एक किस्सा
असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे.
अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते.
हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले.
आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच!
मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही.
ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत. आम्ही पुरावे नसल्यास ती गोष्ट कशी मानणार?
मी म्हणालो की तुम्हाला आवडतील तेच पुरावे तुम्ही मानता. इतर सर्व सर्व समोर असेल तरी तुम्ही मानणार नाही. कारण ते तुमच्या सोईचे नसते!
मग मी उदाहरण दिले की अगदी सुरुवातीच्या काळात भगवान विष्णूंनी संपत्तीचा देव कुबेर यांच्याकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतले. म्हंटलं कर्ज आले म्हणजे आले डेबिट आणि क्रेडिट आणि अकाऊंटींग आले? मुळात पैसे ही कल्पनाच भारतीय आहे आणि त्यासोबतच आलेले अकाऊंट पण! ही कथा म्हणजे आर्मस्ट्राँगच्या उक्ती नुसार मॉडर्न भाषेत हे एक लहान पाऊल आहे, मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे. कारण पैसा या संकल्पनेचे हे पहिले लिखित स्वरूप मानले पाहिजे.
ज्युनियर डावा म्हणतो की, या कथा आहेत. यात पुरावा कुठे आहे? आणि आम्ही देव मानत नाही तर भगवान विष्णू वगैरे कसे प्रुव करता? आणि याच्यात मॉडर्न अकाऊंटींग कुठे आहे? त्यांची दोन कॉलम केलेली वही कुठे तरी तरी असली पाहिजे होती. मी म्हणालो की तुम्ही तेच करताय की तुमच्या विचारसरणीला पूरक नसतील ते पुरावे नाहीत. आता विष्णू पुराणात ही कथा आहे पण तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीये तर त्याला मी काय करणार?
मी म्हणालो, बरं ते जाऊ द्या. महाभारतात श्री कृष्णाने हुंडी घेतली-दिली त्याचे काय करणार? जर एका क्ष ठिकाणच्या व्यापार्याने हुंडी ही पद्धती वापरली आणि ती य ठिकाणे ऑनर झाली असा स्पष्ट उल्लेख आहे, तुम्ही शोधा. ज्युनियर डावा म्हणाला की त्या पण कथाच आहेत. महाभारत झालेच नव्हते. ईट इज ओन्ली अ फँटसी.
मी म्हणालो की कथा आहे हे पण ठीक. अहो पण कथा असली तरी किमान काही हजार वर्षे जुनी आहे ना. संकल्पना कथेत तर आहेच ना?
तर तो डावा म्हणतो की त्याचा वापर झाल्याचे लिखित पुरावे नाहीत.
मी म्हणालो बरं ते जाऊ द्या. सातवाहन राजे झाले होते का? ते म्हणाले हो. म्हंटलं चला एक तर गोष्ट मान्य केली.
त्यांनी नाशिकची पांडवलेणी खोदली हे तर मान्य व्हायला हवे कारण तसा शिलालेखच आहे. तेथे एक ग्रीक पद्धतीचे स्फिंक्स सारखे दिसणारे शिल्प खोदलेले आहे. म्हणजे सांस्कृतीक देवाण घेवाण होती?
ते म्हणाले, हो सांस्कृतीक देवाण घेवाण होती. ही देवाण घेवाण व्यापारातही होती कारण सातवाहनांच्या नाणेघाटात व्यापारी गेला तर तिथे टोल द्यावा लागत असे. ही टोलची पद्धत कशी बरं चालत असेल? जमा आणि शासनाचा खर्च हा मेळ राजे गौतमी सातकर्णी कसा बसवत असतील? तो ज्युनियर डावा जरा विचारात पडला.
ज्युनियर डाव्याचे विचार काहीसे बदलत आहेत हे लक्षात आल्यावर मघाचा भडकलेला डावा काका रिंगणात उतरला. मग त्याचे पुरावे असायला हवे ते कुठे आहेत? -
डावे काका म्हणाले.
मी म्हणालो अहो इतका मोठा रांजण खोदून ठेवला आहे ना कातळात आणि म्हणून तर नाव दिले ना नाणे घाट. व्यापारी नाणे टाकल्या शिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. आजही ही सिस्टिम जगभरात टोलच्या रुपाने चालू आहे. गडक्रींनी नाही आणली ती. ही भारतात पहिल्यांदा होती आणि हा कातळात कोरलेला रांजण पुरावा आहे.
पण ते डावे काका म्हणाले तो रांजण काही पुरावा नाही कारण त्याचे काहीही व्यवहार लिखित नाहीयेत.
मी म्हणालो की तुमच्या विचारसरणीला पूरक नसतील ते पुरावे नाहीत हा माझा दावा तुम्ही परत प्रुव्ह करताय!
