पुस्तक परिचय : हू मूव्ह्ड माय चीज : डॉ स्पेन्सर जोन्सन

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Apr 2023 - 8:39 am

हू मूव्हड माय चीज. : डॉ.स्पेन्सर जॉन्सन
खरे तर हे एक अगदी छोटेखानी पुस्तक यातली गोष्ट तर इतकी छोटी की या पुस्तकाला कथा म्हणावे की लघु कादंबरी असा प्रश्न पडतो. पण एकद अका हे पुस्तक वाचायला घेतले की सगळे प्रश्न सम्पतात आणि एक प्रवास सुरू होतो. सम्वाद सुरू होत स्वत:चा स्वतःशी.
डॉ. स्पेन्सर जॉन्सन हे एक लाईफ कोच. मनोचिकित्सक .पुस्तकाची सुरवात होते त्यांच्या एका मित्रपरिवाराच्या कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट सांगतात.
एका कोड्यात ( मेझ ) रहाणार्या चौघां जणांची ही गोष्ट. यातले दोघे जण म्हणजे हेम आणि हॉ ही दोन अगदी लहानशी माणसे आणि त्यांचे इतके लहान असणारे स्निफ आणि स्करी या उंदरांची ही गोष्ट.
गोष्टीत हे चौघेही एका कोड्यात रहात असतात. चौघांसाठी हे कोडे हेच त्याचं जग आहे. या कोड्यात इकडून तिकडे जाणार्या अनेक वाटा आहेत. या वाटाम्वरून हे चौघेही फिरत असता. यातल्याच एके ठिकाणी एक चीज स्टेशन आहे. इथे त्यांना त्यांचे रोजचे चीज मिळते. हे चीज कोण ठेवते हे मात्र त्याना माहीत नाही. चीज लवकर मिळावे म्हणून हेम आणि हाव दोघेही चीज स्टेशनजवळ रहायला येतात. आपल्या हक्काचे चीज मिळते यात त्याना खूप आनंद मिळतो.
चीज स्टेशन मधे यायचे आणि आपल्या वाटचे चीज घेऊन जायचे हा त्यांचा नित्यक्रम . आयुष्य सुखी चालले आहे असे वाटत असतानाच एके दिवशी हेम चीज स्टेशन मधे पहातो तो तेथे त्यांच्या वाट्याचे चीज ठेवलेले दिसत नाही. हेमला राग येतो. पण तो विचार करतो की असे तर कधी होत नाही. कदाचित हाव ने ते चीज नेले असेल. पण घरी थोडे चीज शिल्लक आहे. त्यामुळे आज तरी चिंता नव्हती. उद्द्य जरा लवकर येवू असा विचार करत हेम घरी गेला. थोड्या वेळाने तेथे आलेल्या हॉ ला देखील चिज मिळत नाही.हॉ आश्चर्य वाटते पण तोही मनाचे समाधान करत घरी गेला.
दुसर्या दिवशी दोघी अगदी सकाळीच चीज स्टेशन मधे येतात. याही वेळी तेथे चीज ठेवलेले नसतेच. थोडा वेळ येथेच थाम्बूया कदाचित चीज ठेवायला येणारे गाडी उशीरा येईल. जरा वेळ वाट पाहूया म्हणत ते दोघेही तेथेच थाम्बतात. अगदी रात्रीपर्यंत वाट पहातात. पण चीज ची गाडी येत नाही.
खरे तर तेथे चीज येणे बंद झालेले आहे. आणखी काही दिवस रोज चीज स्टेशनवर वाट पाहूनही चीज मिळत नाही हे पाहिल्यावर त्या दोघानाही याची कल्पना येते.
