मिपाकर होता होता .....

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
13 Apr 2022 - 5:49 pm

सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.

MKHH01

एकदा सणासुदीच्याच्या शुभेच्छा ही देणे-घेणे झाले.
MKHH02

मी एकदा माझ्या मिपा वरील रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल (१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ? ) लेखाची लिंक त्यांना पाठवली. लेख त्यांना आवडला. माझे आवर्जून कौतुक केले. श्रीका अर्थात श्रीनिवास कारखानीस, यांच्याशी माझे संभाषण पुढील प्रकारे सुरू झाले.

श्रीका : झकास सुरुवात आहे, प्रतिक्रिया मस्तच ! पुढील भागान बद्दल उत्सुकता चाळवली गेलीय. लेखमाला सुंदर होणार हे नक्की. मिसळपाव साईट भारी दिसतेय.
मी (चौको) : मनापासून धन्यवाद श्रीका सर. पुढील भाग लवकरच पाठवत आहे.

दरम्यान श्रीका सरांनी मिपा चाळायला सुरुवात केली होती. त्यांना मिपाने इम्प्रेस केलेले दिसत होते. श्रीका सरांना लेखमालेचे पुढील भाग पाठवल्यावर ते वाचून प्रतिक्रिया दिली :
श्रीका : लेखमाला खुपच छान आहे, नवीन, उपयोगी माहिती मिळतेय. शिवाय प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत. पुढील लेखनास शुभेच्छा.
मी : खुप खुप धन्यवाद सर ! तुमच्या अभिप्रायाने भारावून गेलोय. मिपा वरचे इतर ही धागे आणि चर्चा वाचण्याजोग्या आहेत. सवडीने नक्की वाचा. पुन्हा एकदा आभार !

MKHH03

काही दिवसानी श्रीका सरांशी चॅटिंग झाले. ते मिपा वर खुष होते. त्यांनी मला विचारणा केली :
श्रीका : एक विचारू का? मलाही हा मिपा प्लॅटफॉर्म आवडलाय. वाचक वेचक आणि चांगले आहेत. मलाही माझे काही ब्लॉग्ज़ इथे सादर करता येतील का?
मी : का नाही ? नक्कीच. आपले हार्दिक स्वागत आहे या मिपावर ! अनेकजण ब्लॉगलेखन करून नंतर मिसळपाव देखील प्रकाशित करत असतात. आधी सभासदत्व घ्यावे लागेल. काही अवांतर माहिती हवी असल्यास माझ्याशी नक्की संपर्क साधा
श्रीका : याचे संस्थापक कोण आहेत? मी सदस्यत्व घेईनच.
मी : कै तात्या अभ्यंकर संस्थापक होते, सध्या नीलकांत म्हणून आहेत. संस्थळाचे संपादक मंडळ आहे. ते सर्व बघतात. युजर फ्रेंडली आहे मिसळपाव !

मी तात्यांच्या मिपा वरील लेखनाच्या एक दोन लिंक्स श्रीका सरांना पाठवल्या. ते लेख संगीतविषयक होते. ते लेख वाचून काही दिवसानी त्यांनी विचारणा केली :
श्रीका : अभ्यंकर म्हणजे ते ठाण्याचे का? कारण संगीताचे उत्तम शौक़ीन अभ्यंकर मला परिचित होते. पानाचा शौक़ होता. ऊंच आणि जाडसर होते.
मी : हो तेच. अगदी, ! तरंगी व्यक्तिमत्व होते !
श्रीका : श्रीकृष्ण दळवी यांच्या “स्वानंद” संगीतरसिक मंडळाचेही सदस्य होते.

श्रीका सर बहुधा संगीत क्षेत्रातील देखील जाणकार असावेत !

