- वसंतोत्सव
- ग्रीष्मोत्सव
- वर्षा
- शरदोत्सव
- हेमंत
- शिशिर ऋतू
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.
पितात सारे गोड हिवाळा
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्यार नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्याा शांततेचा निशिगंध
या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा
कवी - बा. सी. मर्ढेकर
सौजन्य-https://kavitabhavlelya.blogspot.com/2008/05/blog-post_22.html
हिवाळ्याच इतक सुंदर काव्य !आता मुंबईतच काय कुठे इतका गोड हिवाळा दिसतो का?
वातावरण शुष्क ,पानगळीचा मोसम पुन्हा सुरु होतो.पाण्याची कमतरता झाडांना जाणवते आणि बाष्पीभवन थांबवण्यासाठी पान गळतात.ज्या झाडांची मुळे खोल गेली आहेत त्यांची पानगळ होत नाही .ज्याची पानगळ झाली आहेत त्यांवर भडक फुलांचा साज चढतो आणि परागीभवन सोपं होत.
जास्वंद
शासनाने घाटाघाटात लावलेले ग्लीरीसिडीया म्हणजे उंदीरमारी/गिरिपुष्पचे मोहक फुले संक्राती नंतरच्या भटकंतीत दिसून येतात.
होलीहोक
शमीचा बहार /फुले मी पाहिल्यांच या काळात पाहिले.
सूर्याची किरणे मोहक असून या काळात गोड पदार्थ विशेषतः गुळ ,तीळ याचे सेवन आवडते.
महाकवि श्रीहर्ष संस्कृत महाकाव्य ‘नैषधीयचरित काव्यात शिशिरला दान देणारा श्रेष्ठ ऋतू मानला आहे
स्वत:चे सुंदर रूप शिशिरात दान करून कमळांनी पुण्याच कमावले आहे .त्यामुळे ते दमयंतीचे नेत्र आणि त्यांच्या कळ्या चकोराचे नेत्र झाले आहेत.
ऋतुसंहारात कालिदासाने थंडीचा हा ऋतू स्त्रियांसाठी ,प्रेमींसाठी लाभदायक याची पाचव्या सर्गात वर्णने केली आहेत.त्याचा सुरस आस्वाद यात घेता येईल.
ऋग्वेदात पाच ऋतू मानले गेले आहेत ज्यात शिशिर ऋतूचा समावेश हेमंत ऋतूशी एकत्रित केला आहे.
या पुरातन काळापासूनच इक्षु म्हणजेच ऊस याला शिशिरातील धरणीचे आच्छादन म्हंटले आहे.आजही संक्रातीनंतर ऊसाचे रस यथेच्छ प्यायला जातो
सणांचा विचार करता ,महाशिवरात्री,माघी चतुर्थी आणि होळी,रंगपंचमी हे येतात.नवरंगात सगळा आसमंत प्रत्येक राधा –कृष्ण रंगून जातात !उत्तर भारतात याचा विशेष आनंद असतो.
पिचवाई चित्र
असा हा शिशिर उत्तरायण पाहत सरून फाल्गुन सुरुवातीलाच वसंत आगमनाने नाहीसा होत जातो.
समारोप:
ऋतूविषयी लिखाण करताना सण आणि निसर्ग याचा मेळ पहावा इतकी सोपी मनीषा होती.पण हळू हळू ऋतुविषयी रामायण ,महाभारत,ऋतुसंहार आणि इतर संस्कृत काव्य ,श्लोक वाचून आनंद वाटला.दुर्गा भागवत यांच ऋतुचक्र वाचून खूप दिवस झाले पण विश्वास वसेकर यांच ऋतूबरवा हे लिखाण समजल. निसर्गाच्या प्रेमात ,ऋणात मी पहिल्यापासूनच आहे ,अजून सजगता जागृत झाल्यामुळे नवनवीन झाडांची,फुलांची माहिती मिळाली.भारतीय संगीतही ऋतूला अनुरूप सजलेलं आहे.
मिपाचे सर्व प्रतिसादकर्ते यांच्यामुळे भारी वाटलं !माझ्या ऋतू आस्वादाच्या अगदीच काठावरचा प्रवास वाचल्याबद्दल धन्यवाद!
-भक्ती
प्रतिक्रिया
2 Apr 2022 - 9:33 am | कुमार१
सुंदर ऋतू आस्वाद !
मजा आली.
2 Apr 2022 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त. छायाचित्रे आवडली. मर्ढेकरांची कविताही आवडली. बाकी, ते उंदरीचं झाड मला आवडतं. अजिंठा परिसरात आता सर्व जंगलात हेच झाड दिसायला लागलं आहे, त्याची फुलं आवडतात. पण, या झाडावर चिमण्या बसत नाहीत. प्राणी पक्षी जवळ येत नाहीत म्हणतात, फुलांना घरात ठेवलं की उंदरांना नशा येते, उंदरं पागल होतात अशा सांगोवांगी गोष्टी ऐकत असतो. मजा आहे.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2022 - 9:37 pm | तुषार काळभोर
सु-फुल संपन्न :)
समारोपाचा लेख सर्वोत्तम झाला आहे. यातील बरीच झाडे, फुले कधी कधी माळरानावर, डोंगरावर दिसतात. पण त्यांची नावेच माहिती नसतात.
(आताही लक्षात राहतील, असे नाही.)
पण, असे निसर्ग लेखन सुरू राहूद्या..
2 Apr 2022 - 9:52 pm | कर्नलतपस्वी
सहा ऋतूंचे सहा सोहळे
प्रत्येकाचे रंग निराळे
कधी सृजनाचे कधी साफल्याचे
कधी विजनाचे कधी वैफल्याचे
सारे धागे आवडले, खुप छान लिहिलय
3 Apr 2022 - 1:51 pm | Bhakti
सर्वांचे आभार!
कुमारजी खरच तुमचा प्रतिसाद हमखास -खास असायचा :)
बिरूटे सर ,मलापण उंदीर मारीची फुलं आवडतात.उंदीरांसाठीचा उपाय म्हणून याचा वापर ह़ोतो पण त्यामुळे उंदरांमागे सापांचे ही प्रमाण वाढते खखोदेजा.
तुषार ,आख्यान सुफुल :)या वर्षी लेखणीला आराम देण्याचा संकल्प आहे ;)
कर्नलजी छान ओळी!!
3 Apr 2022 - 1:51 pm | Bhakti
सर्वांचे आभार!
कुमारजी खरच तुमचा प्रतिसाद हमखास -खास असायचा :)
बिरूटे सर ,मलापण उंदीर मारीची फुलं आवडतात.उंदीरांसाठीचा उपाय म्हणून याचा वापर ह़ोतो पण त्यामुळे उंदरांमागे सापांचे ही प्रमाण वाढते खखोदेजा.
तुषार ,आख्यान सुफुल :)या वर्षी लेखणीला आराम देण्याचा संकल्प आहे ;)
कर्नलजी छान ओळी!!
13 Apr 2022 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
हा ही लेख आणि प्रचि आवडली
पैजारबुवा,