जंग जंग पछाडले
शब्द नाही फुटला
सरकारी यंत्रणांना
दरदरून घाम सुटला
मीच करणार राज
मीच रहाणार चिफ
माझाच पट, माझीच चीत
मज द्या न द्या रिलीफ
मला नाही माहीत
नाही मला आठवत
सरकारी यंत्रणांना
हे का नाही कळत
मी नाही काही केलं
ज्यांनी केलं त्यांना बोला
सरकारी यंत्रणेला
आम आदमीचा टोला
बघू आता पुढं काय होतय
कोण दळण दळतयं
आणी कोण पिठ खातयं
प्रतिक्रिया
25 Apr 2024 - 12:40 pm | चौथा कोनाडा
खरंय कर्नल साहेब !
सत्ता पिपासू लोक "मीच करणार राज मीच रहाणार चिफ" नेतृत्व स्वतःकडे खेचून घेतात आणी
कोण दळण दळतयं, आणी कोण पिठ खातयं आप्ल्या सारख्या सामान्यांच्या आकलानाच्या बाहेर असते !
चालायचेच ... सत्तेची साठमारी !
25 Apr 2024 - 1:21 pm | विवेकपटाईत
काही दिवस, आठवडा किंवा महिन्यात जमानत मिळणार. निर्णय दहा वर्ष येत नाही.तो पर्यंत पुन्हा मुख्यमंत्री. बाकी दारूवर २८५रू टॅक्स कमी करून २ रू करणारा भारतातील पहिला मुख्यमंत्री. संघटित वोट बँक आणि एकावर एक फ्री पिणारे त्यांना पुन्हा निवडून आणतील.