मी : ते मला फार तपशील माहीत नाहीत. तात्या खुप भारी लिहायचे. मी फॅन झालो होतो त्यांचा ! मित्र मंडळी, मैफिली जमवणारा आणि गाजवणारा म्हणून त्यांची ख्याती होती !
श्रीका : खरंय……… मला आनंद आहे तुम्हीही छान लिहिता. वाचकांच्या जाणिवा समृद्ध करता.
मी : " तुम्ही वाचकांच्या जाणिवा समृद्ध करता" बाप रे, हे फार होतंय. हे किरकोळ आहे, हौसेपोटी लिहिलेले.
श्रीका : प्रत्येक ओळ कुणा ना कुणाच्या हृदयाला स्पर्श करत असतेच. कुणाच्यावरून ओघळून जाते तर कुणाच्यात झिरपते. आपण फक्त लिहित राहूया.
मी : ओहो, क्या बात है | अगदी खर ! सर आपण कवि देखील आहात असं दिसतंय !

असं खुलं दिलखुष संभाषण झाल्यानं खूप छान वाटलं !

MKHH04

फावल्या वेळात श्रीका सरांचे प्रोफाईल चाळले, सर महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकला महाविद्यालयाचे पदवीधर होते. त्यांचा चित्रकलेचा जबरदस्त व्यासंग होता. जागतिक पातळी वरील मोठे चित्रकार, अमूर्त चित्रकला या विषयी बरेच लेखन केले होते. लेखनाची शैली देखील सुंदर होती. एका मोठ्या कंपनीत ग्राफिक्स विभागात महत्वाच्या हुद्द्यावर काम करत होते. त्याबरोबरच संगीतक्षेत्रात वाद्यवादनात निपुण होते, कित्येक मोठ्या गायकांच्या मैफलीत त्यांनी साथसंगत केली होती.

मधल्या काळात माझ्या आणखी काही लेखांच्या लिंक्स त्यांना वाचायला दिल्या. कौतुकपर अभिप्राय त्यांनी आवर्जून दिले.

काही दिवसानी त्यांनी मला पिंग केले:
श्रीका : नमस्कार चौको, मी मिसळपाव वर सदस्यात्वाची ऑर्डर दिली आहे, पण अजून टेबलवर पाणीपण नाही दिलं कुणी ? जरा मिपाच्या संबंधित लोकांना विचारता येईल का ?
मी : नक्कीच, श्रीका सर ! सदस्यनाम काय घेतले आहे आणि मेल आयडी नमूद करावे !
श्रीका : "श्रीनिवास.कार" असं नांव घेतलंय मी.
पुढे त्यांनी त्यांचा मेल आय डी दिला होता.
श्रीका : थँक यू, चौको. तेव्हढं विचारून सांगा.
मी : त्यांना अंतर्गत विरोप लिहित आहे. प्रतीक्षा करुयात ! गुड संध्याकाळ आणि बाय !

मी मिपा संपादकांना (साहित्य संपादक) व्यनि केला:

नमस्कार साहित्य संपादक !
माझे ग्राफिक्स डिझायनर मित्र " श्रीनिवास कारखानीस" यांनी मिपाकर होण्यासाठी मागच्या आठवड्यात नोंदणी केली आहे.
तपशिलः
सदस्यनाम : श्रीनिवास.कार
मेल आयडी: shrinivas.kar@gmail.com
त्यांना सदस्यत्व अजुन मंजुर झाले नाही. विनंती आहे की लवकरात लवकर सदस्यत्व मंजुर करावे व त्यांना मिपाकर होण्याचा आनंद द्यावा !
धन्यवाद !
- चौ.को.

MKHH05

काही दिवसांनी मिपा संपादकांचा व्यनि आला :
नमस्कार,
संपादक मंडळा कडून आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे.
आता श्रीनिवास कारखानीस यांना सदस्यत्व मिळाले का? त्यांना खाते वापरण्यासाठी काही अडचणी येत आहेत का?
अजून कोणती मदत हवी असेल तर जरुर कळवा.

