बेतुक्याचे चर्हाट.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Mar 2024 - 7:55 am

एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट......

https://misalpav.com/node/51141

आता पुढे.

K-जरी चंचल,चपळ मासोळी
लावली जाळी, तरी न लागे गळी
खेळतसे जळी, धीवरा संगे

खेळतसे रडीचा डाव
धीवरा न देतसे भाव
आता करू काय उपाव
धिवर म्हणे....

धीवरे घातले साकडे
वाचून आकडे, प्रार्थना केली
मिटला संदेह,सुटला आदेश

वाढले बळ, हलले दळ
सत्वर पातले धीवर
यमुना जळी

खेळ रंगला यमुनातीरी
"रापण", करण्या फेकली जाळी
ओढला किनारी K-जरी,लीलया

शक्ती अपरंपार, धीवरा माजी
न लागे पार जैसा ठाव जळापरी
बेतुक्या म्हणे,

-बेतुक्या राॅक्स.

उकळीहास्यविडंबन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Mar 2024 - 9:34 pm | कंजूस

नाही समजली.

कर्नलतपस्वी's picture

27 Mar 2024 - 9:12 am | कर्नलतपस्वी

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

एक वर्षापुर्विवी एक विडंबन लिहीले होते त्याचा पुढील भाग. हे विडंबन सद्य परिस्थितीवर आहे. आप पक्षाचे सर्वेसर्वा,इडी,कोर्ट यावर व्यंग आहे. यात धीवर म्हणजे कोळी बडी मछली पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 9:36 pm | मुक्त विहारि

कविता आवडली...

कर्नलतपस्वी's picture

27 Mar 2024 - 9:13 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

27 Mar 2024 - 9:13 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद.