हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
12 May 2023 - 1:24 pm

एक गणित संबंधित प्रश्न आहे

जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल?
हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो,
५ = १२५.
मग १२ =?
म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे.

समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले. म्हणजे आता एकुण किंमत २५ गुणिले ३०० म्हणजेच ७५०० झाली.
त्यानंतर मी पुन्हा ३०६ च्या भावाने अजून २५ कॉन्टॅक्ट घेतले आता एकुण किंमत ७६५० झाली.
एकुण क्वन्टिटि झाली ५० आणि एकुण किंमत झाली ७५०० + ७६५० = १५१५०. आणि मला तो प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट ३०० + ३०६ = ३०३ रुपयाला मिळाला किंवा अशा प्रकारे हेच गणित करु शकतो की, आता एक कॉन्ट्रॅक्ट १५१५० ÷ ५० = ३०३ रुपयाला मिळाला.

पण पुढे भाव पडतच गेला आणि म्हणून मी एव्हरेजिंग करण्यासाठी एव्हरेजिंगला मराठीमध्ये असलेला पर्यायी शब्द मला माहिती नाही. तर पुढे भाव पडतच गेला. आणि मी एव्हरेजिंग करण्यासाठी अजून तीन २५ चे लॉट खालील किमतीत घेतले
२५ @ २७० = ६७५०
२५ @ २७५ = ६८७५
२५ @ २८० = ७०००.

आता एक कॉन्ट्रॅक्टची किंमत काढण्यासाठी मला खालील प्रमाणे गणित करावे लागेल,
३००+३०६+२७०+२७५+२८० भागिले ५ म्हणजे २८६.२०.

ही एका कॉन्ट्रॅक्टची किंमत अशीसुध्दा काढता येईल,
७५००+७६५०+६७५०+६८७५+७०००
म्हणजे ३५७७५ ही एकुन किंमत.
भागिले २५ पाच वेळा म्हणजे १२५. ३५७७५÷१२५ = २८६.२० म्हणजे एकुण किंमत भागिले एकुण संख्या.

म्हणजे मला एक कॉन्टॅक्ट २८६ रुपये व वीस पैशाला मिळाला.पण जेव्हा मी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली तेव्हा भाव ३०६ रुपये होता, म्हणून मी एव्हरेजिंग केले व आता मला एक कॉन्टॅक्ट २८६.२० रुपयाला मिळाला आहे.
पण जर त्यापुढेही किंमत कमी होत होत जाऊन २७८ रूपये झाली व आता मला तो ट्रेड पूर्णपणे बंद करायचा आहे व लगेच कॅल्क्युलेट करायचे आहे की आता मला किती क्वांटिटी घ्यावी लागेल जेणेकरून मी लगेच २७८ रुपयाला ते सर्व कॉन्टॅक्ट विकू शकेल म्हणजे जरी भाव खूप कमी झाला असला तरी माझा काही लॉस होणार नाही.म्हणजे ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
तर हे कॅल्क्युलेशन म्हणजे गणितीप्रक्रिया कशी करावी हे मला समजत नाही आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे, लेखात जास्त आकडे झालेत त्याबद्दल क्षमा असावी, पण सुटसुटीत व सोप्प्या भाषेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे, तर क्रूपया मदत करावी ही विनंती.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

लेखाचे शिर्षक 'हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा' असे आहे. क्षमा असावी.

श्रीगुरुजी's picture

12 May 2023 - 2:00 pm | श्रीगुरुजी

कितीही २८६.२० पेक्षा कमी व २७८ किंवा त्यापेक्षा काहासे जास्त भावाने कितीही समभाग घेतले तरी सरासरीच्या नियमानुसार सरासरी भाव २७८ पेक्षा जास्तच राहील.

