आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू
तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
.
.
दीपक पवार.
प्रतिक्रिया
19 Dec 2022 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता. लिहिते राहावे....!
अर्रर्र...! हे तर लै त्रासदायक. कचाकचा भांडण परवडलं
पण, त्यांचे ते 'रुसणे' बाप रे....! :)
-दिलीप बिरुटे
20 Dec 2022 - 9:20 am | Deepak Pawar
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
20 Dec 2022 - 11:48 am | कानडाऊ योगेशु
सरांशी सहमत.
वपुंनी सांगितल्याप्रमाणे स्त्रीयांचे सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे अबोला.
कविता आवडलीच पण तव ,गे ह्या शब्दांमुळे जुन्या काळातल्या कवीने लिहिल्यासारखी वाटली.
20 Dec 2022 - 11:08 am | कर्नलतपस्वी
तुमची कवीता आवडली. डोक्यात एक विचार चमकून गेला.....
दिपक पवार
काॅलेज कुमार
डोक्यात घोळतो
एकच विचार
ती सध्या कुठे असते
ती सध्या काय करते
मस्त हलकेच घ्या.
20 Dec 2022 - 2:15 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर,कानडाऊ योगेशु सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
27 Dec 2022 - 5:10 pm | भागो
ही पण आवडलीच!
27 Dec 2022 - 6:09 pm | Deepak Pawar
भागो सर मनःपूर्वक धन्यवाद.