मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का.
किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल.
आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही. असा माझा एकटेपणा संपला जेव्हा मला भेटला दुसरा मास्कवाला.
- निरंजन वेलणकर.
प्रतिक्रिया
13 Apr 2022 - 7:29 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, आता मास्कवाला भेटणे, हा कपिलाशष्ठी योग ...
14 Apr 2022 - 11:52 am | ज्ञानोबाचे पैजार
लोक लैच रील्याक्स झालेली आहेत
सरकारने ५०० रुपये दंड लावला तेव्हा राग आला होता, पण आता लोक जसे वागतात ते पाहिले की लक्षात येते सरकार बरोबरच होते.
पैजारबुवा,
14 Apr 2022 - 1:08 pm | सस्नेह
रस्त्यावर पचापचा थुंकणारे सभ्य (?) लोक्स पाहिले की मास्कची महती पटते.
19 Apr 2022 - 5:48 pm | चौथा कोनाडा
मास्क बाजूला करून पचापचा थुंकणारे सभ्य लोक्स पाहिले की त्यांच्या शिस्तीची महती पटते.