मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अक्षय्य तृतीया

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर

वाचने 3476 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अस प्रत्येकच व्यवसायात आहे. बिल्डर जाहिरात देतो तेव्हा बायडलिंग बाधणाऱ्या मजुरांचेही हेच हाल असतात. गाडी, टीव्ही , फ्रिज, ऑलिम्पिक स्पर्धा, विद्युत उत्पादन, रेल्वे सगळीकडेच मजूर नी कामगार शोषण दिसेल. - कविता न आवडलेला अमरेंद्र बाहुबली.

कांदा लिंबू 10/05/2024 - 14:45
कवितेतील सर्वसासाधारण मतितार्थाशी सहमत. --- ऐहिक सुखाचा उपभोग घेताना त्यासाठी ज्यांनी कष्ट केलेत त्यांबध्दल कृतज्ञ असावे असे सांगणारी हिंदू संस्कृती खरंच श्रेष्ठ आहे. पोळा, ऋषिपंचमी, गोवत्सद्वादशी, यांसारखे हिंदूंचे सणवार त्यासाठीच योजण्यात आले आहेत. --- तथापि कवितेचा उत्तरार्ध, उपभोक्त्यांना gilt देतो हे काही आवडले नाही. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे असे वाटते.

सोनार आठवण करून देतो वृत्तपत्र मालकाला पैसे मिळतात वृ.मा. ची बायको हट्ट करते ... म्हणून दागिने घडतात दागिने घडतात म्हणून कामगाराला काम मिळते सोनाराला दाम मिळतात म्हणून कामगारांची खळगी भरते. एव्हढं साधं गणीत आहे. इथे ज्याची जास्त रिस्क त्याला जास्त फायदा. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे कां.लिं. बरोबर सहमत. सगळीकडेच समता काम करत नाही. कुठे ममता,कुठे क्षमता याचां सुद्धा विचार व्हावा.