मालाडचा म्हातारा...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 9:40 pm

म्हातार्‍याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा

म्हातार्‍याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती

म्हातार्‍याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग

म्हातार्‍याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

19 Dec 2021 - 10:36 pm | तुषार काळभोर

माझं अज्ञान आहे, पण कवितेत (आणि विशेषतः शीर्षकात) काही गर्भित अर्थ आहे का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2021 - 7:52 am | ज्ञानोबाचे पैजार

कोणाला तरी एकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या सारखी वाटते.
किंवा मग कवीला वेगळे काही सांगायचे आहे, जे आपल्याला समजले नसावे.
नाहीतर म्हातारपणाचे असे बटबटीत चित्र उभे रहाणार नाही.
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2021 - 7:33 am | कर्नलतपस्वी

एवढं वाईट शब्दचित्र. ना मंजूर.....

चलते चलते सुबह से शाम हो गयी।
जीदंगी यूँ ही तमाम हो गयी।
"बुढा हो गया है, अब तो सम्हल जा। "
बिना मांगे नसिहत मील गयी ।

मै भी मस्त मलंग ठैरा ।
कह देता हूँ नही मै कोई
ऐरा गैरा नथ्यू खैरा
जीता हूँ अपने तरीके से आखीर
आने वाला हर दिन, बोनस जो ठैरा।

बडी मुद्दत्त से पता ढुंढ रहा था ।
जो हर मोड पर धोका देती थी
बडी शिद्दत से मुलाकात हुयी है।
अब जीदंगी जीने की मेरी बारी आयी है।

ना फाईल है ना लाईन है।
अब जीदंगी शाईन ही शाईन है।
भर भर के जी रहा हूँ।
कुदरत के जाम पी रहा हूँ।

ना जाने का डर ना खोने का गम
बांटो खुशीयौं बटोरो गम
यही है जिंदगी जीयो ठाठसे
मत सोचो चले जानेसे
किस कीस की आँखे होगी नम।

हिन्दी प्रतीसादा बद्दल माफी.

अनन्त्_यात्री's picture

20 Dec 2021 - 12:05 pm | अनन्त्_यात्री

शाळा कॉलेजांच्या पिकनिक मध्ये "मालाडचा म्हातारा शेकोटीला आला" असं गाणं म्हटलं जायचं. त्यात सर्वप्रथम "मालाडचा म्हातारा" यायचा. गाण्याच्या पुढच्या प्रत्येक ओळीत त्याचा एक एक नातेवाईक अॅडवला जायचा. हे गाणं ओपन एंडेड असायचं.

या कवितेत वार्धक्याची काही ठळक (बटबटीत?) रूपं वर्णिली आहेत जी समाजात प्रत्यक्ष दिसतात.

प्रतिसाद देणार्‍या वाचकांच्या मतांचा आदर राखून सांगू इच्छितो की त्यांना अभिप्रेत असलेली वार्धक्याची "आदर्श" रूपे ही "आदर्श" असू शकतात पण त्यांचं सरसकटीकरण करणं मला योग्य वाटत नाही.

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2021 - 1:29 pm | कर्नलतपस्वी

आमच्या कडे कोल्हापूर चा यायचा.
" पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा " शोभा गुर्टू

कविता उत्कृष्ट आहे. लयही आहे आणि शब्दही. एखादा विषय घेतला की कवितेत सर्व काही संतुलित असलेच पाहिजे असे नसते. आणि सहसा कोणत्याही कवितेबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसावी असे मत आहे.

इरसाल's picture

20 Dec 2021 - 1:23 pm | इरसाल

म्हंजे म्हातारा ठरकी हाये तर !

प्रसाद गोडबोले's picture

20 Dec 2021 - 3:15 pm | प्रसाद गोडबोले

कविता तशी काठावर पास झालेली असली तरी एकुण प्रगती उत्तम आहे !

कवितेत अलौकिकची कवा नाही , अदृष्टाचा उंबरा नाही , कातीव रेषा नाहीत , वितान अवकाश नाही , पिठुर चंद्रधग नाही , स्फटिक तळं नाही , झगमगणारे लोलक नाही ,
बरीच सुधारणाआहे दवणे ! अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा !

#साहित्याशी एकनिष्ठ रहा !

अनन्त्_यात्री's picture

20 Dec 2021 - 4:08 pm | अनन्त्_यात्री

न मागता प्रगतीपुस्तक भरून दिलंत. भरून पाव्लो. तेवढं साहित्य मंजे काय सांगा नं भौ मंजे एकनिष्ठ वगैरे र्‍हाता यीईल.

प्रसाद गोडबोले's picture

20 Dec 2021 - 10:15 pm | प्रसाद गोडबोले

प्रगतीपुस्तक भरून दिलंत

देणार ना राव नक्कीच देणार ! तुम्ही काय आपले शत्रु नाही. तुमच्या काही सुधारणा होत आहे हे पाहुन तुम्हाला भरुन पावत असेल तर नक्कीच आम्ही मदत करत राहु.

साहित्य मंजे काय

साहित्य वगैरे सोडा , तुम्ही आधी मराठी व्याकरणाचा अभ्यास करा, किती त्या चुका ? श्शी.
म्हाग्रू >> महागुरु
पाव्लो >> पावलो
मंजे >> म्हणजे
भौ >> भाऊ
र्‍हाता >> राहता
यीईल >> येईल .

आधी व्याकरण सुधारा , मग भाषा आपोआप सुधारेल , साहित्य म्हणजे काय हे समजणे हा खुप लांबचा पल्ला आहे.

