विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून.
मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्याचदा प्राणि पुरणे. ज्या समुदायांच्या इतिहासाचे लिखीत माध्यमातून जतन होऊ शकले नाही अशा संस्कृतींच्या प्राचीन दफनभूमींचा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक संशोधन आणि अभ्यास करत असतात.
प्रागैतिहासिक काळात मोठमोठ्या ओबडधोबड दगडांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) म्हणतात. मानवी सांस्कृतिक इतिहासात महाश्मयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत : (१) या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महाश्मयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा सद्यस्थितीत काही ठिकाणी प्रचलित आहेत. (२) या संस्कृतीचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळा आहे. उदा., यूरोपमध्ये या संस्कृतीचा काळ इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक एवढा असला, तरी भारतात उपलब्ध पुराव्यानुसार तो इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात या आधी फारसा जात नाही.
महाश्मयुगीन संस्कृती समुहां नेमके कोणते होते यांची खुपशी माहिती मिळत नाही. त्यामुळे याबद्दल अभ्यासकात विविध मते प्रचलित आहेत. पण सर्व ठिकाणी ही महाश्मयुगीन स्मारके मानवी दफनाशी संबद्ध दिसतो. यूरोपातील फार मोठा प्रदेश या संस्कृतीने व्यापला आहे तथापि भारताप्रमाणेच यांची वसतिस्थाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे या संस्कृतींशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिलेले आहेत.
भारतीय उपखंडातील महाश्मयुगीन अवशेषांबद्दल अद्याप फारसे विस्तृत संशोधन झालेले नाही. भारतात महाश्मयुगीन संस्कृतीचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) दख्खन, (२) उत्तर व वायव्य प्रदेश आणि (३) ईशान्य प्रदेश. (उत्तर भारतात फारसे अवशेष सापडलेले नाहीत) .. बलुचिस्तान आणि मकरान येथील अवशेषही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातील महाश्मयुगीन दफनात एककेंद्रीय चक्राचे चित्रण असलेली मृद्भांडी, लोखंडाच्या वस्तू व घोड्याचे अवशेष सापडतात. या प्रादेशिक महाश्मयुगीन संस्कृतीचा एकमेकींशी काही संबंध होता किंवा कसे व तो असल्यास त्याचे स्वरूप काय होते, याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही आणि अवशिष्ट पुराव्याबद्दलही एकमत नाही.
शिळावर्तुळ दफने सर्वांत जास्त ठिकाणी एकवटल्याचे स्थान महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरबांडा हे होय. दफनातील ही विविधता बऱ्याच प्रमाणात स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या-प्रस्तर, शिळा, दगडगोटे, फरशा या सामग्रीमुळे आलेली आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. या विविध प्रकारांना इंग्रजीत भिन्न नावे दिलेली आढळतात: केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल इत्यादी. .. नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, तलवारी, कट्यारी, त्याचप्रमाणे कढ्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त नक्षी असलेली तांब्याची कडी, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूही मिळाल्या. यांपैकी एक कट्यार वैशिष्ट्यपूर्ण असून तिचे पाते लोखंडाचे व मूठ तांब्याची आहे. या व्यतिरिक्त घोड्याच्या तोंडावर घालावयाचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनविलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले. मृत्पात्रांत सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी असून त्यांच्या झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोट्या आकारात करून त्या झाकण्यांच्या शीर्षावर बसवल्याचे आढळून आले. (१९८० च्या दशकात झालेल्या संशोधनात या संस्कृतींचा काळ ∼2nd century BC to ∼7th century AD. वर्तवण्यात आला होता)
दफनात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हे लोक भटके होते का? असा प्रश्न पडतो तथापि त्यात फारसे तथ्य नसावे. या लोकांनी तलाव बांधले, भातशेती मोठ्या प्रमाणावर रूढ केली इ. महत्त्वाच्या बाबी द. भारतातील संगम वाङ्मयातील उल्लेखावरून प्रचलित असाव्यात असे दिसते. महाश्मयुगीन दफनपद्धतीच्या काही प्रकारांचा उल्लेखही संगम वाङ्मयात आलेला आहे मात्र घरेदारे व वसाहती यांच्या स्वरूपाबद्दलचा पुरावा अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. अगदी अलीकडे महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुण्ड व भागी माहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.
महाश्मयुगीन संस्कृतीचा भारतातील काळ आतापर्यंत तरी प्रामुख्याने दक्षिण भारतातील या संस्कृतीच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या कार्बन-१४ कालमापनानुसार बराचसा निश्चित करण्यात आला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ब्रह्मगिरीच्या उत्खननाच्या आधारे महश्मयुगीन संस्कृतीचा काल इ.स.पू.सु. २०० ते इ. स. पहिल्या शतकाचा मध्य असा वर्तविला. काही महाश्मयुगीन दफनांत रोमन नाणी सापडल्यामुळे या दफनांचा अंतिम काल इसवी सनाचे पहिले शतक असा निश्चित करता येतो तथापि हल्लूर (कर्नाटक) व टाकळघाट (महाराष्ट्र) येथील पुराव्यांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसार आलेल्या सनावळ्या अनुक्रमे इ.स.पू. ९५० ± १०० व ११०५ ± १०० आणि इ.स.पू. ५५५ ± ११५ व ६०५ ± ११० अशा असल्याने महाश्मयुगीन संस्कृतीचा प्रारंभकाल कमीतकमी इ.स.पू.सु. १००० इतका मागे नेता आलेला आहे.
***
याच विषयास अनुसरुन विदर्भातील उबळी (नागपूर) आणि चंद्रपूर येथील अवशेषावर आधारीत संशोधन लेख New chronology for MEGALITHIC BURIALS IN VIDARBHA Nikhil Patel अलिकडे (जुलै २०२२) प्रकाशित झालेला आहे. संशोधकांच्या मते मध्य भारतातील महाअश्मयुगीन संस्कृतीबद्दलचे हे संशोधनामुळे तेथिल संस्कृतीच्या अभ्यासास साह्य्यकारी आहेच पण सोबत दक्षिण भारतीय Neolithic-Chalcolithic सांस्कृतिक काळाच्या (∼500 BC to ∼AD 700) अभ्यासासाठी उपयूक्त ठरू शकेल. या वैदर्भीय अश्मयुगिन दफनभूमींची वैशिष्ट्ये म्हण्जे Cairn म्हणजे वर्तुळाकार दगडांनी झाकलेले असणे, अनेक मानवाशेषांसोबत पुरलेल्या घोड्यांचे अवशेष आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. हाडांच्या अवशॅषांच्या अभ्यासास बर्याचदा मर्यादा पडतात अशावेळी दातावरील आवरण आणि मातीच्या भाडंयातील अन्नावशेश आणि हे अवशेष पुरलेली माती यांचा अभ्यास मदतीस येतो. या तिन्ही गोष्टींच्या वैज्ञानिक संशोधनातील काळ एकमेकांशी पुरेसा जुळल्याने (ओव्हरलॅप) असा एकत्रित व पद्धतशीर तौलनिक पडताळणी करणारे हे संशोधन रोचक ठरावे.
उबळी येथिल उत्खननात संशोधकांना nail-parers, spearheads, chisels, bridle bits used
for horses, a large number of aurum (archaic gold) micro disc beads, and semi-precious stone beads. The faunal remains here consisted mainly of horse bones and teeth. या गोष्टी मिळाल्या होत्या. तुलनेसाठी १९९५ ९६ काळात चंद्रपूर उत्खनात सापडलेल्या घोड्यांच्या दातांचाही अभ्यास केला गेला.
हे नवे संशोधन म्हणते " However, we here presented new AMS 14 C dates of Megalithic culture in Vidarbha region by dating equine teeth enamel of Ubali burials (Meg-10 and Meg-33) and organic food remains recovered from burial cooking pots. The total age range for Ubali megaliths of the
Vidarbha region is AD 250–1016 .. the regional ecosystem of Vidarbha should have experienced water stressed conditions. This
scenario is corroborated .. that during early historic times (1st–7th century AD), the Vidarbha region was likely receiving significantly less
rainfall .. compared to today.
* पुर्वी वर्तवलेल्या (∼500 BC to ∼AD 700) काळ भाकीता पेक्षा AD 250–1016 हे काळ भाकीत संस्कृतीच्या अधिक काळाची म्हणजे इस्वी 1016 पर्यंत शक्यता वर्तवते.
