कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्या वरती झुलता झुलता
पदराखाली पुन्हा लपावे
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे
डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्यावरले धुके पुसावे
हुरहुरत्या कातरवेळी कधी कुणाची वाट बघावी
दुरून बघता ओंजळीतली फुले दिसावी
किती मिळाली किती गळाली,खंत नसावी
कधी वाटते मावळतीची दिशा पूर्व असावी
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
प्रतिक्रिया
12 Jan 2023 - 2:47 pm | चित्रगुप्त
कविता एकंदरित आवडली, पण अर्थ पूर्ण स्पष्ट होत नाहीये.
उदाहरणार्थ खालील ओळी नीट समजल्या नाहीतः
... पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे..
... डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्यावरले धुके पुसावे...
... कधी वाटते मावळतीची दिशा पुर्व असावी ....
कसरत ... (???? हे काय बुवा?)
'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात.
.
12 Jan 2023 - 3:46 pm | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम.
अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील.ण्याची
'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात.
पाढंरे निशाण
बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे
कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला पुन्हा एकदा निसटलेले पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीच उगवती झाली तर?
असा विचार मांडला आहे.
12 Jan 2023 - 3:55 pm | कर्नलतपस्वी
मोबाईलवर टाइपिंग जरा कठीणच.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम.
अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील.
'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात.
पाढंरे निशाण
बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे
कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला निसटलेले क्षण पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीची उगवती झाली तर कदाचित इच्छा पुर्ण होईल का?
असा विचार मांडला आहे.
12 Jan 2023 - 3:55 pm | कर्नलतपस्वी
मोबाईलवर टाइपिंग जरा कठीणच.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम.
अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील.
'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात.
पाढंरे निशाण
बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे
कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला निसटलेले क्षण पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीची उगवती झाली तर कदाचित इच्छा पुर्ण होईल का?
असा विचार मांडला आहे.
12 Jan 2023 - 4:32 pm | चित्रगुप्त
मोबैलैवजी ल्यापटोपावरि टंकावे म्हणिजे बरे.
12 Jan 2023 - 6:32 pm | चांदणे संदीप
कवितेचा आशय सुंदर.
सं - दी - प
13 Jan 2023 - 1:04 pm | चांदणे संदीप
मावळतीची दिशा गुलाबी
अंधाराच्या आधी दिसते
शीण दिसाचा डोळे मिटतो
गुणगुण काही ओठी येते
सं - दी - प
12 Jan 2023 - 7:50 pm | प्रचेतस
सुरेख एकदम
13 Jan 2023 - 7:49 am | कुमार१
सुरेख आहे!
13 Jan 2023 - 9:20 am | Deepak Pawar
सुंदर कविता.
13 Jan 2023 - 10:40 am | श्वेता२४
आवडली
13 Jan 2023 - 12:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
जरा ओळी सुधारायच्या म्हटले तर असे जमेल (आवडले नाही तर बिंधास उडवुन टाका हा.का.ना.का)
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
आणि निसटल्या काही क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्यावर झुलता झुलता , अगदी अलगद तरीही नकळत
पदराखाली पुन्हा लपावे !!
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
आणि भोगल्या तृप्त क्षणांना पुन्हा जगावे
आठवणीतील विस्मृत चेहरे , आणिक मित्र सुहृदही सारे
डोळ्यांमधुनी स्पष्ट दिसावे !!
हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी
दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी
किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी
मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!!
शेवटचे कडवे जरा वेगळेच आहे, पण "मावळतीची दिशा पुर्व असावी" ही पंच लाईन असल्याने बदलता येत नाहीये.
13 Jan 2023 - 2:19 pm | कर्नलतपस्वी
सर्व वाचक,प्रतिसादांचे मनापासून आभार.
प्रतिसाद स्पष्ट असल्यामुळेच चुका लक्षात येत आहेत. दृष्टिकोन व दृष्टी दोन्ही मधे सुधारण्यास मदत होत आहे.
सर्वश्री चित्रगुप्त, राजेंद्र मेहेंदळे आणी संदीप चादंणे धन्यवाद
13 Jan 2023 - 5:43 pm | Bhakti
मावळतीची दिशा पूर्व असावी
सुंदरच आशा!
13 Jan 2023 - 5:51 pm | Bhakti
तुझे मुक्त हसू ज्या क्षितिजी
मजसाठी पूर्व दिशा तिथे...
तुझ्या मिठीत मावळती रंग
मजसाठी पूर्व दिशा तिथे...
-भक्ती
15 Jan 2023 - 10:02 am | कर्नलतपस्वी
भक्ती धन्यवाद.
सुंदर कवीता, आवडल्या चार ओळी विस्तार करा.
14 Jan 2023 - 11:02 am | सस्नेह
कर्नल लोक्सही कवी असतात तर !
:))
15 Jan 2023 - 10:16 am | कर्नलतपस्वी
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हातात बंदूक
पाठीवर संदूक
पायात जोडा
घरचा ओढा
कोमल तळवे
मनाने हळवे
सीमेवर लक्ष
शैतान भक्ष
आसे फौजीचे वर्णन.
15 Jan 2023 - 10:46 am | कर्नलतपस्वी
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हातात बंदूक
पाठीवर संदूक
पायात जोडा
घरचा ओढा
कोमल तळवे
मनाने हळवे
सीमेवर लक्ष
शैतान भक्ष
आसे फौजीचे वर्णन.
15 Jan 2023 - 11:17 am | कंजूस
एकदम आल्या आहेत.
एक कविता चार लेखांचा ऐवज देऊन जाते.
15 Jan 2023 - 12:58 pm | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.