आपल्या हक्काचे चीज कोणी नेले याचा ते विचार करायला लागता. यासाठी आपण आंदोलन करू म्हणतात. आपल्या तोंडचे चीज पळवणार्यांचा निषेध करूया म्हणतात. पण काही केल्या चीज काही मिळत नाही. येथे चीज मिळणार नाही याची जाणीव झाल्यानंतर हेम आणि हॉ दोघानाही निराशेने घेरले. त्याम्च्या साठी सगळे सम्पल्यातच जमा होते.
हाव विचार करायला लागतो. त्याच्या लक्ष्यात येते चीज ठेवणे पूर्ण बंद होण्याच्य अकाही दिवस अगोदर मिळत असणारे चीज थोडे शिळेच होते. आणि त्याच्या वड्याही लहान आकारात यायला लागल्या होत्या.
हेम आणि हाव ला तिथे स्निफ आणि स्करी हे उंदीर द्वय ही भेटतात. ते प्राणी आहेत म्हणून हेम आणि हाव त्याना आप्ल्या पेक्षा कमी बुद्धीने प्रतीचे लेखत असतात. पण त्यानादेखील चीज मिळत नाही हे ही हॉ ला समजते. पण स्नीफ आणि स्करी हे चीज मिळाले नाही म्हणून तेथेच थाम्बून न रहाता त्याचा इकडे तिकडे शोध घेत फिरता हे देखील समजते.
आपणही चीज दुसरीकडे शोधायला हवे हॉ हेमला आपण चीज दुसरीकडे शोधू या असे सांगतो. पण हेम त्यासाठी तयार नाही. त्याचे म्हणणे की आपले चीज त्याम्नी नेले
हा आपल्यावर अन्याय आहे. ते आपल्याला त्यानी इथेच द्यायला हवे.
हॉ त्या कोड्यात आता चीज शोधायला बाहेर पडतो. आपल्याला नवे चीज मिळू शकते या विचाराने देखील त्याचे नैराश्य दूर होते.
फिरताना तो एका दुसर्‍या चीज स्टेशन पाशी येतो . तेथेही चीज नसते. ते रिकामेच असते. पण भरपूर एखादे चीज स्टेशन आपल्याला सापडू शकेल ही शक्यता हॉ ला लक्ष्यात येते. तो उत्साहाने आता कोड्यातल्या रस्त्याने चीज शोधत फिरायला लागतो. त्याला आणखी काही चीज स्टेशन दिसततात. काही ठिकानी चीज असते पण त्याची चव मनाजोगती नसते. अजिबात आवडत नाही.फिरता फिरता हॉ अशा एका वळणावर येतो की ज्याच्या पुढच्या रस्त्यावर हॉ कधीच गेलेला नाहिय्ये. त्याला भिती वाटायला लागते. पुढे काय आहे हे त्याला माहीत नसते.
तरीही तो त्या वळणावरच्या पुलावरून पुढे जायचे ठरवतो. पुलावरून जाताना त्याला जाणीव होते की आपण भीतीच्या पुढे गेलो आणि आपला उत्साह द्विगुणीत झाल्या आहेत.
हॉ चे पुढे काय होते. त्याला चीज मिळते की नाही. चीज स्टेशन मिळाल्यावर तो पुढे काय करतोहे पुस्तक वाचताना समजते.
ही गोष्ट हा या पुस्तकाचा अर्धाच भाग आहे. खरे तर गोष्टीतले चीज हे एक रूपक ( मेटाफोर) आहे. ते तुमच्या आयुष्यात काही असू शकते. तुमचा जॉब , तुमचे लग्नजीवन, तुमचे करीयर, तुमचे मित्र काहिही.
गोष्ट पूर्ण झाल्या नंतर कार्यक्रमात आलेले लोक यावर चर्चा करायला लागतात. प्रत्येक जण आपल्या आयुश्यात आपण बदलला सामोरे कसे गेलो त्याची गोष्टीतल्या पात्रांसोबत तूलना करत साम्गतो. गोष्ट वाचताना आपणही हेच करत असतो.