* The generated isotopic data clearly indicated crop-vegetation values (C 4, millet type).
*
* प्रागैतिहासिक लेखी इतिहास उपलब्ध आहे त्या आधीचा काळ
* मी लेख विषयाचा अभ्यासक नसल्यामुळे लेखातील उल्लेखातील त्रुटींबद्दल चुभूदेघे.
* या विषयाशी अधिक माहिती उलगडण्यात कुणि मदत करू शकेल तर नक्कीच सहर्ष विनंती आणि स्वागत
* विषयास अनुसरून नसलेले, भाषा व्याकरण शुद्धलेखन विषयक प्रतिसाद न देण्यासाठी आभार.
प्रतिक्रिया
2 Sep 2022 - 8:36 pm | माहितगार
* दुरुस्ती
'..आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.
एवजी
..आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.
असे वाचावे.
2 Sep 2022 - 9:58 pm | कर्नलतपस्वी
लेख आवडला.
2 Sep 2022 - 10:26 pm | तुषार काळभोर
इसपू ५०० च्या आसपास हिंदू धर्मातून बौद्ध व जैन वेगळे झाले, याचा अर्थ त्यावेळी हिंदू धर्म बऱ्यापैकी (किमान नर्मदेपर्यंत) सुस्थापित असावा. चितेचा उल्लेख महाभारतात नक्की आहे. म्हणजे किमान इसपू ५०० वर्षे वा त्याच्या आधी. म्हणजे मृत शरीराचे दहन हे देखील सुस्थापित असणार (सध्या हिंदू धर्मातील लिंगायत आणि महानुभव पंथात दफन केले जाते. अजूनही काही असावेत. तसेच काही पंथ त्यावेळी नक्कीच असतील. पण..)
मृत शरीरासोबत भौतिक वस्तू ठेवणे जेणेकरून मृताच्या पुढील प्रवासात उपयोगी पडतील, हा प्रकार आता किंवा तेव्हाच्या हिंदू दफन विधीत कितपत असेल? मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे 'लाड' केले जात असतील का? कारण आत्मा अमर असतो, आणि मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासाला जातो, पार्थिव शरीर येथेच राहते अशी हिंदू धर्मातील सामान्य धारणा आहे.
अवांतर : (केवळ हवेली व पुरंदर तालुक्यातील मराठा व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे निरीक्षण) - दशक्रिया विधीच्या वेळी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू - चिवडा, अंडे, टोस्ट - खारी, अगदी दारूची बाटली, तिथे ठेवल्या जातात. इतर ठिकाणी, इतर जातींमध्ये असं असतं का, माहिती नाही. हा प्रकार मृत शरीराबरोबर काही गोष्टी ठेवणं यातून पुढे आलेला असेल का?
3 Sep 2022 - 8:06 am | माहितगार
@ तुषार काळभोर, विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख पाहील्यास जागतिक इतिहासात अंत्यविधीचे अनेक प्रकार मिळतात. दहन हे भारत आणि हिंदू धर्मापुरते मर्यादीत नाही. अगदी १७००० वर्षापुर्वीचे ऑस्ट्रेलियन दहन पुरावे पुरातत्व तज्ञांना मिळाले आहेत. दुसरीकडे अगदी ऋग्वेदातही दफनाचेही उल्लेखही मिळतात, माझ्या मते धार्मीक तत्वज्ञानाच्या विकासासोबत ब्राह्मणी अंत्यसंस्कार पद्धती विकसीत होऊन सावकाश पणे काळाच्या ओघात इतर समुदायांनी त्यांचे अनुकरण केले असण्याची शक्यता अधिक असावी. आणखी एक महत्वाची बाजू (ऐतिहासिक काळात) दहन आणि दफन या दोन्ही क्रिया स्थान परिस्थिती साधनांच्या उपलब्धेतेवर निर्भर करत असाव्यात. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावयाचे त्याच्या सोबत एखादीच व्यक्ती असेल तर ती उपलब्ध साधनांच्या मर्यादेत निर्णय घेईल जसे अग्नी उपलब्ध नसेल पण जमीन खोदण्याचे साधन असेल किंवा नैसर्गीक खड्डा उपलब्ध असेल तर पुरण्याचा विचार करेल. खड्डा आणि खोदण्याचे साधन नसेल पण अग्नी उपलब्ध असेल तर अग्नीही देईल. (नदी टेकड्या जंगलात मृतदेह सोडून देण्याचेही प्रकार होतात त्यात नदीत सोडणे हिंदू धर्मातही पुरेशा प्रमाणात होत असावे). दहन विषयक काळाचे पुरातत्वीय पुरावे अधिक कठीण जातात. हिंदू धर्मातील दहनानंतर राख आणि अस्थी नदीत सोडून देण्याच्या प्रकाराने पुरात्त्वीय अवशेष उपलब्ध्तेची शक्यता आणखीनच खालावते. पण या (दहन) पद्धती हिंदूधर्वीयातही सार्वत्रिक होण्यात बराच कालावधी गेला असावा. युद्धावर गेलेल्या राजे महाराजांना त्यांचे चेले किंवा आप्तांनी मृतदेह शोधून दहन संस्कार केले तरच इतर सैनिकांच्या खासकरून अनेक एकट्या दुकट्या सैनिकांच्या नशिबी दफन विधीच आले असण्याची शक्यता आहे.
