African Love Bird

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
26 Sep 2024 - 8:30 pm

lm2

चित्रकार कसरत
-
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा

संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले......

पण तसे काही नाही. मुसळधार पावसात घर चुकलेल्या मुक्या प्रेम पक्षाची करूण कथा आहे.
lm
-
महादेव वाडी रखीव वन
-
"पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर",

असेच काहीसे वातावरण.रात्रीचे दहा वाजले होते.दरवाजे बंद करण्या अगोदर जरा लाॅबीत डोकावून बघण्याची नेहमीची सवय. मुख्य दरवाजातून बाहेर न पडता स्वयंपाक घरातील छोट्या दरवाज्यातून बाहेर पडलो. बरोबरच आमचं शेपूटही (ग्रॅण्ड डाॅटर)बाहेर आलं.दुपार पासून पडत असलेला मुसळधार पाऊस थोडा कमी झाला होता पण थांबण्याचे नाव घेत नव्हता.खिडकी उघडी होती व पावसाचे पाणी आत आले होते. रात्रभर पाऊस झाला तर लाॅबीत पाणी भरेल म्हणून खिडकी बंद केली अन मागे वळालो.
lm3
-
तेव्हढ्यात नात हळूच ओरडली,"नानू", किती सुंदर पक्षी आहे बघा ना!".भिजल्यामुळे अगांतूक पाहूणा थोडासा गारठलेला दिसला. मुख्य व लोखंडी सुरक्षा दरवाज्यां मधल्या काळ्या ग्रॅनाईटच्या उंबरपट्टीवर बसला होता. कुठून आला याची मुळीच कल्पना नव्हती. खरोखरच सुंदर पक्षी होता.त्याचा अप्परपार्ट, मानेपासून पंखांपर्यंत निरभ्र आकाशी रंगाचा, मान व डोके पाढंरेशुभ्र,अंडरपार्ट्स गळ्यापर्यंत हलक्या आकाशी रंगाचा,फिक्कट गुलाबी रंगाचे छोटेछोटे पाय, हल्की गुलाबी छटा असलेली इवलीशी चोंच.जीव मुठीत घेऊन बसला होता,घाबरलेला वाटत होता.डोक्यावर तिक्ष्ण वस्तूचा घाव किवां कशाला तरी धडकल्या मुळे डोक्यावर जखम झाली होती पण रक्तस्त्राव होण्या इतपत नव्हती.तेथील केस उपटल्या सारखे वाटत होते. सतत चालू असलेल्या पक्षी निरीक्षणामुळे,एकंदरीत सदर पक्षी देशी, स्थानिक परिसरातील नाही हे प्रथम दर्शनीच लक्षात आले होते.

दारात भेदरलेल्या अवस्थेत बसलेल्या त्या सुंदर पक्षाला पाहून कविवर्य बोरकर यांच्या कवितेतील दोन ओळी आठवल्या.

काय सांगावे नवल,दूर रानिची पाखरे
ओल्या अंगणी नाचता,होती माझीच नातरे..

उम्र का तकाजा है....गद्धेपंचविशीत असतो तर .....
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलय डौलात....

असे काहीतरी सुचले असते.

काही झालं तरी, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा",जित्याची खोड मेल्या नंतरच जाणार.

नातीला घरातून मऊ रुमाल व प्लास्टिकची दुरडी (बॉक्स) आणायला पिटाळले.तोवर आत बातमी पोहचली,सोफ्यावरून सूचनांचे तोफगोळे अंगावर पडायला सुरवात झाले.(याचा अंदाज घेण्यासाठी माझी कवीता जरूर वाचा.(प्रमोशन झाले)).माझी कवीता
-
LB10-LB3
-
तोफगोळ्यांकडे दुर्लक्ष करत,मऊ रुमालात अगांतूकाला गुंडाळले व हळूच दुरडीत ठेवले. घरात घेऊन आलो.नातीने पटापट छोट्या वाटीत पाणी,चिमुकल्या मुठीत तांदुळआणले. तीची लगबग पाहून मला मजा वाटू लागली. नवा पाहुणा सर्वांनाच आवडला होता.त्याला बाल्कनीत मोकळा सोडला.दुरुनच निरिक्षण करीत उभे राहीलो.तीन चार दाणे तांदुळाचे खाल्ले आणी दोन तीन थेंब पाणी पिल्यावर त्याला थोडा हुरूप आल्या सारखा वाटला. त्याची हालचाल वाढली आणी तो या कुंडीतून त्या कुंडीवर उड्या मारू लागला. मन सुखावून गेले. नात पण आनंदित झाली व हळूच त्याला स्पर्श करायची हिम्मत करू लागली. आपण त्याला गोलू म्हणू असे म्हणून बारसेही केले.सोफ्यावरून फर्मान आले,याला बॅकयार्ड किंवा जंगलात सोडून या.

थोड्याच दिवसापुर्वी मी बघीतले होते की बॅकयार्ड मधे एका कावळ्याला,इतर आठ दहा कावळ्यांनी मिळून ठार मारला होता. कारण काय ते कळाले नाही.हा स्थानिक पक्षी असता तर कदाचित सोडूनही आलो असतो.

रंगरूपाने सुंदर, छोटा गोलमटोल पक्षी लगेचच स्वतंत्र पणे खेळू लागलेला पाहून वाटले की हा नक्कीच कुणी तरी पाळलेला आहे.याला माणसांची सवय आहे.मोकळीक होती तरी तो दूर उडून जाण्याचा प्रयत्न करत नव्हता. याला जर खुल्या आकाशात सोडले तर शिकारी पक्षी याचा एका मिनीटात चट्टामट्टा करतील.

अचानक आठवले जवळच पक्षी पेट शाॅप आहे.कदाचित तेथून फरार झालेला तर नसेल ना? काही का असेना तेव्हां मुख्य मुद्दा शिकारी पक्षांपासून सुरक्षा हा होता.सोसायटीत आणी अवतीभोवती कावळे घार,शिक्रे भरपुर आहेत.

पक्षी निरिक्षण करता करता बरेच पक्षीमित्र सुद्धा भेटले. असे काही म्हणतात,

मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्ति
गावश्च गोभिः तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खैः सुधियः सुधीभिः
समान-शील-व्यसनेषु सख्यम्॥

काही खुपच जवळ आले.काही नेहमीच्या संपर्कात तर काही नुसतेच भ्रमणध्वनीतल्या यादी मधले.असो,नेमका कुठल्या प्रकारचा पक्षी माहीत नसल्याने व रात्री याचे काय करायचे,जखमी आहे तर काही वैद्यकीय मदत कशी मिळेल ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरा साठी कायप्पावर पक्षीमित्रां कडे धाव घेतली.रात्रीचे दहा,सव्वा दहा वाजले होते. कुणी पलटून उत्तर देईल याची शाश्वती नव्हती.अनपेक्षित पणे धडाधड मेसेजेस येण्यास सुरवात झाली. पक्षाचे नाव, खाणे,पिणे,अशावेळेस काय करावे एक ना अनेक सुचना येवू लागल्या. प्रत्येकजण पक्षी पाळीव असवा असेच बोलत होता.सोसायटी मधे विचारा इत्यादी.काहीजण तर त्याला ॲडाॅप्ट करायला तयार झाले. एव्हढ्या रात्री कोथरूड, पाषाण, वडगावशेरी अशा दूरदराज क्षेत्रातून येण्यास तयार होते. जवळपास पन्नास एक मेसेजेस त्या एक दिड तासात आले असतील.

कदाचित म्हणूनच कविवर्य म्हणतात की...

"मित्र वणव्यातही गारव्या सारखा....",

पक्षीमित्रांनी धाडलेले काही संदेश...

[23/09, 10:42 pm] This is a budgerigar (Lovebird) must have escaped from someone's cage. मराठी
नाव अफ्रीका प्रेम पक्षी (लव्ह बर्ड)आहे.

[23/09, 10:59 pm] : मुळात हा समुहात रहाणारा पक्षी आहे, यांच्या निसर्गात काॅलनीज असतात.तुमच्या सोसायटीतच कुणाच्या पिंजऱ्यातून पक्षी पळालाय का पहा.
कारण या पाळीव पक्षांच्या (ज्यांचा जन्मच बंदिवासात झालेला असतो) पंखात खूप उंच आणि खूप अंतर उडण्याचं बळच नसतं

[23/09, 11:01 pm]: तुमच्या सोसायटीतल्याच कुणाचा असेल तर त्याला तो परत देता येईल. बाय द वे या पक्षांच राळ हे खाद्य असतं, क्षारांसाठी त्यांना समुद्रफेस पिंजऱ्यात ठेवावा लागतो.

[23/09, 11:05 pm] : अरे वाह, शिक्रा पण दिसतो आपल्या इथे? यायला पाहिजे फोटो काढायला कॅमेरा घेऊन.

[23/09, 10:07 pm] : आफ्रिकन लव् बर्ड आहे. तो कुणाच्या तरी पिंजऱ्यातून उडून आला आहे. पिंजरा करुन पाळा, नाहीतर मला सांगा, मी ठेवीन आमच्याकडे आहेत हे पक्षी. सोडू नका कावळे मारतील त्याला.

[23/09, 10:09 pm] : तांदूळ खात नाही पाले भाजीच्या काड्या कोथिंबीर, व राळ्याचे बी खातो.

[23/09, 10:15 pm] : Thats a love bird. Looks like someone’s pet. Has anybody in your apt complex reported it missing?

[23/09, 10:16 pm] : If you think that it hit anything like the window glass etc, just keep it in that basket but do not feed it water or anything else.

[23/09, 10:16 pm] : If you think it just flew in then you can keep some water and seeds, berries, fruits, and grains for it feed on.

[23/09, 10:17 pm] : Maybe ask around if someone in the neighborhood is missing a lovebird.

[23/09, 11:34 pm] :Don't release it outside. Give it to someone who keeps these budgerigars or give it to a pet shop

[23/09, 11:34 pm]:Try feeding seeds or other grains. Ideally it should not be kept in cafe it may be illegal.U can also call resque groups.

वरील मेसेज वाचल्यावर माझे धाबे दणाणले. मला कुणाचेही स्वातंत्र्य हिरावून घ्यायला आवडत नाही. कुत्रे,मांजर,पक्षी वैगेरे पाळले नाहीत.त्यामुळे कायद्याच्या दृष्टीकोनातून या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता.लगेच गुगल बाबांना शरण गेलो आणी जीवात जीव आला. खालील माहीती सर्वांसाठी.

Is it legal to pet a bird in India?

In India, local birds are not supposed to be kept as pets. But, exotic birds such as budgerigars and cockatoos are allowed to be kept as pets. It is common for people to keep parrots as pets but this is illegal, as is keeping mynas and finches that are trapped in the wild and sold in markets.

भारतात पक्षी पाळणे कायदेशीर आहे का?

कोणत्याही भारतीय पक्ष्याला पिंजरा घालणे बेकायदेशीर आहे कारण ते वन्य प्राण्यांच्या अंतर्गत वर्गीकृत आहेत आणि अशा प्रकारे वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे संरक्षित आहेत. केवळ विदेशी आणि परदेशी पक्षी या श्रेणीत येत नाहीत. पोपट ही सर्वात सामान्य प्रजाती असल्याने या कायद्यांतर्गत येते.

