कृष्णाच्या गोष्टी २

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
23 Jun 2024 - 10:08 am

वसुदेव आणि देवकी विवाह

वसुदेवाचे शौर्य विद्वत्ता शहाणपण पाहून देवकीचे त्याच्यावर प्रेम जडले सर्वांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. खरे पाहता उग्रसेन आणि कंस या विवाहामुळे अस्वस्थ झाले होते. परंतु वधू-वरांना विभोत्तर समारंभ पूर्वक देवदर्शनाला नेऊन व तिथून वधूला वरगृही सोडण्याच्या वरातीत मिरवणुकीत वधू-वरांच्या खास रथाचे सारथ्य स्वतः कंसांनी केले होते. त्याला दाखवायचे होते की आपल्या आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. कंसाला काही दिवसांनी खटवांग वनात नारद भेटला आणि त्याने देवकीचे आठवे मूल तुला ठार करणार आहे असे भविष्य सांगितले. या भविष्यवाणीमुळे तो अधिकच त्यांना आपला शत्रू मानू लागला व त्यांचा विविध प्रकारे त्याने छळ सुरू केला.

त्यावेळी उग्र सेन याने त्याला सांगितले होते की अंधक राजकुमाराला हे शोभा देत नाही. परंतु बापाचे बोलणे दुर्लक्षित केले. त्याचवेळी नारदाने त्याला सांगितले होते की "तू खरा यादव नसून काल नेहमी नावाचा दानव आहेस आणि तो यादवांचा शत्रू आहे "या अशा काही गोष्टींमुळे त्याच्या मनात उग्रसेना विषयी राग वाढतच चालला होता. आपण उग्रसेनापेक्षा अधिक तेजस्वी, बलवान आहोत असे त्याला सतत वाटत राहिले व अहंकारामुळे तो बापाचाही छळ करू लागला.त्याने वडिलांना कैद केले.आपणच मथुरेचा राजा आहोत हे सर्वत्र जाहीर केले. यादवांची आणि वृष्णी ची महाभयंकर हालउपेक्षा सुरू झाली. ठरल्याप्रमाणे कंसाने देवकीच्या पहिल्या सहा अर्भकांचा शिळेवर आपटून संहार केला.देवकीचा सातवा गर्भ हा कंसाच्या भयाने आतल्या जिरला.

इकडे कंस भयामुळे देवकी नवव्या महिन्याऐवजी आठव्या महिन्यातच प्रसूती झाली यादवांचा उद्धारक श्रीकृष्ण बुधवार श्रावण वैद्य अष्टमीच्या जयंती नामक रात्री विजय नामक मुहूर्तावर अभिजीत नक्षत्रावर शालिवाहन शक पूर्व 3263 या दिवशी म्हणजे इसवीसन पूर्वी ३१८७ जन्मला.
काही करून या मुलाला तरी वाचवा असे देवकीने वसुदेवाला सांगितले. तेव्हा वसुदेवाने ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला रोहिणीला व पुत्राला नंद गोपालाकडे सुरक्षितपणे ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी याही मुलाला नंदगोपालाकडे नेण्याचे ठरवले. नंद गोपालाची पत्नी यशोदा ही त्याच दिवशी प्रसिद्ध झाली होती. श्रमामुळे ती झोपली गेली होती. वाड्यात कोणीही नव्हते.अशा वेळेस वसुदेवाने तिच्या कुशीतील मुलगी उचलून त्या ठिकाणी आपला मुलगा तिथे ठेवला व त्यांची अदलाबदल केली. इकडे कंसाला देवकी प्रसूत झालेली समजली.जेव्हा त्या आठव्या पुत्राला मारायला आला व बालकाला त्यांनी तिथून उचलले. "तेव्हा ही मुलगी आहे हिला मारू नको" असे देवकीने त्याला सांगितले. आणि खरोखरच त्याला जेव्हा लक्षात आले की आपल्या ला मारणारा आधीच कुठेतरी जन्मला आहे व सुरक्षित आहे .तेव्हा तो अधिक चिडला परंतु त्यांनी देवकी आणि वसुदेवाचे बंधन शिथिल केले. वसुदेवाने ही नंदला आपला गौळवाडा मथुरेपासून जितक्या दूर नेता येईल तितक्या दूर लवकरात लवकर हलवण्याचे सूचना केली. त्यानुसार नंद आपल्या कुटुंबासह मथुरा सोडून यमुना काठाने प्रवास करीत करीत यमुना पार करत व्रजामध्ये पोहोचला. गोकुळातल्या गोप गोपिकांनी तेथे त्याचे आनंदाने स्वागत केले .
अ

मूळ ऐतिहासिक घटनेत नायकाच्या विभूतीमत्वामुळे त्याचे पुढील काळात हळूहळू दैवीकरण होत जाणे आणि मूळ ऐतिहासिक कथेत अनैसर्गिक आधिक चमत्कारिक गोष्टी विविध कारणांसाठी प्रक्षिप्त होणे हे साहजिक असते. त्यामुळे मुख्य माध्यमातून जितकी वर्षे मौखिक झालेल्या प्रसार अधिक तितकीच तिच्यामध्ये अनैसर्गिक प्रक्षेपते अधिक असते अभ्यासकांना दिसून आले. त्यानुसार कृष्णाच्या बालपणाशी निगडित अनेक कथा या चमत्कारिक वाटतात पण त्यातील काही गोष्टी चमत्काराला विलग करून पाहिल्या तर पटतात देखील!