आणि बहुधा त्यामुळेच युरोपातील आणि भारतातील अश्मयुगीन दफनस्थळात दगडांच्या खुणा ठेवण्याचे साधर्म्य दिसले तरी भारतीय दगडी खुणांच्या दफन स्थळात घोडे आणि शस्त्रांचे अवशेष पुरलेले मिळतात. मृताच्या आवडीच्या गोष्टी ठेवणे हा आत्मा जिवंत राहण्याच्या शक्यते बद्दलच्या श्रद्धेतून होतो. ते दहन केले तरी पिंडदानाच्या वेळी वचन वचन पुर्तीच्या पद्धतीने होतेच.
मी वर लेखात नमुद केले नाही पण घोड्यांच्या मृतावशेषांच्या काळाचा मुद्दा भारतीय इतिहास संशोधनात खूपच महत्वाचा समजला जातो कारण काही (खासकरून आर्य आणि वैदीक संस्कृती बाहेरून आले म्हणणारे) संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीत घोड्याचे समकालीन पुरेसे अवशेष मिळत नाहीत मग घोड्याचे उल्लेख करणारी वैदीक संस्कृती किती प्रमाणात एतदेशिय म्हणता येईल का हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मुलतः घोड्यांच्या अवशेषांबद्दल पुरातत्वीय संशोधकांनी पुरेसे संशोधन केले का हा प्रश्नही निगडीत असावा. असो.
(प्रतिसादकर्त्यांचे आभार)
3 Sep 2022 - 8:08 am | माहितगार
विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख
3 Sep 2022 - 8:56 pm | प्रचेतस
दौंडजवळ ढवळीकर सरांनी केलेले इनामगावचे उत्खनन खूपच प्रसिद्ध आहे.
त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून! चार हजार वर्षांपूर्वीचे असे १३० सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत.
मोठ्यांना पुरण्यासाठी मातीपासून बनवलेली शवपेटी असे तर म्होरक्याला एका चार पायांच्या मातीच्या कुंडीत बसववेल्या अवस्थेत दफन केले जात असे. लहान मुलांना दोन माठ एकमेकांना जोडून त्यात पुरण्याची व्यवस्था असे.
सामान्यांची शवपेटी
म्होरक्याची शवपेटी
लहान मुलांना असे पुरले जात असे
वर तुषार काळभोर यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात चितेचा उल्लेख अगदी स्पष्टपणे आला आहे. पांडूच्या चितेचे वर्णन तर अगदी तपशीलवार केले आहे.
पुराणांत मात्र २ ते ७ वयापर्यंतच्या बालकांचे दहन न करता त्यांचे दफन करावे असे उल्लेख आहेत. संन्याश्याचेही दहन न करता दफन केले जात असे.
इकडे भोसरीत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एक शिलावर्तुळ अस्तित्वात होते. सद्यस्थिती जाऊन पाहिली पाहिजे, ते टिकले असेल असे वाटत नाही.
4 Sep 2022 - 6:45 pm | कंजूस
मृत मनुष्य शरीरासह पुढे प्रवास
करतो अशी धारणा असती तर इजिप्तप्रमाणे भरपूर पुरावे मिळाले असते भारतातील लोकांच्या जीवनाचे.