अक्षय्य तृतीया

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
10 May 2024 - 10:22 am

घ्या कविता....

सोनार आठवण
करुन देतात,
पेपरमधे पानभर
जाहीराती देतात...

अलीबाबाची गुहा,
सापडल्यासारखे,
दागिन्यांचे फोटोज ।
कंगन हार कर्णफूलं
कंठे तोडे नाणी कलश,
चळत बिस्किटोज ।।

कुणालाच आठवत नाहित ।
घामटलेले खाणकामगार,त्यांचे
कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।।

भट्टीत तापून सुलाखून ।
कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी,
घडवतोय बारीक नक्षी फूलं।।

मालक गुलजार हसतोय ।
पेठेत अजून एक नवे,
दालन उघडतांना दिसतोय ।।

#कवी नेहमीचा.....
हार के जितनेवाला....बाजीगर

आयुष्यकविता

प्रतिक्रिया

सोन्याचे आकर्षण आहे तोवर असेच चालू रहाणार..

बाजीगर's picture

10 May 2024 - 2:05 pm | बाजीगर

धन्यवाद अहिरावणजी.

अहिरावण's picture

10 May 2024 - 2:17 pm | अहिरावण

धन्यवाद

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 2:42 pm | अमरेंद्र बाहुबली

अस प्रत्येकच व्यवसायात आहे.
बिल्डर जाहिरात देतो तेव्हा बायडलिंग बाधणाऱ्या मजुरांचेही हेच हाल असतात.
गाडी, टीव्ही , फ्रिज, ऑलिम्पिक स्पर्धा, विद्युत उत्पादन, रेल्वे सगळीकडेच मजूर नी कामगार शोषण दिसेल.
- कविता न आवडलेला अमरेंद्र बाहुबली.

धन्यवाद बाहूबली जी आपण विषय किती मोठा आहे ते दाखवलंत

कविता वाचल्याबद्दल आभार

कांदा लिंबू's picture

10 May 2024 - 2:45 pm | कांदा लिंबू

कवितेतील सर्वसासाधारण मतितार्थाशी सहमत.

---

ऐहिक सुखाचा उपभोग घेताना त्यासाठी ज्यांनी कष्ट केलेत त्यांबध्दल कृतज्ञ असावे असे सांगणारी हिंदू संस्कृती खरंच श्रेष्ठ आहे. पोळा, ऋषिपंचमी, गोवत्सद्वादशी, यांसारखे हिंदूंचे सणवार त्यासाठीच योजण्यात आले आहेत.

---

तथापि कवितेचा उत्तरार्ध, उपभोक्त्यांना gilt देतो हे काही आवडले नाही. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे असे वाटते.

बाजीगर's picture

11 May 2024 - 10:29 am | बाजीगर

प्रतिसादाबद्दल आभार जी.

कर्नलतपस्वी's picture

10 May 2024 - 3:22 pm | कर्नलतपस्वी

सोनार आठवण करून देतो
वृत्तपत्र मालकाला पैसे मिळतात
वृ.मा. ची बायको हट्ट करते ...
म्हणून दागिने घडतात

दागिने घडतात म्हणून
कामगाराला काम मिळते
सोनाराला दाम मिळतात म्हणून
कामगारांची खळगी भरते.

एव्हढं साधं गणीत आहे.

इथे ज्याची जास्त रिस्क त्याला जास्त फायदा.

अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे

कां.लिं. बरोबर सहमत. सगळीकडेच समता काम करत नाही. कुठे ममता,कुठे क्षमता याचां सुद्धा विचार व्हावा.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 3:24 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

कर्नलजी आपले म्हणणे सर आँखोंपर है.

आपला फॅन असलेला.....बाजीगर