मी म्हणालो अहो मध्ये आक्रमक आले त्यांनी बरेच काही जाळून टाकले आहे, असो!
मी म्हणालो ते जाऊ द्या. तुमचा आवडता टॉपिक घेऊ. भारतीय सामाजिक शोषण व्यवस्था!
त्यांचा चेहराच उजळला!
मी म्हणालो भारतात शोषण व्यवस्था होती?
ते उसळून म्हणाले होतीच होती.
मी म्हणालो की सावकारी पद्धती शोषण करत होती का?
आणि मग... चेहेरा पडलाच हो त्यांचा!
आता ज्यांना लक्षात आले नाही त्यांच्यासाठी - सावकारी चालण्यासाठी कर्ज + व्याज ही संकल्पना आली. आणि त्याचा देण्याघेण्याचा हिशोब हवा. म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट ही सिस्टिम आलीच! अशा रितीने सिद्ध होत गेले की अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणार प्राचीन काळापासून वापरात आहे.
तर हे असले डावे आणि पुरोगामी आणि त्यांचे चेले. त्याना फक्त त्यांचे युरोपीय पुरावे चालतात आपले भारतीय नाही!
प्रतिक्रिया
26 Aug 2022 - 6:57 am | प्रचेतस
कर पद्धती महाभारत काळापासून भारतात आहेच.
शांतिपर्वातील पुढील श्लोक पहा
विक्रयक्रयमध्वानं भक्तं च सपरिच्छदम् ।
योगक्षेमं च संप्रेक्ष्य वणिजा कारयेत्करान् ||
विकत घेण्याची किंमत, देण्याची किंमत, रस्त्याचा खर्च, नोकरांचा खर्च आणि स्वतःचे योगक्षेम इत्यादी पाहून वाणी (व्यापारी) लोकांवर कर बसवावा.
अश्रोत्रियाः सर्व एव सर्वे चानाहिताग्नयः । तान् सर्वान् धार्मिकोराजा बलिविष्टिं च कारयेत्||
जो ब्राह्मण वेद जाणणारा नसेल व अग्नी ठेवणारा नसेल अशा सर्वांपासून धार्मिक राजाने कर आणि वेठ घ्यावी.
याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत.
26 Aug 2022 - 7:54 am | निनाद
याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत.
यावर कृपया विस्ताराने लेख लिहावा ही आग्रहाची विनंती आहे.
26 Aug 2022 - 7:55 am | गवि
+१
26 Aug 2022 - 9:21 am | प्रचेतस
विस्ताराने लेख लिहिण्यास सवड हवी, यथावकाश लिहिन, तूर्तास जमाखर्चाचा स्पष्ट उल्लेख असलेला एक मासला देतो.
कच्चिदायव्यये युक्ताः सर्वे गणकलेखकाः |
अनुतिष्ठन्ति पूर्वाह्णे नित्यमायव्ययं तव ||
हे राजा, आय आणि व्यय लिहिण्यासाठी नेमलेले तुझे गणक आणि लेखनिक प्रतिदिवशी दुपारच्या आधी तुझा जमा खर्च तुला सांगतात ना
26 Aug 2022 - 11:18 am | तुषार काळभोर
विषय कट!!
26 Aug 2022 - 7:33 am | मिसळपाव
" ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" - ऋणाची संकल्पना असणारा हा मूळच्या चार्वाकांच्या श्लोकाचा विपर्यास / विडंबन कुठल्या काळातलं आहे?
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
26 Aug 2022 - 7:55 am | गवि
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी?
हिशेब म्हणजे संख्येची नोंद तोंडी / लेखी ठेवणे असा म्हणावा तर तो करन्सी / पैसा आस्तित्वात येण्यापूर्वी गायी गुरे, पाळीव पशू, शस्त्रे यांचाही जगभर होत असणार हे समजण्यासाठी पुराव्याची देखील गरज वाटत नाही.
डेव्हिल इज इन द डीटेल्स.
अ. हवेत काहीतरी उडवले असणार हे स्पष्ट आहे. कारण विमान शब्दाचा उल्लेख आलाय.
ब. हवेपेक्षा जड (अधिक घनतेचे) मनुष्य वाहून नेईल असे वाहन एरोडायनामिक आकार (एरोफोईल) वापरुन आणि कण्ट्रोल करुन हवेत उडवले आणि हा सर्व तपशीलही त्या ग्रंथात आहे
यात जो तपशिलाचा फरक आहे तत्सम.
क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या.
मूळ ग्रंथ वास्तव कथा मांडतो की काल्पनिक हा मुद्दा महत्वाचा नाही, त्यात तपशील काय आहे हे मुख्य.. हा भाग अगदी मान्य.