शानबा५१२'s picture

12 May 2023 - 3:23 pm | शानबा५१२

सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा 278 पेक्षा कमीही होऊ शकतो. आधीची 125 कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राईज झाली 35 हजार 775.
आता समजा मी 3000 अजून कॉन्ट्रॅक्ट घेतले 278 ला. तर ३००० X २७८.....
हे मी सर्व लिहायला घेतले तर आहे पण मला हे लिहिताना आता हसायला येत आहे की आपण बोललात त्याचप्रमाणे ती सरासरी कधी 278 नाही येऊ शकत.
मी कॉन्टिटी अगदी एक लाख केली..(१००००० X २७८) + (१२५ * २८६.२) = २,७८,३५,७७५
आता भागिले १,००,१२५ याचे उत्तर २७८.०१०२३७२०३ असे येते.

श्रीगुरुजी's picture

12 May 2023 - 2:03 pm | श्रीगुरुजी

आधीचा सरासरी भाव २८६.२० असेल व २७८ सरासरी भाव हवा असेल तर २७८ पेक्षा कमी भावाने आवश्यक तितके समभाग घ्यावे लागतील.

शानबा५१२'s picture

12 May 2023 - 3:30 pm | शानबा५१२

आपण वरच्या प्रतिसादात नमूद केलेला सरासरीचा नियम मला ऐकूनही माहिती नाही. मी तसा विज्ञान, रसायनशास्त्र शिकलेलो आहे पण मी गणिताकडे कधीही फार लक्ष दिले नाही.
पण या प्रतिसादात तुम्ही जे बोलत आहात एक्झॅक्टली, तंतोतंतपणे मला तेच विचारायचे होते.
मग भाव २७८ पेक्षा किती कमी झाला पाहिजे व कॉन्टिटी म्हणजे प्रमाण किती घ्यायचे हे कुठल्या गुणसूत्राने समजू शकेल?
आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद खरंच खूप बरे वाटले.

अजून चार कवांटिटी २७८ या चालू भावाने घ्या. म्हणजे तुमची सरासरी खरेदी किंमत २७८ होईल. धन्यवाद.

आधीचे उत्तर चुकीचे कारण प्रश्न उतरवून घ्यायलाच चुकलो.

Kindly इग्नोर..

आता नीट वाचून कळले की तुम्हाला असे करणे अवघड आहे . २५० qty घेतली तर जवळपास पोचाल. पण त्यानंतर कितीही add करत गेलात तरी फक्त सूक्ष्म उणी किंमत होत जाईल.
आणि सरासरी टच किंवा क्रॉस कधीच होणार नाही. त्याला सरासरी म्हणणे शक्यच नाही.

तेव्हा शंभर ते दीडशे आणखी घेऊन अंग काढून घेणे उत्तम.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण बरोबर आहात २५० क्वांटिटी घेतली तर सरासरी भाव २८०.७४ होतो व क्वांटिटी ३७५ होते. हा फार छान तोडगा आहे व व्यावहारिक सुद्धा आहे.
पण लेखामध्ये मी जे पहिले गणित दाखवले आहे मी पाच वस्तू वगैरे बाबत.. तसे एखादे गुणसूत्र आहे का ज्याने सरासरीची गणित प्रक्रिया करता येईल? कृपया वेळ काढून प्रतिसाद द्यावा कोरा वरती आजकल चांगले प्रतिसाद मिळत नाहीत व खूपसे प्रतिसाद आता प्लॅन्स विकत घेतल्यानंतर समजतात.

गवि's picture

12 May 2023 - 7:44 pm | गवि

Sumproduct

Excel असेल तर

Qty. Price
2 100
3 250
7 150

Weighted average of price म्हणजे

=sumproduct(qty column, price column)/sum(qty)

qty column, price column या जागी तो तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा , title सोडून.

शानबा५१२'s picture

13 May 2023 - 9:34 am | शानबा५१२

धन्यवाद गवि,
आपण फार बुध्दीने अशी गुणसुत्रे तयार केलीत असे दीसतेय्,मला ते सांगितल्याबद्दल खरेच धन्यवाद. नंतर वेळ मिळाल्यावर लिब्रे कॅल्कमध्ये वापरुन बघतो. मल अ‍ॅक्सेल फारसे नाही समजत, थोडे शिकावे लागेल.
पण आपण जे लिहलेय ते कृपया एक उदहरण देऊन समजववा...प्लीज!