आमच्या शुभेच्छा आहेतच ! काहीही सांगा , आम्ही नक्की मदत करु !

अनन्त्_यात्री's picture

20 Dec 2021 - 10:42 pm | अनन्त्_यात्री

"खूप","शत्रू", "पाहून" असे लिहिणे योग्य की आपण लिहिता तसे "खुप", "शत्रु", "पाहुन" असे लिहिणे योग्य?

प्रसाद गोडबोले's picture

20 Dec 2021 - 10:59 pm | प्रसाद गोडबोले

"खूप", "शत्रु", "पाहुन"
हे योग्य आहे !

अनन्त्_यात्री's picture

21 Dec 2021 - 7:26 am | अनन्त्_यात्री

आपण स्वत: लिहिताना "खुप" असे लिहिले आहे. मात्र "खूप" असे लिहिणे योग्य आहे असे आपणच म्हणता. आपल्या हातून चूक? अशक्य.

"शत्रु" , "पाहुन" हे लिहिणे योग्य आहे असे आपण ठरवून दिलेले आहेच.

रच्याकने, "लोकां सांगे ब्रह्मज्ञान..." हे अचानक आठवले.

प्रसाद गोडबोले's picture

21 Dec 2021 - 9:46 am | प्रसाद गोडबोले

लोकां सांगे ब्रह्मज्ञान.

तुम्हाला व्याकरणावर लेखन करणार आहात की कविता पाडणार आहात ?

कसं असतं बघा की कोंबडीने अंडी द्यावीत , लोकांनी त्याची भुर्जी करावी हा जगाचा नियम आहे. आता काही कोंबड्यांची अंडी छोटी असतात काहींची मोठ्ठी, काही अंडी खल्ल्यावर उष्णतेचा त्रास होतो काही खाल्ल्यावर होत नाही , काही अंडी ६० रुपये डझन ने विकली जातात काही १२० , १५० रुपये डझनने !
मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही चांगली अंडी घाला , मस्त मोठ्ठी , नॅचरली फार्म रेझ्ड, नो अ‍ॅनटीबायोटिक वगैरे म्हणजे तुमच्या अंड्यांना भारी भाव मिळेल , तर तुम्ही मलाच म्हणताय की भुर्जी मध्ये कांदा, टॉमॅटो जास्त पडलाय ? मी बघतो ना भुर्जीचे , तुम्ही कशाला काळजी करता , तुम्ही तुमची अंडी कशी बेस्ट बनवता येतील ह्यावर फोकस करा .

#वैदिक_ब्रह्मज्ञान्_अंडे

अगम्य व्यवहारात कधीही कधीही न वापरले जाणारे शब्द वापरुन, अजिबात व्याकरणशुचिता न पाळता, वृत्त छंद मात्रांचे काहीच नियम न पाळता, कधी कधी तर अगदी यमकालाही फाट्यावर मारुन , काहीच गेयता वगैरे नसलेल्या काव्य रुपी अंड्यांची भुर्जी करायला मजा येत नाही हो . म्हणुन आपले आम्ही तुम्हाला सुधारणा सुचवली.

असो.

पुढील अंड्यांसाठी शुभेच्छा!

अनन्त्_यात्री's picture

21 Dec 2021 - 10:24 am | अनन्त्_यात्री

शुभेच्छा.

प्रसाद गोडबोले's picture

21 Dec 2021 - 10:57 am | प्रसाद गोडबोले

तुम्ही हे अश्शी टम्म टम्म चांगली अंडी घाला ! अशी व्याकरणबेशुध्द, यमकहराम , अगेय , अ'सूर' काव्यरूपी अंडी भुर्जी आमलेट करायला मजा येत नाही राव .

तुमच्या कडून चांगल्या अंड्यांचा पुरवठा झाल्यास आपण जोरदार चालवु भुर्जीचा बिझनेस !

धन्यवाद !

अनन्त्_यात्री's picture

21 Dec 2021 - 12:14 pm | अनन्त्_यात्री

भुर्जीचा तर एकाच कोंबडीवर अवलंबून कसं काय राहता राव?

चांदणे संदीप's picture

21 Dec 2021 - 12:24 pm | चांदणे संदीप

तुम्हाला आवडेल ते लिहित रहा. द्याट इज व्हाट म्याटर्स द मोस्ट, एव्हरीथींग एल्स इज ए बैलाचं शेण!

सं - दी - प

अनन्त्_यात्री's picture

21 Dec 2021 - 12:37 pm | अनन्त्_यात्री

आपला सल्ला शिरोधार्य!

उथळ पाण्याचा खळखळाट जरा मजेमजेत ऐकत होतो.

आता फुल्लष्टाॅप!

प्रसाद गोडबोले's picture

21 Dec 2021 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले

उथळ पाण्याचा खळखळाट

अहो ते उथळ पाण्याचा खळखळाट नाही , अंडे फेटताना चा होणारा आवाज आहे =)))) अंडे जितके व्यवस्थित फेटले जाते तितके आम्ल्टेट मऊ आणि मस्त होते .
तुम्ही चांगली अंडी घातलीत की आम्हालाही मजा येईल भुर्जी करताना =))))

प्रसाद गोडबोले's picture

21 Dec 2021 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

नाहीच की . एका कोंबडीवर भुर्जी चा बिजनेस अवलंबुन नाही. जी कोंबडी चांगली अंडी घालेल तिच्या अंड्यांचे आम्ही भुर्जी आमलेट वगैरे करु.

=))))

ह्म्म..
तुम्ही मालाडला असता?