26 Aug 2022 - 8:52 am | निनाद
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी?
तेव्हा तरी डोक्यात खातेवही, डेबिट VS क्रेडिट्स इतकेच होते. व्याज वगैरे विचार केला तर त्यात अनेक डिटेल्स लक्षात येत जातात हे मात्र खरे.
खातेवही ही खरी अकाऊंटिंग मध्ये क्रांतीची ठिणगी म्हणायला हवी.
हे सगळे अभ्यास न करता चर्चेत सूचत गेले तशी मांडणी झालेले आहे.
खरे तर ईटालिअयन अकाऊंट ला उलट प्रश्न यायला हवा होता की उणे संख्या कधी इटालियन्स ना नक्की कधी समजल्या.
पण तेव्हा ते सुचले नाही.
क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या.
जरूर करा. एक उत्तम संशोधनाचा पेपर तयार होऊ शकेल. आणि एक जागतिक गैर्समज दूर व्हायला मदत होईल.
26 Aug 2022 - 10:05 am | गवि
सूचना छान आहे पण चुकीच्या मनुष्याला उद्देशून.
हे सर्व तपशीलवार करण्यासाठी त्या विषयाबद्दल passion लागते. ती तुमच्यात आहे असे या लेखातून वाटले. काही प्रमाणात प्रचूमधेही आहे.
बाकी लेख वाचायला आणि शन्का उत्पन्न करायला, सूचना करायला या विषयातले केवळ थोडे कुतूहल पुरते. तितक्या बळावर अभ्यासपूर्ण मांडणी शक्य नाही.
26 Aug 2022 - 8:36 am | जेम्स वांड
मधले काहीच कळत नसल्याने आमचा permanent पास, फक्त नेहमीचे यशस्वी प्रतिसाद न येता सकाळी सकाळी अभ्यासू प्रतिसाद आल्याने आनंद झाला आहे. त्यामुळे पिटातील शीट पकडून नवीन काहीतरी शिकायला सीट धरून मी बसलोय धन्यवाद.
26 Aug 2022 - 8:50 am | कर्नलतपस्वी
आहो परिस्थिती अशी आहे की,
लाखाची बसविली घरी अन दमडीची चकरा मारी!
गावचा बळी, परगावचे गाढवं वळी !
फॅशन झालीय.
सुदंर विषय,लेखन आणी प्रतीसाद.
आणी म्हणूनच मिसळपावने बांधून ठेवलयं.
26 Aug 2022 - 9:11 am | तिता
Time reference ठरवणे अवघड आहे. गणपतीने महाभारत लिहिले ….. लिहिण्याची कला भारतात तेव्हापासून होती? क़ाही सन्दर्भ हे खूप नंतरचे आहेत.
26 Aug 2022 - 11:16 am | शाम भागवत
महाभारत काल हा २१००० वर्षांपूर्वीचा असं जग्गी वासुदेव म्हणतात बॉ.
म्हणे कार्बन डेटिंगच्या पेक्षा जास्त पुढारलेल्या पध्दतीने फ्रेंच का कोणत्यातरी संशोधन टीमने समुद्रात संशोधन करून जगापुढे (????) मांडले.
:))
26 Aug 2022 - 11:34 am | प्रचेतस
महाभारत काल हा इसवीसन पूर्व २०० ते ५०० च्या आसपासचा समजला पाहिजे. कारण सौतीने आदिपर्वातील अनुक्रमणिका अध्यायात सांगितलेल्या विविध पर्वातील श्लोकांची संख्या महाभारतच्या विविध प्रतींत बर्यापैकी समान आहे. हा काळ साधारण इसवीसनपूर्व २०० च्या आसपासचा मानता येतो. सौतीचा काळही तोच समजला पाहिजे, मूळच्या भारतात सर्वाधिक भर याच काळात घातली गेली. गुप्तकाळातही थोडी भर घातली गेली. श्रीकृष्णाला देवत्व दिले गेले ते मुख्यतः या काळात असे मानता यावे पण तुलनेने ही भर कमी आहे.
भारतीयुद्धाचा काळ हा इसवीसनपूर्व हा बर्याच विद्वानांनी मान्य केला आहे. ग्रहगोलांची, नक्षत्रांची स्थिती, इतर प्राचीन ग्रंथातील उल्लेख, श्लोकांची शैली यानुसार्हे थोड्याबहुत फरकाने निश्चित करता येते मात्र पुरातत्वीय पुराव्यांच्या अभावी हे प्रमाण किंचित लंगडे पडते इतकेच.
26 Aug 2022 - 11:43 am | शाम भागवत
जग्गी साहेबांची लिंक शोधू का? कार्बन डेटिंगपेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे म्हणे. द्वारकेजवळच्या समुद्रात प्लॅस्टिक कचरा संशोधन का काहीतरी करत असताना अचानक म्हणे द्वारका सापडली. मग ते नमुने युरोपात नेऊन संशोधन केले. वगैरे वगैरे.