गवि's picture

13 May 2023 - 9:44 am | गवि

Google मध्ये sumproduct अँड weighted average असे सर्च करा. उदाहरणांसह माहिती दिसेल.

कर्नलतपस्वी's picture

12 May 2023 - 2:33 pm | कर्नलतपस्वी

एव्हरेजिंग=सरासरी

बाकी नंतर प्रयत्न करतो.

१०,००० क्वांटीटी घेतली तर डेसिमल कडे दुर्लक्ष करून २७८ weighted average करता येईल. पण तरीही ते २७८ रू. १० पैसे असे असणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ३५७७५ रुपयां ऐवजी सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यात खर्चावे लागतील. बघा बुवा.

ही सर्व एकूणच फक्त सरासरी नसून वेटेड average (मराठी शब्द?) आहे.

श्रीगुरुजी's picture

12 May 2023 - 3:35 pm | श्रीगुरुजी

Weighted Average = भारित सरासरी किंवा भारित मध्य

गवि's picture

12 May 2023 - 3:42 pm | गवि

धन्यवाद..

आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच उताऱ्यात शेवटी आपण लिहिल्याप्रमाणेच होय हाच एक सरासरीला घेऊन खूप आव्हानात्मक समस्या आहे.
किंवा मग समजा आपण फक्त सरासरी करण्यासाठी एक वेगळा साठा ठेवायला हवा. मी असेच काहीतरी करण्याचा विचार करत आहे पण तेव्हा मी पूर्णपणे दैनिक व्यापार करत असणार आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 May 2023 - 3:05 pm | चंद्रसूर्यकुमार

ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?

हे अशक्य आहे. २७८ च्या भावात कितीही (अगदी अनंत) कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेत तरी सरासरी २७८ च्या वरच राहील. वेगवेगळ्या भावाने जर कॉन्ट्रॅक्ट्स घेतले असतील आणि जर सरासरी २७८ हवी असेल तर काही कॉन्ट्रॅक्ट्स सरासरीच्या म्हणजे २७८ च्या खाली हवेत आणि काही २७८ च्या वर. उरलेले कॉन्ट्रॅक्ट्स २८६.२० च्या भावाने घेतले असतील तर आता २७८ च्या भावाने कितीही कॉन्ट्रॅक्ट्स घेतले तर सरासरी २७८ आणि २८६.२० च्या मध्ये म्हणजे २७८ च्या वरच राहिल.

अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

शानबा५१२'s picture

12 May 2023 - 3:50 pm | शानबा५१२

अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

तुझ्याबद्दल धन्यवाद पण खरोखर या चर्चेतून मी काही नवीन शिकत आहे कारण माझे गणित फार कच्चे आहे. पण मार्केट कधीच एकदम सरळ पडत नाही थोडेसे ट्रेण्डलाईनचे निरीक्षण केले मार्केट थोड्यावेळासाठी जे वरती जात असते तेव्हाच सरासरीचा वापर केला तर मोठे नुकसान तर तळतेच पण छोटासा फायदा होणे काही संभव असतो खुपश्या वेळी मी न फायदा न तोटा यामध्ये निघू शकलो आहे. पण सारखे सरासरीच करत राहण्यासाठी जास्त पैश्यांची गरज वाढत जाते.
मी इथे सरासरी थोडेसे चुकलेले पोझिशन(स्थिती?) बंद करण्यासाठी वापरत आहे खूप चुकलेले पोझिशन किंवा दुर्लक्ष झालेले पोझिशन याबद्दल बोलत नाही आहे.

सरासरी पेक्षाही वेगळे काही ह्याच वापरासाठी उपयोगात आणता येईल असे काही असू शकेल का?

श्रीगुरुजी's picture

12 May 2023 - 5:03 pm | श्रीगुरुजी

अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.