- साहित्य संपादक, मिपा

मी पुन्हा श्रीका सरांशी संवाद साधला.
मी : श्रीका सर, आला का मिपा कडून काही रिप्लाय ?
श्रीका : हो, मिपावरून मला मेसेंजरवर रिप्लाय आलाय. त्यात ते म्हणतात की, नवीन पासवर्डसाठी मेल येईल, वाट बघतोय मेलची.

मिपा संपादकांनी मला व्यनिने पासवर्ड कसा बदलायचा याची पद्धत सांगितली, ती मी श्रीका सरांना फॉरवर्ड केली.
उजव्या बाजुला आवागमन या तक्त्या खाली नाव दिसते. त्याला टिचकी मारावी, एक नवे पान उघडेल, या पानावर आवागमनच्या थोडे खालच्या बाजुला डाव्या हाताशी संपादनाची सोय दिसेल. तिथे टिचकी मारली की संकेताक्षर बदलण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
काही अडचण आल्यास कळवा.
- साहित्य संपादक,

श्रीका : मिपावरून मला मेसेंजरवर रिप्लाय आला आहे. त्यात ते म्हणतात की, नवीन पासवर्डसाठी मेल येईल, पण त्या नवीन पासवर्डसाठी मला मेलच येत नाहीये. या संदर्भांत कोणाशी फोनवर बोलता येईल का? सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे.
मी : हे मिपावाल्याना मेसेंजर वर सांगितले तर कदाचित होऊन जाईल. मिपा संपादक किंवा मालकांचा फो. नंबर माझ्याकडे नाही. इ मेल मध्येच विचारावा लागेल. तुमचाही द्या कदाचित तो संपर्क करेल. आणखी एक मेल आयडी admin@misalpav.com या मेल आयडी वर संपर्क साधा . धन्यवाद, हॅपी विकांत !

मी मिपा संपादकांना नवीन पासवर्ड विषयीच्या अडचणीचा व्यनि केला आणि समस्या सोडवण्याची विनंती केली.
त्यांनी त्यांच्या बाजूने काही तरी केले असावे, आणि मला व्यनि केला.

मिपा सासं (मला व्यनि) : श्रीका सरांना यांना सदस्यत्व मिळाले ना ?
मी : त्यांना सदस्यत्व मिळाले आहे परंतु पासवर्ड बदलणयाची सोय उपलब्ध होत नाहीय नाही किंवा त्यांना तो मिळत नाहीये. ते आयटी कंपनीत असल्यामुळे अश्या अडचणी कशा सोडवायच्या या बाबत ते मदत करू शकतील, किंबहुना मदत करण्याची इच्छा आहे. असल्या टुकारफालतू कारणामुळे त्यांना मिपाकर होता येत नसल्याबद्दल वैतागले आहेत. संबधित व्यक्तींचा फोन क्र द्यायला काय मोठी अडचण आहे. सगळं सरकारी कामापेक्षा वैतागवाणं वाटायला लागलेलं आहे .

यावर मिपा संपादकांचे उत्तर :
नमस्कार,
श्रीका सरांचा वैताग अगदी स्वाभावीक आहे. एखादी गोष्ट जर आपल्या मना प्रमाणे होत नसेल तर वैताग येणारच.
पण त्यांना कृपया हे सांगा की मिपा हे काही व्यावसयिक संस्थळ नाही. काही सदस्य स्वतःची पदरमोड करुन हे संस्थळ चालवतात. तर अ‍ॅडमीन असलेले नीलकांत आणि प्रशांत हे आपले उद्योग धंदे सांभाळून ही धुरा सांभाळतात. त्यामुळे फोन नंबर शेअर करणे त्यांना प्रशस्त वाटत नसेल.
त्यांची अडचण आम्ही नक्कीच नीलकांत आणि प्रशांत पर्यंत पोचवु आणि त्यांना मदत करायची विनंती करु.
- साहित्य संपादक.