पुतनावध
A
पूतना राक्षसी होती ही कथा भागवत पुराणात आहे. परंतु सुश्रताने पूतना शब्दाचा एक रोग विशेष असा दिलेला अर्थ लेखकाला योग्य वाटतो.पुतना म्हणजे दूध पित्या बालकांना होणारा एक रोग आईने काही स्वच्छतेचे नियम पाळले काही औषधी व झाडपाल्यांचा वापर केला की पुतनाचा अंत करता येतो असे त्यांनी म्हटले आहे. अनेक विद्वानांनी विश्वकोशातील कृष्णा वरील आपल्या लेखात पूतनावधाची ही उपपत्ती मान्य केली आहे.

शकटासुराचा वध
A
हा देखील राक्षस न मानता शकट म्हणजे दह्या दुधाची मडकी ठेवलेला गाडा येथे अपेक्षित आहे. कृष्ण जेव्हा पहिल्यांदा उपडा पडला तेव्हा प्रथेप्रमाणे सर्वांनी बाळकृष्णाला हळदीच्या दुधाने स्नान घालून एका गाड्यामध्ये दह्या दुधाची व लोण्याची मडकी रचून ठेवली व त्या गाड्या खाली झोळी बांधून कृष्णाला ठेवले. पण हा गाडा म्हणजे शकट हा अचानक मोडून पडला व त्याचे चाके दुतर्फा झाला आतली मडकी फुटली. दही दूध लोणी विखरून दही दुधाचा रहाडा सर्वत्र झाला. गाड्या -शकटाखाली बांधलेल्या झोळीतील बालक कृष्ण आता गाड्याखाली चिरडला असे सगळ्यांना वाटले. परंतु तो तेथे सुरक्षित राहिला.हे घडलेले अकल्पित काहीतरी राक्षसी असावे असे भोळ्या गोप गोपिकांना वाटले.त्याचाच पुढे जाऊन कृष्णाने शकटासुराचा वध केला अशी अंधश्रद्धा पसरली.

तृणावर्ताचा नाश
A
यात देखील पावसाच्या सुरुवातीला मोठमोठे वादळे गोकुळात येत असे. तेव्हा सारे गोप गोपी मंडळी जंगलातून वाळलेले गवत आणून त्याचे मचाण करून त्या वाळलेल्या गवताच्या पेंढ्या रचून ठेवण्यात गर्क होत. कारण एकदा पाऊस सुरू झाले की गाईगुरांना दूरवर नेऊन चारणे अशक्य होईल .अशा वेळेस त्यांनीही केलेली सोय असे. परंतु एकदा अगदी जोर जोरात असे गर्जते वादळ आले व गवत व पालापाचोळा आकाशात भिरभिरला उडला. या भयानक चक्रीवादळामुळे हाहाकार उठला.सर्वजण आपापली मुलं घेऊन नंदाच्या घरी आली तेथे त्यांनी आसरा घेतला. अशावेळी सर्वांच्या लक्षात आले की कृष्ण वादळात अडकला.वादळ इतके भयंकर होते की कृष्ण जिवंत हाती लागेल की नाही अशी सगळ्यांना शंका होती पण त्याच वेळी वादळ थांबल्यावर त्यांना कृष्ण सापडला .चक्रीवादळाला पुराणात असुर बनवले गेले आहे कृष्णाला संहारक बनवले गेले आहेत आणि गोष्टीचे नाव तृणावर्ताचा वध असे केले आहे.

संदर्भग्रंथ-शोध कृष्णाचा- प्रवासी पूर्णत्वाचा (लेखक-प्रा. डॉ.राम बिवलकर)

https://www.misalpav.com/node/52294-कृष्णाच्या गोष्टी -१

कथासंदर्भ

प्रतिक्रिया

वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का?

पुतळा ,शकटासुर यांच्या वध कसा झाला यावर लिहीले आहे ते पटत नाही.

अंधश्रद्धा जास्त तर्क संगत वाटते. कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.

वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का?

नाही.

कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.

कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.

कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.

म्हणजे हा गोपीनंद कृष्णच देवकीचा आठवा पुत्र आहे हे त्याला माहिती नव्हते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2024 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज दोन्हीही भाग वाचले, पुस्तकातला गोषवारा आवडला. आपल्याला एखादे पुस्तक आवडते तेव्हा किती लिहु ? आणि किती नाही असे होते. कृष्णाची सुमधुर बासरी वाजली की आवाजाच्या दिशेने देहभान हरपून धावणा-या गौळणीसारखी अवस्था होऊन जाते. तसं आपलं लेखनही ओतपोत कृष्णप्रेमानी भरलेले आहे. मला कृष्ण आवडतो. लेखनही आवडलं. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

अथांग आकाश's picture

24 Jun 2024 - 11:02 am | अथांग आकाश

कॄष्णकथा आवडल्या आहेत! पुभाप्र!!
0