बडिशोप

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 Jan 2025 - 6:30 am

बडीशोप काही गोड नाही,
ती फार मोठी खोडंही नाही .
तंबाखू सारखी वाट लावणारी,
ती सर्वांगिण ओढंही नाही .

हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही !

तशी ही सोपी आहे
साध्या सहज स्वभावाची
कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम
जो हातावर घेइल , ती त्याची !

आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ?
अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय !

आय आय आय !
आला ना आवाज आतून ?
हाय हाय हाय !
भाजला ना गाल त्यातून ?

आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी !
म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत
तुमच्या सगळ्याच गेमि !

अहो तंबाखू कुटं ? सौफ कुटं ? दोघींचा काही संबंध आहे का ?
हिनी नुसती तल्लफ भागती,
तिनी कॅन्सर होत नाय का ?

तिचाच नाद सोडून आम्ही
हिच्याकडं आलो . .
आणि थोड्या दिवसातच
हिचेच झालो !

आता हि ही आम्हाला
तिच्यासारखीच वाटू लागलीये .
कारण दिवसातनं सात आठ वेळा
हि ही भेटू लागलीये !

नादच आहे खुळा मला
कुणाला तरी भेटण्याचा !
जेवढा मिळेल तेवढा आनंद घेऊन
तो चार चौघात वाटण्याचा !

म्हणून निमित्त काढून बडीशोपेचं
मी तंबाखूवर कविता केली
जास्त राडा न घालता,
जशी आली तशी तुम्हाला दिली !

सांगायचे कारण इतकेच की आता मी निकोटीन मुक्त आहे !
फक्त मन माझे वाट पाहते,
की कधी मी व्यसनमुक्त आहे ?

आसक्तता ही मूळची ,
वरची पुटे नंतर !
आत्ता एवढेच कळलंय,
बाकीचं सांगतो . . समजल्यानंतर !
-------------------------

कविता माझीप्रेरणात्मकफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमिक्स फ्रुट जॅममुक्त कविताशांतरसऔषधी पाककृतीमौजमजा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2025 - 7:30 am | कर्नलतपस्वी

आता आवळा सुपारी वर लिहा.