दरम्यान श्रीका सर आणि माझी फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि आम्हा दोघांच्या सोयीस्कर वेळात श्रीका सरांशी कला, साहित्य इ. फोनवर गप्पा झाल्या. मिपाचे सभासदत्व, पासवर्ड बदलण्याची गोची या संबधी बरीच चर्चा झाली. सर आयटीतल्या असल्या तांत्रिक बाबतीत एक्सपर्ट होते. (बरेच तपशील त्यांनी सांगितले, बरेचसे माझ्या डोळ्यावरून गेले)

मी मिपा संपादकांना व्यनि केला:
श्रीका सरांशी आताच फोनवर बोलणे झाले !
मिपाचं जस्टीफिकेशन करताना मलाही एक मिपाकर म्हणुन अवघडल्यासारखे झाले.
ते आयटीतच काम करत असल्यामुळे या बेसिक प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण होतायत या बद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि नाराजी देखील बोलून दाखवली !
या संदर्भात त्यांना मिपा संपादक / अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी बोलण्याची इच्छा आहे. ते आयटीवाले असल्यामुळे या समस्येत मदत करण्याची देखिल इच्छा आहे.
त्यांनी त्यांचा नंबर दिला आहे : क्षक्षक्षक्षक्ष ययययय
श्रीका सर हे चित्रकार, लेखक आणि संगीतकार आहेत. त्यांच्यासारखे कलाकार मिपाकर होणं हे माझ्या सारख्या मिपाकराला आनंदाचं आहे, आणि मिपाला देखिल भुषणावह आहे !

मिपा संपादकांचे मला उत्तर आले:
नमस्कार,
वरील दोन निरोप जसे च्या तसे अ‍ॅडमिनला पाठवले आहेत. त्यांच्या कडून नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री बाळगा.
- साहित्य संपादक.

काही दिवस वाट पाहिली, श्रीका सर मिपावर आलेले दिसले नाहीत, बहुधा संपादक म्हणतात त्यानुसार काहीच घडले नसावे.
मी अस्वस्थ होऊन श्रीका सरांना फोन केला आणि "मिपाकर झालात का ?" अशी विचारणा केली.

श्रीका सर उत्तरले : बरीच प्रतीक्षा केली ..... आता मिपाकर होण्याचा विचार मी कॅन्सल केला आहे, आता हा विषय माझ्यासाठी संपला !

वाईट वाटले. मनोभंग झाल्या सारखे वाटले !

श्रीका सरांसारखा अर्थात श्रीनिवास कारखानीस यांच्यासारखा लेखक, चित्रकार, संगीतकार कलावंत मिपाकर होता होता ..... मिपाकर होऊ शकला नाही याचे शल्य लागून राहिले !

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तळटीप : श्रीनिवास कारखानीस हे बदललेले नाव आहे आणि धाग्यातील रेखाटने आंजावरून साभार घेतली असून फक्त प्रातिनिधिक संदर्भासाठी वापरली आहेत” हे चाणाक्ष वाचकांनी ही ओळखले असेलच !

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Apr 2022 - 6:53 pm | कुमार१

संवादआवडला आणि खंतही समजली.

मुक्त विहारि's picture

13 Apr 2022 - 7:07 pm | मुक्त विहारि

खरं तर, असे व्हायला नको ...

डुआयडी पचास और ओरिजनल को त्रास, असे व्हायला नको ...

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2022 - 8:54 pm | चौथा कोनाडा

धन्न्यु कुमार१ सर !

खरंय मुविसाहेब, बिलंदर लोक ड्यूआयडी चलाखीने काढतात आणि सिन्सियर लोकांना अश्या अडचणी येतात !

