सरल्या साऱ्या चिंता खंती
उरल्या नुसत्या खाली भिंती
नाही कुणाचे उगा लोढणे
दुसर्या साठी उगा कुढणे
संपून गेले वसंत वैभव
भोगत आहे शिशीराचे यौवन
फणसा सारखे पिकले गरे
आपण बरे,आपले काम बरे
पांघरून भूत भूतकाळाचे
वेध लागले भविष्याचे
खेद ना खंत या भूताचा
विचार आता फक्त स्वताचा
आनंदयात्री या जगातील
वाट चालतो अनंताची
ठेऊन दृष्टी अदृष्यातील
वाट पाहतो गंतव्याची
प्रतिक्रिया
22 Mar 2022 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली,
हे विशेष आवडले
पैजारबुवा,
22 Mar 2022 - 12:51 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद माऊली.
22 Mar 2022 - 12:50 pm | कर्नलतपस्वी
संपून गेले वसंत वैभव
भोगत आहे शिशीराचे यौवन
भिववीत नाही 'जरा', ही
ही तर नांदी नवपल्लवा ची
22 Mar 2022 - 10:47 pm | बाजीगर
कविता आवडली.
पण , 'लागले नेत्र पैलतिरी' अशा अर्थाने जर 'वाट पहातो गंतव्याची" असेल तर ते नाही आवडले.
24 Mar 2022 - 11:51 am | Deepak Pawar
आवडली.