शेवटी सोसायटीतच ज्याच्याकडे पक्षी संवर्धन आणी संरक्षणाच्या सर्व सुखसोई आहेत अशा एका मित्राकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला. मित्राला फोन केला. तो ताबडतोब घरी आला. बरोबर छोटासाच, सुंदर मॅचिंग पिंजरा बरोबर घेऊन आला. एव्हढ्या थोड्याच वेळात त्याचा लळा लागला होता.सर्वजण थोडावेळ अंतर्मुख झालो,अगदी सौभाग्यवती सुद्धा. आम्हाला कुणालाच कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायला आवडत नाही, तरी मनातून वाटत होते की हा सुदंर पक्षी आपण ठेवून घ्यावा.याला लागणारे विशेष खाद्य,पिंजरा माझ्याकडे नव्हता.अशा अपरात्री या सर्व गोष्टी मिळवणे कठीणअशक्य होते. सुरक्षा हा मुख्य मुद्दा व मित्र विश्वासू व प्रशिक्षित असल्याने एक प्रकारे एका वन्य पक्षाचे ते सुद्धा NRI चे संरक्षण केल्याचे समाधान झाले.आमची सर्वांची अवस्था गोकुळवासियां सारखी झाली...
-
LB5-LB7
-
नेऊ नको माधवा,अक्रुरा
नेऊ नको माधवा
क्रूर अक्रुरा नकोस नेऊ
आनंदाचा ठेवा...

-सुमन कल्याण्पूर,१९५७

आजच्या घडीला तो प्रेम पक्षी (लव्ह बर्ड ) नवीन ठिकाणी आनंदात आहे पण त्याच्यी एकंदरित वागणूक बघता एकटा असल्याचे दु:ख असल्याचे जाणवते. अजून तरी कुणी संपर्क केला नाही. मित्र ॲडाॅप्ट करणार आहे.

पहिले दोन दिवस त्याला क्वारंटाईन केले होते. घरातील सदस्यां बरोबर ओळख आणी आता इतर पक्षांबरोबर सुद्धा ओळखीचे संदेश देऊ लागला आहे. बाकीच्या पक्षांनी त्याला स्विकारले की क्वारंटाईन मधून इतरां बरोबर मिसळेल.एकदा व्यवस्थित मिसळला की कळेल पुरुष आहे का स्त्री. त्यानुसार साथीदार आणता येईल. या पक्षांना साथीदाराची गरज असते. बाजारात या पक्षाची किंमत साधारण तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत असावी. फोटो दाखवला तर पेट शाॅप वाला जोडीदार देईल.

कुटूंबातील सदस्य व पक्षी यांच्यात स्वीकृती आणि विश्वास वाढवण्या साठी पक्ष्यासोबत बराच वेळ घालवणे,हळूवारपणे बोलणे आणि हळू हालचाल सुरू करणे. सरते शेवटी स्पर्शाची भाषा विकसित करणे.एकदा पक्षी व कुटुंबिय यांचे एकमेका बरोबर नाते (बाॅण्ड) जोडले की त्याचे प्रशिक्षण सुरू करता येईल. या पक्षांचे आयुष्य बारा ते पंधरा वर्षअसल्याने भावनिक गुंतवणूक फार मोठी असते.

असो,दुसर्‍या दिवशी सुद्धा लव्ह बर्ड हाच विचार डोक्यात घोळत होता. गूगलवर शोधल्यावर खालील प्राथमिक माहीती मिळाली.

लव्ह बर्ड लहान आकाराचा पोपट आहे. याच्या नऊ प्रजाती आहेत. हा पक्षी प्रेमाच प्रतीक म्हणून ओळखले जाते. आगापार्निसचा सामान्य नाव आहे. लव्हबर्ड हे ॲगापोर्निस या वंशाचे सामान्य नाव आहे, जो जुन्या जगातील पोपट कुटुंबातील Psittaculidae मधील पोपटांचा एक लहान गट आहे.वंशातील नऊ प्रजातीं सर्व आफ्रिका खंडातील आहेत,पैकी राखाडी-डोके असलेला लव्हबर्ड मूळचा मादागास्कर,आफ्रिकन बेटाचा आहे.

