शब्द!

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
3 Jan 2008 - 8:38 pm

हास्य.. एक चिरंतन हास्य..
हास्यच आणेल तुजला समीप माझ्या
कळू देऊ नकोस जाणे तुझे
कारण तेच आणेल पाणी डोळ्यात माझ्या

दुनियेने घालविली रया
नवे पर्व सुरू करूया
आजच्या आज...
प्रियतमे...
तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे....

खरंतर... शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

गोड शब्द असोत तुझे चिरंतन
कर त्यांना तू मजला अर्पण
अन् माझा जीव आहे तुझी साठवण
प्रत्येक प्रसंगी असो माझीच आठवण

तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे....

खरंतर.... शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला

दुनियेने घालविली रया
नवे पर्व सुरू करूया
आजच्या आज...
प्रियतमे...
तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे.....

खरंतर.. शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

-ऋषिकेश

टिपः गाणे कोणत्याही विशिष्ट चालीत नाही काही ओळी मुळ चालीत बांधता आल्या.. पण संपूर्ण गाणं नाही

विनंती :
१. हे कोणत्या इंग्रजी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे केवळ व्यनि तून पाठवावीत.
३. नुसते अभिनंदन करू नका गाणे ओळखण्याचाही प्रयत्न करा. माझाही पहिलाच प्रयत्न असल्याने चुका नक्की असतीलच, त्याही सांगा. मात्र त्यासाठी गाणे ओळखणे अनिवार्य आहे, हे सांगणे नलगे

संगीतप्रेमकाव्यप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

3 Jan 2008 - 11:30 pm | ऋषिकेश

मुक्तसुनीत यांनी मुळ इंग्रजी गाणे व त्याचा बँड दोन्ही अचुक ओळखले आहे. अभिनंदन!

प्राजु's picture

8 Jan 2008 - 2:03 am | प्राजु

आता सांगा हे गाणं कोणतं ते? किती ताणाल?

- प्राजु.

ऋषिकेश's picture

8 Jan 2008 - 3:48 am | ऋषिकेश

गुरुवारी हा प्रश्न टाकला होता. तेव्हा येत्या गुरुवार पर्यंत थांबूया :)
नाहितर मुक्तसुनीत एकमेव उत्तर देणारे ठरतील ;)

माझा माझ्या भाषांतरकलेवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे गाणं ओळखू न येणार्‍यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तरी "याही परिस्थितीत" गाणे ओळखणार्‍याचे कौतूक मात्र करावे तितके कमीच ;)

असो. उद्या एक 'हिंट' देईन.

-ऋषिकेश

धमाल मुलगा's picture

8 Jan 2008 - 5:15 pm | धमाल मुलगा

ऋषिकेश...हे गाण॑ आहे.....
इथेच देउ का उत्तर? जाउ दे..इकडे कान कर मग सा॑गतो :-)
(व्यक्तिगत स॑देश पहा)

-धमाल मुलगा.

ऋषिकेश's picture

8 Jan 2008 - 9:01 pm | ऋषिकेश

धमाल मुलगा याने अचूक उत्तर पाठवले आहे

ऋषिकेश's picture

8 Jan 2008 - 9:02 pm | ऋषिकेश

नीलकांत यांनी देखील अचूक उत्तर पाठवले आहे. शिवाय हा बॅंड त्यांचा आवडता असल्याचे आवर्जून कळवले आहे .
अभिनंदन !

स्वाती राजेश's picture

8 Jan 2008 - 10:10 pm | स्वाती राजेश

व्यक्तिगत स॑देश पहा.

ऋषिकेश's picture

8 Jan 2008 - 10:21 pm | ऋषिकेश

स्वाती राजेश यांनीही बँड व गाणे अचूक ओळखले आहे. अभिनंदन!

ध्रुव's picture

9 Jan 2008 - 5:14 pm | ध्रुव

पाठवले आहे उत्तर
--
ध्रुव

ऋषिकेश's picture

9 Jan 2008 - 7:52 pm | ऋषिकेश

ध्रुव यांनीही अचूक उत्तर दिले आहे. अभिनंदन!

ऋषिकेश's picture

10 Jan 2008 - 8:35 pm | ऋषिकेश

वर बर्‍याच जणांनी ओळखल्या नुसार "वर्डस" या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याच्या भाषांतराचा हा प्रयत्न आहे. हे गाणं पुढिल विडियोत ऐकु शकतील व त्याचे शब्दही पाहु शकतील. भाषांतर जमलंय का हे ऐकायला आवडेल

सर्व अचुक उत्तरे देणार्‍यांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन!!