शेिविक' (Majority faction] मेन्शिविक (Minority) हे रशियन डेमोक्रेटिक पार्टीचे भाग समजले.

३.लेनिन व स्टॅलिन यांची वैयक्तिक माहिती समजली. लेनिनचे मार्क्स विचारांनी भारून जाणे, त्याच्या भावाला विद्यार्थी दशेत सरकार विरोधात कामे केल्याने फाशीची शिक्षा सुनावली होती.
४
४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता?

५.नंतरच्या काळातल्या अध्यक्षांच्या कारकीर्द देखील सत्ता सांभाळण्यात कशा घडत होत्या ते समजले. जवळपास सर्व अध्यक्षांचे लहानपणीचे आयुष्य हलाकीचेच होते. कोणीही फार शिकलेले नव्हते

६.ज्याप्रमाणे काळ्या पाण्याची शिक्षा ही अत्यंत क्रूर , अमानुष जाणली जाते.त्याप्रमाणे रशियात सायबेरिया सारख्या अत्यंत थंड हवामान असलेल्या शहरात आरोपींना नजरकैद/तडीपार केले जात.जिथे जगणे खुपच कठीण होईल.अनेक जण पळून फ्रान्सला व इतर ठिकाणी जात.

७.पुढे १९९१ ला de-Stallinization करायला अनेक अध्यक्षांनी वेळ दिलाच पण सैन्य ताकदही सर्वांनीच कायम वाढवली.

८.१९९१-सोव्हियट युनियनची पडझड होऊन एक मुक्त व्यापर-संस्था उदयास येऊ घातली. यात पहिले अध्यक्ष होते बोरिस येल्तसिन, पण त्यांच्यावर अनेक भष्ट्राचाराचे आरोप झाले. एकंदरीत मुक्त व्यापार स्वीकारतांना भष्ट्राचाराची कीड रशियाला लागली.

९.२००० पासून आतापर्यंत व्लादिमिर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष - उपपंतप्रधान - राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन हे लहानपणा-पासून हुशार, कराटे चंपियन होते. ते रशियन गुप्तहेर संस्थेत २६ वर्षे कार्यरत होते. पुलिन हे मितभाषीपण अत्यंत खंबीर नेतृत्व म्हणून रशियाच्या सत्तेत वारंवार निवडून आले.अनेक वर्षे सत्तेत राहूनही २०१२ मध्ये घटनाबदल करून ते पुन्हा सत्तेत आले.
५
पुतीन यांनी आधीच्या काळात अमेरिकेशी संबंध सुधारलेले होते एडवर्ड स्टोनेडच्या निमित्ताने ते बिघडले आजपर्यंत. आता प्रश्न असा की पुतीननंतर पुढील अध्यक्ष कोण असेल? जो अजूनही उदयास आलेला दिसत नाही...

राजकारणसमीक्षामाहिती

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jan 2025 - 6:31 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त पुस्तक परिचय!
४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता?
हो स्टॅलिन ने खूप लोक मारली, इतकी की हे मृत्यू नी छळ पाहून त्याच्या बायकोने आत्महत्या केली. पण त्याबरोबर त्याने रशियात मोठी औद्योगिक क्रांती घडवली. गावोगावी खेडोपाडी वैद्यकीय सुविधा पोहोचवल्या. स्टॅलिनचे शब्द हे दुसऱ्या महायुद्धात रशियन लोकाना धैर्य द्यायचे काम करायचे. स्टॅलिनवर प्रभावित होऊन पेरियार यांनी तामिळनाडूतील मुलाना स्टॅलिन नाव द्या म्हणून अनेकांना सुचवले नी तामिळनाडूच्या गल्लोगल्ली छोटे छोटे स्टॅलिन पळू लागले. आज तामिळनाडूचा मुख्यमंत्री “स्टॅलिनच” आहे.

या नियमाने आपल्याकडे कर्ण...करण नाव ठेवलं जाते.कर्ण अधर्माकडून होता तरीही तो खुप दयाळु होता.. ;);)

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Jan 2025 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहा सहमत. ताई रसपुतीन किंग्समन सिनेमाच्या दुसऱ्या की तिसऱ्या भागात मस्त चितारलाय. नक्की बघ सिनेमा.

लेखकाची-पंकज कालुवाला यांची प्रतिक्रिया
दुसऱ्या ठिकाणी हा पुस्तक परिचय दिला होता.बहुतेक राजकीय हत्या पुस्तक घेईन
Bhakti धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. शक्य असल्यास राजकीय हत्या, भारत-चीन युद्ध १९६२, इस्रायलची मोसाद व गुप्तचर संस्थांवरील इतरही पुस्तकं मिळवून वाचावी ही विनंती. पुन्हा एकदा आपला आभारी आहे.

रशिया बद्दल अजुन काही मनोरंजक पद्धतीने वाचायचे असेल तर, राशा नावाचे पुस्तक जरूर वाचा..

लिंक देतो...https://www.amazon.in/-/hi/Sharad-Varde/dp/B08PVDNZ8Z

जाता जाता, शरद वर्दे, यांची इतर पुस्तके पण उत्तम आहेत...