जग्गी वासुदेव यांच्या मते रामायण तर त्याचेही आधी काही हजार वर्षांपूर्वीचे आहे. असे ते ७०००० वर्षे मागे जातात.
26 Aug 2022 - 11:57 am | प्रचेतस
अश्मयुगात जातेत की काय ते आता =))
26 Aug 2022 - 12:03 pm | शाम भागवत
:)
काही कळेना.
बरं. बरीच शास्त्रज्ञ मंडळी हजर असतात. चर्चा परदेशात चाललेल्या असतात.
कोणी ऑब्जेक्शनही घेत नाही म्हटल्यावर.....
होका? असेल असेल असं म्हणण्याशिवाय दुसरं काही करताही येत नाही.
तसंही जग्गी वासुदेव बरोबर असल्याचं सिध्द झालं तरी नुकसान काहीच नसल्याने ऐकत असतो. पण एकंदरीत छान बोलतात.
26 Aug 2022 - 3:52 pm | जेम्स वांड
श्रीकृष्ण वासुदेव ह्या स्वरूपातील चक्रधर मुद्रेतील कृष्णाची पहिली झलक कुशाणकालीन नाण्यांवर पाहायला मिळते हे खरे का ?
गरुड खांब अन् विष्णू मंदिरं यांच्याबद्दल पण ती गुप्तकाळात उदयाला किंवा नावारूपाला आली म्हणतात ते कितपत खरे ?
27 Aug 2022 - 6:19 am | प्रचेतस
चक्रधर कृष्णाची प्रतिमा, शिवाय पाशुपत शिव यांची प्रतिमा कुशाण नाण्यांवर आहे हे खरेच मात्र ती पहिली प्रतिमा किंवा कसे याबद्दल निश्चित सांगता येणार नाही इतकेच. मात्र भागवत धर्माचा उदय याच्याही आधी झाला होता ह्याला नाणेघाटातील ख्रिस्तपूर्व २०० चा नागनिकेचा शिलालेख साक्षी आहेच. शिलालेखाच्या सुरुवातीला धर्म, इंद्र, संकर्षण आणि वासुदेव यांना वंदन केले आहे.
गुप्तकाळात तर विष्णू मंदिरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे यात काहीच नवल नाही, गुप्त वैष्णवच होते.
26 Aug 2022 - 10:54 am | तनमयी
सहि पकडे है
26 Aug 2022 - 1:41 pm | श्रीगुरुजी
घाणक्याने कौटिल्य या नावाने लिहिलेल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात जमा खर्च ऋण हिशेब वगैरे उल्लेखलिल्या आहेत का?
26 Aug 2022 - 6:25 pm | मुक्त विहारि
पान क्रमांक 161 पासून सुरूवात करा ...
26 Aug 2022 - 1:48 pm | विजुभाऊ
त्या मानाने चाणक्य अगदीच नवीन आहे.
26 Aug 2022 - 6:28 pm | मुक्त विहारि
मुस्लिम आणि ख्रिच्श्रन आक्रमकांनी, वाचनालये जाळून टाकल्याने, बरेचसे लिखीत साहित्य नामशेष झाले ..
26 Aug 2022 - 6:52 pm | खिलजि
लेख आवडला गेला है
27 Aug 2022 - 10:31 am | प्रकाश घाटपांडे
चित्रगुप्त ठेवत होता की पापपुण्याचे अकाउंटिंग.
27 Aug 2022 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय...आद्य सीए.
-दिलीप बिरुटे
27 Aug 2022 - 12:15 pm | इरसाल
पण ते त्या काकांनी ऐकायला पाहिजे नां !!!!!!!
27 Aug 2022 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले
एवढा सगळा उपद्व्याप करुन समजा तुम्ही सिध्द केलेच असते की अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे तर लगेच ज्युनियर डाव्याने म्हणले असते की-
अकाऊंट्स हे मनुवादी ब्राह्मणी कारस्थान आहे, बामणाचे कसब आहे . बहुजनांच्या शोषणाकरिता सनातन्यांनी केलेली कपट क्लृप्ती आहे.
=))))
27 Aug 2022 - 12:48 pm | शाम भागवत
म्हणू दे हो.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून असं काहीबाही ऐकतंच आलोय. मुद्दा तो नाहीच आहे.
मुद्दा हा आहे की, हे असं म्हणण्यातला जोर गेल्या ७५ वर्षात कमी होताना दिसतोय की वाढताना दिसतोय?
त्याआधारावर पुढे बघायचा प्रयत्न करायचाय.
:)