कंजूस's picture

12 May 2023 - 5:25 pm | कंजूस

१)वरचा बिंदू = Hpoint धरा
२)सरासरी = AVpoint
३)खालचा बिंदू = Lpoint धरा.

Point म्हणजे भाव.
भाव गुणीले युनिट्स = गुंतवणूक

कोणतेही दोन बिंदू असले तर तिसरा काढता येणारच.

तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. आपले अकाऊंटींग(?) वरचे लेख वचहले होते, तेव्हा आपल्याकडुन प्रतिसाद यावा असे वाटत होते. आपण लिहल्याप्रमाणे सर्व समजले पण एखादे उदाहरण देता आले तर पहा. मग मला तेच ईतर ठीकाणी वापरता येईल. प्लीज!!

ते सर्व एक्सेल किंवा,गूगल शीट्स, किंवा प्रोग्राममध्ये बसवता येतेच.
पण अधांतरी गोष्टी बसवणे कठीण असते.

तरीही चारशे वर्षांपूर्वी न्यूटनने शोधून काढलेली अवरेजींग पद्धत त्याकाळात दुर्लक्षीत झाली किंवा त्यांचे महत्त्व कळले नव्हते ते आता उमगले. कारण हल्लीचे संगणक प्रचंड वेगाने गणिती आकडेमोड करून अचूक उत्तराच्या जवळपास येतात.

पद्धत अशी की १) एखाद्या कच्च्या सूत्रातून एक अंदाज तात्पुरता ठरवून उत्तर काढणे आणि ताडून पाहणे २) मग पुन्हा दुसरा एक अंदाज घेऊन परत उत्तर ताडून पाहणे. क्र (१) आणि क्र (२) ची तुलना करून तिसऱ्या साठी वेगळा आणखी अचूक उत्तर देणारा अंदाज घेऊन उत्तर काढणे. वरील क्रम १,२, आणि ३ परत परत करत राहाणे.
आता संगणकासाठी अशी आज्ञावली तयार लिहून उत्तर मिळवता येतं.

dadabhau's picture

13 May 2023 - 1:16 pm | dadabhau

खरे तर आगावपणा म्हणा ... शिव्या घाला.. काही ही करा...पण एक कळकळीची विनंती आहे... future /options चा नाद /व्यसन सोडा.. ह्या नादाला लागून मागील ३ वर्षात खूप लोकं बरबाद झालेली बघितली आहेत ..त्यामुळे तो नाद सोडाच ... . करोना काळात वर्क फ्रॉम होम वा तत्सम गोष्टींमुळे हातात खूप वेळ आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवायची हाव... म्हणून लाखो लोक एका नवीन च "भक्तिमार्गाला " लागलेत... लाखो लोक तथाकथित मार्केट गुरु /बाबा/जादूगार , मार्केट ह्यांच्याच तालावर चालते असे whatsapp / telegram / youtube / बरेच मराठी TV चॅनल वरून ओरडून ओरडून सांगणारे सर लोक ह्यांच्या नादी लागून लाखो रुपये / शेती /estate गमावून बसलेत अजून ही स्वतःला लुटून घेत आहेत ...त्यामुळे ह्या गोष्टीपासून त्वरित बाजूला व्हा... किंवा १ वर्षांनी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट चा प्रॉफिट कळवा ......

आग्या१९९०'s picture

13 May 2023 - 2:07 pm | आग्या१९९०

Derivatives are financial weapons of mass destruction असे वॉरेन बफे म्हणतो ते अगदी खरं आहे. गेल्या ३० वर्षात कित्येक जण उत्साहाने आले आणि नुकसान सोसून गेले हे ह्याचा अनुभव घेतला आहे. फार फार तर तीन वर्ष टिकतात, तीन वर्षात एखादे वर्ष असे येते त्यात सगळे भांडवल गमावून बसतात. थेअरी, स्ट्रॅटेजी सगळे कागदावर ठीक.

