तू आहेस ?? की हा तुझा भास आहे ??
वार्याच्या झुळकेमागोमाग आपसुक
येणारा मोगऱ्याचा धुंद सुवास ??
छे ! हा तर तुझाचं गंध खास आहे....
वही उघडता तुझा चेहरा दिसू लागतो
मी ही मग तुला आवडल्या असत्या,
अशाचं कविता उलगडू लागतो, तेव्हाही,
तू पानभर ओसंडून नुसती दरवळत असतेस…
काळ्याभोर आकाशात चंद्राकडे पाहताना
ढगांच्या आडून तुचं डोकावताना दिसतेस,
दुर पार क्षितिजाच्या पल्याड, पहाट-पालवी
उगवेपर्यंत माझ्याबरोबरीने जागी राहतेस...
रखरखत्या उन्हात निरर्थक भटकताना
मला हळुचं सतत निरखून पाहत बसतेस,
थकून कुठं टेकायला जावं तर आधीचं
शेजारी वाट पाहत बसलेली असतेस...
डोळे मिटावे घटकाभर तर स्वप्नातही
पाठ सोडीत नाहीस, आपल्या 'दोघांचाचं'
असा एकही क्षण अस्तित्वात नसताना
तू जिथे-तिथे, सगळीकडेचं कशी पोहोचतेस ??
आषाढी काळमेघांनी झाकोळल्या
आठवणी दाटून घनगर्द झाल्यात,
आकाशातल्या चांदण्या नाहीशा होऊन
तुझ्या विटकरी ओढणीवर पसरल्यात...
जिकडे-तिकडे, नुसते भास-आभास
आणि आठव-सावल्यांचेचं खेळ,
स्वप्न आणी वास्तवाचा, आता
मुळी घालताचं येत नाही मेळ.....
तरीही, हा भास नाही,
नक्कीचं !!! हा भास नाहीचं...
खरंच !! तू अजूनही आत काळजात
कुठेतरी खोल रुतून आहेस खासं !!!
- चक्कर_बंडा