माझ्या ओळखींच्या एकाचा आइडी लगेच मिळाला. प्रशांतला इ मेल केलेला.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2022 - 8:58 pm | चौथा कोनाडा

मिपा स्थापनेपासून पहिली ५ वर्षे मी मिपाचा नुसता वाचक होतो, मिपाकर २०१४ ला झालो. सभासद्त्व मिळायला काहीच अडचण आली नाही.
अशा काही अपवादात्मक बाबतीत मिपा वरिष्ठांची मदत घ्यावी लागते.

कर्नलतपस्वी's picture

13 Apr 2022 - 10:42 pm | कर्नलतपस्वी

अंतरजालावर मराठी धागे वाचताना मिपावरील काही धागे वाचले.आवडले. सदस्यत्व घेण्यासाठी काहीच अडचण आली नाही.

चौथा कोनाडा's picture

15 Apr 2022 - 8:44 pm | चौथा कोनाडा

सुरुवातील मिपाचा मिपाचा फक्त वाचक होतो, जसे जसे मिपा आवडत गेले तसतसे मिपाकर व्ह्यायची इच्छा बळावायला लागली, मग ५ वर्षांनी सभासद होताना, तुमच्याच सारखी काहीही अडचण आली नाही.

काही वर्षांपुर्वी, एका मित्राला, मिपा सदस्यत्व हवे होते...

तेंव्हा, बिरूटे सरांनी चांगली मदत केली...

मिपावर, वैचारिक मतभेद कितीही असले तरी, वैयक्तिक पातळीवर, मिपाकर एकमेकांना मदत करतातच...

कर्नलतपस्वी's picture

14 Apr 2022 - 10:41 am | कर्नलतपस्वी

तात्या बहुतेक विसोबा खेचर या नवाने लिहित आसवेत. जुने धगे वाचताना त्यान्चे य्वक्तिमत्व कळून येते.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2022 - 9:15 pm | चौथा कोनाडा

विसोबा खेचर. बरोबर. मिपाकर क्रमांक ६.
इथे त्यांचे सर्व लेखन वाचता येईल.
https://www.misalpav.com/user/6/authored

सस्नेह's picture

14 Apr 2022 - 1:06 pm | सस्नेह

सा.सं. चे काम नाही, नवीन सदस्य घेणे. प्रशांत ला का व्यनि केला नाहीत ?

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2022 - 5:23 pm | चौथा कोनाडा

प्रशांत ला का व्यनि केला नाहीत ?

सुचले नाही. आणि सा सं ने "तुमचे निरोप जसे च्या तसे अ‍ॅडमिनला पाठवले आहेत" असे सांगितल्यामुळे होऊन काम जाईल असे वाटले.

नगरी's picture

17 Apr 2022 - 11:28 am | नगरी

मी ही याच सर्व अनुभवातून गेलो.
खरेतर मला मिपा बद्दल तात्या गेल्यावर कळाले.
मटा च्या संपादकीय मधे त्या बद्दल लिहून आले होते, म्हणून उत्सुकते पोटी मिपा वर आलो आणि तात्यांचे सर्व लेख अधाशा सारखे वाचून काढले. काही ठिकाणी हहपूवा तर काही ठिकाणी डोळ्यात पाणी. खरेच विलक्षण व्यक्तिमस्तव.
एक सल कायम, तात्या उशिरा माहीत पडला.

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2022 - 12:36 pm | चौथा कोनाडा

खरंय, नगरी !
👍
कै. तात्यांनी लावलेल्या रोपट्याचा मोठा वृक्ष झालाय, आणी आपल्यासारखे लेखकवाचक रसिक या वृक्षाच्या शाखांवर दंगामस्ती करत हुंदडत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

आजच्या मटा संवाद पुरवणीत "संमेलनी अवघे जुने जुने" या लेखात मिपाचा खास उल्लेख आहे :
"केवळ पुस्तक म्हणजेच साहित्य, या पठडीतून न बघता ब्लॉग, वेब पेज आणि विभिन्न विषयांची रंजक माहिती देणारी संस्थळे यांकडेदेखील साहित्याचे नवे प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. आज 'मिसळपाव' किंवा 'मायबोली' यांसारख्या संस्थळांवर तरुणांकडून मोठ्या प्रमाणात लिहिले-वाचले जाते.

https://maharashtratimes.com/editorial/samwad/artical-on-95th-akhil-bhar...

मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे !

कुमार१'s picture

17 Apr 2022 - 1:15 pm | कुमार१

छान संदर्भ दिलात
लेख यथोचित आहे !

नगरी's picture

18 Apr 2022 - 1:48 pm | नगरी

नक्की पाहतो

टर्मीनेटर's picture

18 Apr 2022 - 2:49 pm | टर्मीनेटर

लिंक साठी आभार 🙏
विचारप्रवर्तक लेख आहे!

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2022 - 5:20 pm | चौथा कोनाडा

धन्यू, कुमार१, नगरी आणि टर्मीनेटर !

लेख खरंच छान आहे. मिपा सारखी संस्थळे, वाचनाचे बदलते प्रवाह, आधुनिक माध्यमे, आधुनिक प्लॅटफॉर्म कडे साहित्य संमेलनाने दुर्लक्ष केलेय याबद्दल चांगल्याच कानपिचक्या दिल्यात !

मदनबाण's picture

25 Apr 2022 - 7:14 pm | मदनबाण

मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे !
अगदी हेच म्हणतो... स्वतःच्या मातृभाषेत लिखाण करुन मुक्तपणे व्यक्त होता येणं याचा सारखा दुसरा आनंद नाही. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

कर्नलतपस्वी's picture

26 Apr 2022 - 2:40 pm | कर्नलतपस्वी

१००टक्के सहमत

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Apr 2022 - 7:32 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको
उचित प्रतिसाद
योग्य भावना
आणि हो - लिंक दिली ते महत्त्वाचं
आभार

मनोगत - प्रतिसाद,लेख मॉडरेशन झाल्यावरच फळ्यावर दिसतात. कामाचे नाही.
इंग्रजीत नाहीच. Reddit आणि quora विशेष कारणांसाठी आहेत पण तिकडेही ट्रोलिंग/अवांतर आहे.
फेसबुक पेज/ग्रूप कामाचे नाही. संपर्कासाठी उत्तम आहै.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2022 - 5:22 pm | चौथा कोनाडा

खरंच.अशी संस्थळे होणे नाही.

आगदी माझी आणि सर्व मिपाकरांची भावना व्यक्त केलीत कंजूसजी !
मिपा हाटेलात आले नाही तर चुकचुकल्यासारखे वाटते.

नगरी's picture

18 Apr 2022 - 2:29 pm | नगरी

पण चौको पहिल्या सारखी मजा येत नाही

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2022 - 1:03 pm | चौथा कोनाडा

काही अंशी खरं आहे नगरी.

पण मी म्हणेनः

कालमानानुसार गोष्टी बदलत राहणार,
पहिल्यासारखी मजा येत नाही असं वाटत राहणार
बदललेल्या परिस्थितीतही मौज घ्यायला शिकायचं
तरच आपण या नविन जगात टिकून राहणार !

कर्नलतपस्वी's picture

26 Apr 2022 - 2:44 pm | कर्नलतपस्वी

तात्या,आशोक गोडबोले,केशवसुमार सारख्या दिग्गजांकडून खुप सुंदर लिखाण वाचल्यावर काही अंशी आसे वाटते.

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 2:26 pm | बिपीन सुरेश सांगळे

मिपा संचालक , मालक , संपादक
हे अवघड कार्य पार पाडतात . तेच खूप मोठे आहे . अन आता मिपाची दखल अनेक ठिकाणी उत्तम परीने घेतली जात आहे .
यासाठी कौतुक न आभार च !
तरीही हाही महत्त्वाचा विषय