स्पेन्सर जोन्सनची गोष्ट सांगायची हातोटी आणि पुस्तकात वेळोवेळी येणार्‍या पाट्या ही या पुस्तकाची गम्मत आहे. वाचताना मधेच एखादे कोरे पान येते त्या पानावर एकच ओळ ठळक अक्षरात छापलेली असते. ही वाक्ये तितक्याच ठळकपणे आपल्याला आतपर्यंत जाणवतात.
उदा : चीज हे तुमच्या हक्काचे नसते. ते कोणत्याही क्षणी तुमचे चीज हलवू शकतात" , " चीज शिळे व्हायला लागले हे तुम्हाला वासावरून जाणवते, त्याचा वास घेत रहा"किंवा " भीतीच्या पलीकडे गेलो की आपण आनंद घ्यायला लागतो " " नवे चीज मिळू शकते हा विचारही तुम्हाला चीजचा शोध घ्यायला प्रोत्साहीत करतो"
"नव्या चीजचा शोध घेत रहा "
"बदलाला समोरे जा. बदल होतच असतात."
पुस्तक एकदा वाचून संपत नाही. आपण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करत रहातो.

वावरविचार

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Apr 2023 - 8:58 am | गवि

या पुस्तकाची काही वर्षांपूर्वी एकदम खूप चर्चा आणि प्रसिद्धी झाली होती.

वाचले असता एक साधे सरळ बेसिक तत्व खूप पाने भरून रीपिटीटीव घटना, वाक्ये टाकून कथा बनवली असे मत झाले. अगदी थोडक्यात सांगता आले तर ते effective असते असे वैयक्तिक मत. अर्थात या पुस्तकाचे अनेक भारावलेले फॅन्स त्या वेळी होते आणि अजूनही आहेत.

पुस्तकातले मूळ तत्व अत्यंत उत्कृष्ट आणि आवश्यक आहे. फक्त त्या थोडक्यात मांडता येणाऱ्या वाक्यासाठी इतकी प्रतीकात्मक लांबलचक रचना करणे जरा कंटाळवाणे वाटले.

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2023 - 9:30 am | कर्नलतपस्वी

साधे,सोपे तत्वज्ञान. मेहनत करा. आवडले.

गवी भौ बरोबर सहमत.

असला हरी तर देईल बाजल्यावरी आणि अशा स्वरूपाच्या म्हणी आपल्याकडे उपहासाने वापरल्या जातात. यावरून हेच दिसतं की लोकांना हे कळत असते पण वळत नाही. एकूण ढोबळमानाने सार तेच आहे की आपोआप कंफर्ट झोनमध्ये बसून सर्व मिळत राहील असे गृहीत धरू नका.

या पुस्तकाविषयी खुप ऐकलं होतं.परिचय पहिल्यांदाच वाचला.छान!
" भीतीच्या पलीकडे गेलो की आपण आनंद घ्यायला लागतो " हे तत्त्वज्ञान नसून कृतीचे प्रोत्साहन आहे,जे खुप आवडलं.

कंजूस's picture

6 Apr 2023 - 11:17 am | कंजूस

हे पुस्तक वाचनालयात पुस्तक चाळतानाच वाचलं होतं.

रूपक आणि संदेश आहे हे लगेच लक्षात आलं.
Motivational books (विचारांना चालना देणारी पुस्तकं )प्रकारातली पुस्तकं हल्ली फार वाचली जातात.

अशी चालना देणारी माणसे सुद्धा आपल्याला भेटत असतात. फक्त त्यांचे विचार लगेच अमलात आणायला हवेत अन्यथा वास येऊ लागतो. म्हणजे की ती सांगितलेली,सावध केलेली गोष्ट वेळीच न केल्याचे परिणाम दिसू लागतात. मनात कुढणे सुरू होतं.
बरं मग ते झालं नाही तर दुसरं काही करून पाहू हा विचार करून सुरू केल्यास पुढचा मार्ग दिसतोच.
कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो.
काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत.

विजुभाऊ, गोष्ट चांगली सांगितली थोडक्यात. धन्यवाद.

कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो.
काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत.

तुमचे प्रतिसाद भारी असतात. :-))

Bhakti's picture

6 Apr 2023 - 11:57 am | Bhakti

जबरी प्रतिसाद :)
ते श्रोडिंजरचे मांजरीच अजून सांगा :)‌‌
(स्वगत-आजचा दिवस मांजरीवर पीचडीचा नवा cat आईज goggle चा पहिला दिवस;) )

तसा एक धागा मिपावर धावतो आहेच. ज्ञानेश्वरी हीसुद्धा एक अध्यात्मिक संदेश अवगुंठीत वस्तुस्थितीची कडू गोळीच आहे. किंवा असणे नसते द्वैत वाद किंवा प्रबॅबीलटी सिद्धांत. वाकवू तसा वाकतो. पण मनुष्य ऐहिक/पारमार्थिक सुखांच्या मागे धावायचे थांबवितो का? चीज आणि सहज कुणाला नको आहे? फक्त मी त्यासाठीच वणवण भटकतो आहे मी न सांगताच सर्वांना समजले आहे.

कंजूस's picture

6 Apr 2023 - 2:50 pm | कंजूस

KonkanheartedGirl
अंकिता वालावलकर हिचा. गजाली चांगल्या आहेत. वर्तमानकाळातील मोटिवेशनल आधार.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Apr 2023 - 11:15 am | राजेंद्र मेहेंदळे

"डर के आगे जीत है!! " हा संवाद आठवला.