✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मावळतीची दिशा....

क — कर्नलतपस्वी, गुरुवार, 01/12/2023 - 11:36
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

प्रतिक्रिया द्या
7125 वाचन

💬 प्रतिसाद (21)

कविता आवडली, अर्थ स्पष्ट होत नाहीये.

चित्रगुप्त
गुरुवार, 01/12/2023 - 14:47 नवीन
कविता एकंदरित आवडली, पण अर्थ पूर्ण स्पष्ट होत नाहीये. उदाहरणार्थ खालील ओळी नीट समजल्या नाहीतः ... पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे.. ... डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे... ... कधी वाटते मावळतीची दिशा पुर्व असावी .... कसरत ... (???? हे काय बुवा?) 'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात. .
  • Log in or register to post comments

ह्म्म....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 01/12/2023 - 15:46 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम. अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील.ण्याची 'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात. पाढंरे निशाण बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला पुन्हा एकदा निसटलेले पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीच उगवती झाली तर? असा विचार मांडला आहे.
  • Log in or register to post comments

आता सुधारणे कठीण वाटते....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 01/12/2023 - 15:55 नवीन
मोबाईलवर टाइपिंग जरा कठीणच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम. अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील. 'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात. पाढंरे निशाण बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला निसटलेले क्षण पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीची उगवती झाली तर कदाचित इच्छा पुर्ण होईल का? असा विचार मांडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

आता सुधारणे कठीण वाटते....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 01/12/2023 - 15:55 नवीन
मोबाईलवर टाइपिंग जरा कठीणच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिष्टेका दाखवल्याबद्दल प्रणाम. अशाच दाखवत रहा,सुर्यास्ता पर्यंत नक्कीच ठिक होतील. 'बघवी', 'पुर्व' ... 'ओजंळीतली' वगैरे मिष्टेका राहून गेल्यात. पाढंरे निशाण बघावी,पूर्व,ओंजळीतली असे वाचावे कवी मावळतीच्या दिशेने चाललाय. त्याला निसटलेले क्षण पुन्हा एकदा अनुभवावे वाटतात. म्हणून मावळतीची उगवती झाली तर कदाचित इच्छा पुर्ण होईल का? असा विचार मांडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मोबैलैवजी ल्यापटोपावरि टंकावे म्हणिजे बरे.

चित्रगुप्त
गुरुवार, 01/12/2023 - 16:32 नवीन
मोबैलैवजी ल्यापटोपावरि टंकावे म्हणिजे बरे.
  • Log in or register to post comments

कर्नल सर

चांदणे संदीप
गुरुवार, 01/12/2023 - 18:32 नवीन
कवितेचा आशय सुंदर. सं - दी - प
  • Log in or register to post comments

सहज काही सुचले म्हणून

चांदणे संदीप
Fri, 01/13/2023 - 13:04 नवीन
मावळतीची दिशा गुलाबी अंधाराच्या आधी दिसते शीण दिसाचा डोळे मिटतो गुणगुण काही ओठी येते सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हुरहुरत्या कातरवेळी कधी

प्रचेतस
गुरुवार, 01/12/2023 - 19:50 नवीन
हुरहुरत्या कातरवेळी कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली फुले दिसावी किती मिळाली किती गळाली,खंत नसावी कधी वाटते मावळतीची दिशा पूर्व असावी
सुरेख एकदम
  • Log in or register to post comments

सुरेख आहे!

हेमंतकुमार
Fri, 01/13/2023 - 07:49 नवीन
सुरेख आहे!
  • Log in or register to post comments

छान.

Deepak Pawar
Fri, 01/13/2023 - 09:20 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

खूप छान कविता

श्वेता२४
Fri, 01/13/2023 - 10:40 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

कविता आवडली!!

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 01/13/2023 - 12:02 नवीन
जरा ओळी सुधारायच्या म्हटले तर असे जमेल (आवडले नाही तर बिंधास उडवुन टाका हा.का.ना.का) कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे आणि निसटल्या काही क्षणांना पुन्हा धरावे पारंब्यावर झुलता झुलता , अगदी अलगद तरीही नकळत पदराखाली पुन्हा लपावे !! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे आणि भोगल्या तृप्त क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतील विस्मृत चेहरे , आणिक मित्र सुहृदही सारे डोळ्यांमधुनी स्पष्ट दिसावे !! हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! शेवटचे कडवे जरा वेगळेच आहे, पण "मावळतीची दिशा पुर्व असावी" ही पंच लाईन असल्याने बदलता येत नाहीये.
  • Log in or register to post comments

सर्व वाचकांचे मनापासून आभार..

कर्नलतपस्वी
Fri, 01/13/2023 - 14:19 नवीन
सर्व वाचक,प्रतिसादांचे मनापासून आभार. प्रतिसाद स्पष्ट असल्यामुळेच चुका लक्षात येत आहेत. दृष्टिकोन व दृष्टी दोन्ही मधे सुधारण्यास मदत होत आहे. सर्वश्री चित्रगुप्त, राजेंद्र मेहेंदळे आणी संदीप चादंणे धन्यवाद
  • Log in or register to post comments

मावळतीची दिशा पूर्व असावी

Bhakti
Fri, 01/13/2023 - 17:43 नवीन
मावळतीची दिशा पूर्व असावी सुंदरच आशा!
  • Log in or register to post comments

माझ्या दोन ओळी

Bhakti
Fri, 01/13/2023 - 17:51 नवीन
तुझे मुक्त हसू ज्या क्षितिजी मजसाठी पूर्व दिशा तिथे... तुझ्या मिठीत मावळती रंग मजसाठी पूर्व दिशा तिथे... -भक्ती
  • Log in or register to post comments

भक्ती धन्यवाद.

कर्नलतपस्वी
Sun, 01/15/2023 - 10:02 नवीन
भक्ती धन्यवाद. सुंदर कवीता, आवडल्या चार ओळी विस्तार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

छान कविता!

सस्नेह
Sat, 01/14/2023 - 11:02 नवीन
कर्नल लोक्सही कवी असतात तर ! :))
  • Log in or register to post comments

स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल

कर्नलतपस्वी
Sun, 01/15/2023 - 10:16 नवीन
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हातात बंदूक पाठीवर संदूक पायात जोडा घरचा ओढा कोमल तळवे मनाने हळवे सीमेवर लक्ष शैतान भक्ष आसे फौजीचे वर्णन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल

कर्नलतपस्वी
Sun, 01/15/2023 - 10:46 नवीन
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हातात बंदूक पाठीवर संदूक पायात जोडा घरचा ओढा कोमल तळवे मनाने हळवे सीमेवर लक्ष शैतान भक्ष आसे फौजीचे वर्णन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आठवणी दाटत आहेत.

कंजूस
Sun, 01/15/2023 - 11:17 नवीन
एकदम आल्या आहेत. एक कविता चार लेखांचा ऐवज देऊन जाते.
  • Log in or register to post comments

कंजूस भौ....

कर्नलतपस्वी
Sun, 01/15/2023 - 12:58 नवीन
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा