चांदणचुरा !
प्रेम एकदाच होतं आयुष्यात !
त्या नंतर उरते ती
फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स !
भरती ओहोटी ने कोरडे झालेले
ते डोळे पुसून घ्यायचे ,
उसवलेलं पुन्हा विणून घ्यायचं ,
तू नाहीयेस इथे म्हणून
चंद्राची समजूत काढायची ,
झोंबणाऱ्या गार वार्याला
मिठीमध्ये सामावून घ्यायचं ,
बरंच काही सांडलेले
पुन्हा गोळा करून चालत राहायचं !
हूर हूर लावणारी ती रोजची निःसंग संघ्याकाळ
एकदा पार पडली, कि मग सारं आलबेलच !
या सगळ्या मध्ये भीती वाटत राहते ,
हा काळोख ग्रासून घेईल का
आपला मिणमिणता दिवा ?
धस्स होऊन पुन्हा मागे वळून पाहिलं ,
तर अजूनही चमकत असतो रेतीमध्ये
तुझ्या नि माझ्या स्वप्नांचा तो विखुरलेला चांदण चुरा !
-----//फिझा
--
प्रतिक्रिया
5 Apr 2023 - 4:10 pm | चांदणे संदीप
सुंदर रचना.
सं - दी - प
6 Apr 2023 - 1:20 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर ! चित्रदर्शी रचना !!!
❤️
अवांतर : पुर्वी मिपावर "वाऱ्याला" असं र ला य जोडून ऱ्य लिहिता यायचं !
पुर्वीचं मिपा राहिलं नाही !
आंजावरचं मराठी लेखन असंच बिघडत चाललं आहे !
10 May 2023 - 5:02 am | फिझा
टंकन करताना वाऱ्याला असंच लिहिले होते . पेस्ट करताना ऑटो करेक्ट होऊन बहुतेक वार्याला असं झाला असेल
क्षमस्व आणि दखल घेतल्याबद्दल धन्यवाद . मराठी बिघडत चालले नाहीये पण काही technical mistake होऊ शकतात असं दिसत आहे .
6 Apr 2023 - 1:53 pm | कर्नलतपस्वी
आजही वार्या ला
वाऱ्या
लिहीता येते.
यात मिपाचा काय बी दोष नाय.
6 Apr 2023 - 5:30 pm | चौथा कोनाडा
वार्याला .. इंग्रजी r हे अक्षर वापरून लिहिलेय !
वार्याला ... इंग्रजी R हे अक्षर वापरून लिहिलेय !
पुर्वी कॅपिटल R हे अक्षर वापरून लिहायचो असं
आता काय पद्धत असते ?
आंजावर सर्वत्र वाऱ्याला असं न दिसता वार्याला असं का दिसतं ?
6 Apr 2023 - 7:36 pm | कर्नलतपस्वी
मोबाईल वर ऑप्शन आहे मराठी की बोर्ड, डायरेक्ट मराठीतच टंका.
सॅम के संग
मराठी के रंग
😀
13 Apr 2023 - 1:13 pm | चौथा कोनाडा
बास का कर्नल साहेब ?
आम्ही अंकधर आणि मिपाशी एकनिष्ठ आहोत !
6 Apr 2023 - 7:41 pm | Bhakti
सुरेख!
6 Apr 2023 - 11:51 pm | विंजिनेर
चांदणचुरा - काय सुंदर शब्द आहे!
10 May 2023 - 5:07 am | फिझा
प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांच्या एका मुलाखती मध्ये ऐकला होता हा गोड़ शब्द , त्यांचा संदर्भ वेगळा होता तेव्हा , पण मला शब्द भावला खूप ,,,,सो मला हव्या त्या अर्थी मी कवितेमध्ये वापरला .... चांदणचुरा
7 Apr 2023 - 7:08 am | तुषार काळभोर
काव्य आणि शब्द दोन्ही आवडले.
11 Apr 2023 - 7:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कविता प्रगल्भ झालीये आता.
फार सुंदर कल्पना आणि फार सुंदर मांडणी.