मैत्री

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
11 Jan 2022 - 10:17 pm

वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू.

मैत्री होती ढगाची
उंच उंच डोंगराशी
आंगचटीला आला
खोड्या करू लागला

म्हणून ......
टोचून टोचून डोंगर बोलला
भांडण झाल जोरात
म्हणून रडू आल ढगाला
धार लागली डोळ्याला

कट्टी घेऊन डोंगराशी
वसुधेच्या कुशीत घुसला
आसवांनी पुसलेले अश्रू बघून
मनाशीच हसला

मीत्राशीवाय करमेना
आई जवळ मन रमेना
लवकरच येतो म्हणून
डोंगराला भेटायला गेला

भेट झाली मीत्रांची
दोघा पण खुश झाले
अधंळी कोशीबिरीचा खेळ
पुन्हा खेळू लागले

आंधार पडला धरणीवर
गार वारा सुटला
पुन्हा भांडण होईल म्हणून
बळी वाट बघत बसला

१६-१२-२०

Nisargकवितामुक्तक

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

12 Jan 2022 - 12:18 am | सौन्दर्य

देव करो अन अशीच भांडणे सदा होत.

श्रीगणेशा's picture

12 Jan 2022 - 12:32 am | श्रीगणेशा

मैत्री छान जमली आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2022 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा

अतीशय सुंदर! :)

मुक्त विहारि's picture

15 Jan 2022 - 11:59 am | मुक्त विहारि

छान आहे

कुमार१'s picture

27 May 2023 - 8:49 pm | कुमार१

मैत्री छान !