सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
30 Sep 2024 - 7:50 pm

आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे.

बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच.

आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc

सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा.

दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA

बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

संस्कृतीकलानृत्यसंगीतप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2024 - 9:05 pm | चौथा कोनाडा

व्वा ... मस्त माहिती !
दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला !
टाळ मृदंग दिंडी क्लासिकच !
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो.

मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार :
ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं !

धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

अथांग आकाश's picture

1 Oct 2024 - 11:11 am | अथांग आकाश

खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !

+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti's picture

1 Oct 2024 - 10:34 am | Bhakti

अगदी बरोबर!
लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे.
ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे.
https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk
अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2024 - 8:41 pm | चौथा कोनाडा


लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा

एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे.
आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब !
कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2024 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं.

पण भारीय. सगळं.

-दिलीप बिरुटे