अव्यक्त

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Feb 2023 - 6:25 pm

मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी
अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी

अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी
ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी

अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी
बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी

बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी
भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी

भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी
दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी
२७-१-२०२३

अव्यक्तकविता

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 6:07 am | कुमार१

छान व्यक्त झालात !

प्रचेतस's picture

4 Feb 2023 - 6:49 am | प्रचेतस

सुरेख
मात्र बोझीलचा अर्थ नीट लागला नाही, ओझ्याने वाकलेले किंवा ओझ्याने भरलेले असा अर्थ आहे का?

भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी
दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी

इथं दिव्यांगच्या जागी अबोल हा शब्द चपखल बसला असता असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

4 Feb 2023 - 9:17 am | कर्नलतपस्वी

कुमारेक सर,प्रचेतस भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

माझ्या अल्प मराठी भाषेच्या माहीती प्रमाणे अबोल हा स्वभाव आहे. तो काही प्रमाणात बदली होऊन शकतो.

दिव्यांग ही जन्मजात लाभलेली शारीरिक अवस्था.बदली होत नाही. म्हणजे सक्षम असतानाही व्यक्त झालो नाही कारण ज्याच्या जवळ व्यक्त व्हावे असे कुणी भेटलेच नाही.

बोझिल, हा तसा हिन्दी शब्द. जड झालेले,असा एक अर्थ.

बाकी काय शब्दांची कसरत. टाईमपास.

चित्रगुप्त's picture

5 Feb 2023 - 2:34 am | चित्रगुप्त

'गझले'चा तोंडावळा ल्यालेल्या या रचनेचा आशय भावला. हल्लीच्या विविध 'माध्यमां'द्वारे निरूपयोगी माहिती आणि सवंग करमणुकीच्या महापुरात गटांगळ्या खात असलेल्या बहुतांश लोकांची हीच व्यथा असावीसे वाटते.

एवीतेवी 'गजल' या प्रकारात हात घात घातलाच आहे, तर त्यातले मतला, काफिया, रदीफ, अलामत वगैरेचे तंत्र/कसब आत्मसात करून सकस रचना करण्याचा अवश्य प्रयत्न करावा, असे सुचवावेसे वाटते. आशयाइतकाच 'घाट' महत्वाचा.
शक्यतो याच रचनेचा पुनर्विचार करून संशोधित आवृत्ती इथे देता आली तर उत्तमच.

'मुक्तछंद' प्रकार वगळता अन्य प्रकारच्या रचनेत त्या त्या वृत्त/छंदाचे नियम - लघु-गुरू, मात्रा, गण वगैरे यथायोग्य असल्याशिवाय मजा येत नाही. आवडेल, भावेल असे एकाद-दुसरे वृत्त आत्मसात करून त्यात रचना करत रहाणे उपयोगी आणि मनोरंजक ठरेलसे वाटते. (उदा. 'मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे' आणि 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं - वफा कर रहा हूं, वफा चाहता हूं' या दोहोंची चाल एकमेकांना लावून बघा)

'बोलबच्चन' होतो तरिही, अव्यक्तच राहिलो मी ???

रंगीला रतन's picture

5 Feb 2023 - 5:20 pm | रंगीला रतन

च्यामायला मोकलाया वाचल्यावर डायरेक्ट मोकलाया दाहि दिश्या आठवलि
https://www.misalpav.com/node/6332
तुम्हि कॉपिराईट भंग केला आहे :=) :=)

चांदणे संदीप's picture

10 Feb 2023 - 8:31 pm | चांदणे संदीप

तुम्हि कॉपिराईट भंग केला आहे :=) :=)

+११११११११११ =))

सं - दी - प

प्राची अश्विनी's picture

7 Feb 2023 - 10:49 am | प्राची अश्विनी

छान!
पण पहिला शब्द वाचताच मिपावरील अजरामर कविता आठवली.:)