प्याद्याचा डाव

शेखर काळे's picture
शेखर काळे in जनातलं, मनातलं
5 Apr 2023 - 4:34 am

प्याद्याला कधी कधी कळत नाही की त्याचे चलन त्याला हलवणाऱ्या हातांकडून होत असते. त्या खेळातले नियम, चाली त्या हातांकडून ठरवले जातात. हा प्यादा राजा व्हायच्या मार्गावर पुढे सरकत होता. कधी सरळ, कधी तिरका. एक शेवटचे घर उरले होते त्याला राजा होण्यासाठी. तेव्हढ्यात, हातांमागच्या डोक्यांमध्ये काही दृष्टिक्षेप झाले, काही खाणाखुणा झाल्या आणि प्याद्याचे त्या पटावरील आयुष्य संपले.
त्याने आपला लॅपटॉप बंद केला - तो इथेच ठेऊन जायचे होते, गेल्याच महिन्यात बढती मिळाल्या निमित्तच्या पार्टीसाठी घेतलेला कोट/जॅकेट, खुर्चीच्या पाठीवरून उचलला, झटकून हातावर टाकला. केबिनचा दरवाजा हळूच उघडून, मागे एक दृष्टिक्षेप टाकला - काही बरोबर न्यायचे नव्हतेच.
या प्याद्याचा या पटावरील डाव संपला होता. दरवाजा बंद करून प्यादा निघाला, पुढचा पट शोधायला.

कथालेख

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Apr 2023 - 11:32 am | राजेंद्र मेहेंदळे

आवडली. जरा नेटकी केली असती तर शशक झाली असती.

शेखर काळे's picture

6 Apr 2023 - 9:43 am | शेखर काळे

बऱ्याच दिवसांनी प्रयत्न केला. शिवाय फार जवळच्या २-३ जणांच्या बाबतीत हे घडले म्हणून विषय मनात घोळत होता.
पुढच्या वेळेस हे लक्षात ठेवीन.

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2023 - 1:21 pm | कर्नलतपस्वी

इथे सगळ्यांचीच अवस्था प्याद्या सारखी.

कथा आवडली.

सौंदाळा's picture

5 Apr 2023 - 4:10 pm | सौंदाळा

कथा आवडली

गवि's picture

5 Apr 2023 - 4:31 pm | गवि

चांगली कथा आहे.

मी बुद्धिबळातील तज्ञ नव्हे. कधी कधी वेळ घालवण्यापुरता खेळणे इतकेच. पण प्यादे पलीकडे शेवटाला जिवंत पोचले की हत्ती, घोडा, उंट, वजीर यापैकी काहीतरी ऑलरेडी मेले असल्यास जिवंत होते इतके माहीत होते. राजा बनणे यासाठी मुळात राजा मेलेला असला पाहिजे, तसे असेल तर खेळ आगोदरच संपला असेल आणि तसे नसेल तर दोन राजे कसे आणणार हा प्रश्नच आहे.

प्याद्याचा वजीर हे चालेल असे वाटते.

मेले नसल्यास नव्हे तर जिवंत असल्यासही क्लोन तयार होतेत. थियरोटीकली एकावेळी पटावर 9 वजीर किंवा 9 घोडे किंवा 9 उंट किंवा 9 हत्ती राहू शकतात.

बाकी बुद्धिबळात खरा राजा वजीरच म्हणायचा :)

नवीन माहिती कळली. धन्यवाद. पटावर ठेवायला अधिकच्या सोंगट्या सेट मध्ये असतात का?

बाकी हल्ली कुणाशी मॅच खेळून हरवले की नाही ? मी नावे घेत नाही.

प्रचेतस's picture

5 Apr 2023 - 5:03 pm | प्रचेतस

नवीन माहिती कळली. धन्यवाद. पटावर ठेवायला अधिकच्या सोंगट्या सेट मध्ये असतात का?

नै, पोचलेले प्यादेच विशिष्ट सोंगटी म्हणून वापरायचे. मेलेली सोंगटी परत जीवंत केली तर ती वापरता येते.

बाकी हल्ली कुणाशी मॅच खेळून हरवले की नाही ? मी नावे घेत नाही.

येथील एक ज्येष्ठ सदस्य पूर्वी माझ्याशी खेळायचे पण खूपदा हरल्यावर त्यांनी माझ्याशी खेळणे बंद केलेय.
मी ही नाव घेत नाही.

चांदणे संदीप's picture

5 Apr 2023 - 5:44 pm | चांदणे संदीप

चेस.कॉम वर आहात काय तुम्ही?

प्रचेतस's picture

5 Apr 2023 - 5:53 pm | प्रचेतस

आहे की :)

येथील एक ज्येष्ठ सदस्य पूर्वी माझ्याशी खेळायचे पण खूपदा हरल्यावर त्यांनी माझ्याशी खेळणे बंद केलेय.

त्यांना बहुतेक तुमच्या सगळ्या चाली समजल्या असतील आणि आता नवीन काही शिकायला शिल्लक नसेल म्हणुन खेळत नसतील.

शेखर काळे's picture

6 Apr 2023 - 9:49 am | शेखर काळे

गवि, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. वजीर लिहायला हवे होते.
पण, या गोष्टीला किनार आहे ती सिलिकॉन व्हॅली मधल्या सद्य परिस्थितीची; किंबहुना ही गोष्ट कित्येक वेळा घडून गेलेली आहे.
आपल्या ध्येयाच्या (वरच्या पदाच्या) जवळ पोचताना बरेच अडथळे असतात आणि पाय खेचणारेही असतात.

विवेकपटाईत's picture

5 Apr 2023 - 5:16 pm | विवेकपटाईत

मस्त कथा. बाकी सहज आठवले अनेक प्यादे, एवढेच काय हत्तीही बाद झाला ( अर्धा डझन सासरी गेले). ईमानदार राजाला काही एक फरक पडला नाही.

शेखर काळे's picture

6 Apr 2023 - 9:57 am | शेखर काळे

कोणाचे सामर्थ्य वाढले असे दिसले की, पाय खेचणारे (राजासहित) तयार असतात.