हे पक्षी प्रेमळ, सहज माणसां मधे मिसळणारे व लव्हेबल असतात. लवकरच घरातील एक सदस्य बनतात. एकपत्नी व्रती,सदैव जोडीने एकत्र राहतात. प्रेमळ संबंध आणि जोडीदार पक्षी या वरून कदाचित लव्ह बर्ड हे नाव आले असावे.लव्हबर्ड लहान ,लहान कळपात राहतात.फळे,भाज्या,गवत व बिया खातात. दक्षिण अफ्रीकामधे प्राचीन लवबर्ड प्रजातींचे जीवाश्म मिळाले आहेत.साधारण 1.9 मिलियन वर्षा पूर्वीचे असावेत. जास्त माहिती साठी आरकाईव्हज वर लव्ह बर्ड नावाचे दिडशे पानाचे पुस्तक उपलब्ध आहे ,चकटफू डाऊनलोडवता येते (वाचणार आहे). गुगल वर भरपूर माहीती उपलब्ध आहे. गूगल सर्च करताना प्रेम पक्षां वर भरपुर कविता सुद्धा आढळल्या.

Two birds, Alex Godly

The perfect meeting of two birds so high,
The love between them in the sky,

A love that even the gods could not deny,
A love that will never die.

मला मात्र हिन्दीचे प्रसिद्ध कवी शिवमंगल सिह सुमन. यांची हम पंछी उन्मुक्त गगन के कवीता आवडते.

हम पंछी उन्मुक्त गगन के
पिंजरबद्ध न गा पाएंगे,
कनक-तीलियों से टकराकर
पुलकित पंख टूट जाऍंगे।

हम बहता जल पीनेवाले
मर जाएंगे भूखे-प्यासे,
कहीं भली है कटुक निबोरी
कनक-कटोरी की मैदा से......

पुण्यात संभाजी बाग,सारस बाग, लाॅ काॅलेज टेकडी या लव्ह बर्ड्स च्या आवडत्या जागा. सद्य परिस्थितीत लोकसंख्येत अफाट भर पडल्याने लव्ह बर्ड्स ना झेड ब्रिज सुद्धा कमी पडू लागला आहे. मुंबई सारख्या महानगरात याहूनही बिकट अवस्था आहे. असो,काही बेशरम देशी पक्षी खुल्ले आम प्रेम (कोर्टशिप) करताना टिपले आहेत.काही छायाचित्रे आपल्या नयन सुखा साठी ( फक्त प्रोढासाठी)......
-
LB8-LB9
-
LB11-LB12
-
LB13-LB15

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Sep 2024 - 3:21 am | कंजूस

वा. सुंदर.

पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) .
पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2024 - 12:31 pm | कर्नलतपस्वी

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला.

पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस's picture

27 Sep 2024 - 9:24 am | प्रचेतस

हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2024 - 12:26 pm | कर्नलतपस्वी

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti's picture

27 Sep 2024 - 12:57 pm | Bhakti

A
दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;)

लाल गडद फुलोरा
उधळला पाकळ्यांचा
बोलावे प्रेम पाखरा..

Bhakti's picture

27 Sep 2024 - 12:59 pm | Bhakti

*कर्दळीच्या

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2024 - 3:01 pm | कर्नलतपस्वी

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले
मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले

भक्ती,धन्यवाद.

सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

तुम्ही या पक्ष्याचा फोटो काढला असेल तर नक्की इथे द्या किंवा एखादी आंतरजाल लिंक द्या :)

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत.

फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा's picture

27 Sep 2024 - 3:43 pm | सौंदाळा

लेख बेहद्द आवडला.
फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती.
बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2024 - 6:04 pm | कर्नलतपस्वी

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत.

मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2024 - 12:26 am | अमरेंद्र बाहुबली

मस्तच.

श्वेता२४'s picture

28 Sep 2024 - 12:14 pm | श्वेता२४

कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१'s picture

29 Sep 2024 - 11:03 am | सविता००१

अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

कर्नलतपस्वी's picture

2 Oct 2024 - 12:38 pm | कर्नलतपस्वी

pi

दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा.

...

तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर.

- बाबा चमत्कार

कर्नलतपस्वी's picture

2 Oct 2024 - 12:47 pm | कर्नलतपस्वी

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता.

गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते.
चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.