अथांग आकाश's picture

13 May 2023 - 3:43 pm | अथांग आकाश

+१

चौकस२१२'s picture

14 May 2023 - 3:08 pm | चौकस२१२

डेरीवेटीव्ह मध्ये लीवरेज ( उसने भांडवल जणू ) असते हे जो समजून घेत नाही तो खूप धूपु शकतो हे नक्कीच खरे त्यामुळे ते जपूनच वापरावे परंतु सरसकट बिनकामाचे आहे असेही म्हणणे योग्य नाही, ते एकांगी होईल
म्हणूच गेलया काही वर्षात काही सरकारांनी त्यावरील लिव्हरेज कमी केले आहे - अमेरिकेतील ओव्हर द काउंटर फोरिन एक्सचेंज / मार्जिन ट्रेडिंग मध्ये १:१०० पासून ते १:२० इतःपर आणले गेले

शेर १:१ जास्तीत जास्त ( काही देशात १:३)
फ्यूचर १:६

अरथात १:५०० देणारे टिनपाट देशातील काही " तथाकथित ब्रोकर आहेत म्हणा" सेशल/ माल्टा /बी वि आय / वानुवाटू
मान्यताप्राप्त आणि कडक नियम असणार्या देशातील एक्सचेंज असले जिवंघेणे लिव्हरेज देत नाहीत

आग्या१९९०'s picture

14 May 2023 - 5:15 pm | आग्या१९९०

डेरीवेटिव्ह हे तुमच्या पोर्टफोलिओचे संभाव्य नुकसान कमी करण्याचे साधन आहे, त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि त्या कंपनीच्या नफ्यावर धातू, इंधन, परकीय चलन, अन्न धान्य ई. च्या दरातील चढ उताराचा परिणाम होत असेल तर मल्टिकमॉडिटी वर लिवरेज घेऊन डेरीवेटिव्ह ट्रेडिंग करणे फायद्याचे ठरते. फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, नसतील तेव्हडे शेअर तर डेरीवेटिवच्या नादी लागू नये. आणि अशा वेळी लिव्हरेज ट्रेडिंग म्हणजे अपयशाची गुरुकिल्ली.

चौकस२१२'s picture

14 May 2023 - 7:29 pm | चौकस२१२

फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत,
हे का? आणि हे कोणतया स्ट्रॅटेजी बद्दल म्हणताय? कवर्ड कॉल विकणे असले तर तुम्चे म्हणणे बरोबर ..
म्हणजे १ लॉट शेअर १०० च्या किमतीने विकत घेतले आणि लगेच त्यावर १०० रु स्ट्राईक चा कॉल ऑप्शन विकला तर हे मुळात १०० शेअर जवळ असणे महत्वाचे ( अररथात या पद्धती मध्ये धोका कमी होत असला तरी धोका आहेच , पाहिला कॉल विकून अगदी भरघोस असा २-३% प्रति महिना परतावा मिळाला तरी शेअर २०-३०% ने घसरू शकतो वैगरे .. असो जास्त खोलात नाही शिरत _

फक्त येवडःसह म्हणतो कि सरसरकट डेरीवेटीव्ह म्हणजे धोक्याचे हे एकांगी विधान आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करताय यावर अवलंबून आहे
परत डेरीवेटीव्ह म्हणजे २ प्रकार,फुचर आणि ऑप्शन
प्रत्येकाचं गुणधर्म वगववेगळे

न्युज ( महत्वाची बातमी ) ट्रेडिंग हे उदाहरण घेतले तर डेरीवेटीव्हस चा उपयोग होऊ शकतो ...
बर ऑप्शन म्हणाल तर त्यात हि मर्यादित धोका, मर्यादित फायदा किंवा अमर्यादित धोका असे दोनही प्रकाराने खेळता येते ...
विषय फार मोठा आहे , भरपूर साहित्य उपलब्ध आहे .. लोकांनी आधी अभयास करावा... हुरलून जाऊ नये पण त्याचा बबरोबर दरवाजे हि बंद करू नयेत एवढेच म्हणणे आहे