किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे
मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो
किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे
मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो
किचनमधून ती सांगते, वरण करते आहे
मी धावत जाऊन, फोडणी करून देतो
किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे
मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो
किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे
मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो
-- घरून काम करताना.
प्रतिक्रिया
20 Dec 2021 - 6:19 am | अत्रुप्त आत्मा
भटार खान्यातून ते सांगतात मी कढई टाकत आहे, धावत जाऊन मी जिलब्या टाकून येतो !
20 Dec 2021 - 7:24 am | तुषार काळभोर
किचनमधून ती सांगते, गॅस संपला आहे
मी मोबाईल हातात घेऊन, स्विगी ओपन करतो.
20 Dec 2021 - 8:03 am | ज्ञानोबाचे पैजार
बेडरुम मधून ती सांगते, झोप झाली आहे,
मी धावत जाऊन, बेड टी घेउन येतो,
सोफ्या वरुन ती सांगते, कचरे वाली आली आहे,
मी धावत जाऊन, दाराबाहेर डस्टबीन ठेवून येतो
बाथरुम मधुन ती सांगते, अंघोळ झाली आहे,
मी धावत जाऊन, टॉवेल देवून येतो
परत सोफ्यावरुन ती सांगते, भुक लागली आहे,
मी धावत जाऊन, ब्रेकफास्ट घेवून येतो
मग परत सोफ्यावरुन ती सांगते, "आई" ची वेळ झाली आहे,
मी धावत जाऊन, रिमोट देवून येतो,
ती दरवाज्यातून सांगते, भिशीला जायचे आहे,
मी धावत जाऊन, कार सुरु करतो
पैजारबुवा,
20 Dec 2021 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान ! चालू द्या...! ;)
-दिलीप बिरुटे
20 Dec 2021 - 1:06 pm | तुषार काळभोर
इन्वेंटरी मीटिंग मध्ये स्टॉक मॅच का होत नाही यावर खडाजंगी चालू असताना माझ्या तोंडून फिस्स- खिक्क याचा मिश्र आवाज बाहेर पडला आणि लोक माझ्याकडे डोळे वटारून बघायला लागले!
20 Dec 2021 - 8:14 am | ज्ञानोबाचे पैजार
मी बाथरुम मधुन सांगतो, टॉवेल राहिला आहे
ती सोफ्यावरुन सांगते, मग तु तसाच बाहेर ये,
मी डायनिंग टेबल वरुन सांगतो, खायला हवे आहे,
ती सोफ्यासरुन सांगते, झोमॅटो वरुन ऑर्डर दे,
मी फोन करुन सांगतो, आज ऑफिस मधे जास्त काम आहे,
ती सोफ्यावरुन सांगते, किल्ली ने दार उघडुन आत ये,
मी सोफ्याच्या मागुन सांगतो, आज वनडे फायनल आहे,
ती सोफ्यावरुन सांगते, मोबाईल वर बघता येते,
पैजारबुवा,
20 Dec 2021 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे
मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो.
मीही. काही वास. मिक्सरचा आवाज. काही तळलेले असेल.
असं अनपेक्षित, अपेक्षित सर्व असतं. मनाची तयारी असतेच.
कधी कधी, थांबा घेऊन येतेय. असेही थेट स्पष्ट असते.
-दिलीप बिरुटे
20 Dec 2021 - 9:51 am | श्रीगणेशा
धन्यवाद सर्वांचे.
कैच्याकैकवितेची दखल घेतल्या बद्दल!
पैजारबुवांनी तर केवळ प्रतिसाद म्हणून दोन नवीन कविता लिहिल्या आहेत _/\_ दोन्हीही कविता खूप आवडल्या आणि घरोघरी मातीच्या चुली हे पाहून थोडा धीर आला :-)
20 Dec 2021 - 12:58 pm | श्रीगणेशा
मान्य आहे _/\_
लिहिताना "शब्दांच्या जिलब्या" हा विचार मनात होताच पण मोह आवरला नाही प्रकाशित करण्याचा, म्हणूनच कैच्याकैकविता हा टॅग वापरला. जिलब्या टॅग हवा होता.
असो. त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या कितीतरी सरस कविता वाचायला मिळाल्या _/\_
20 Dec 2021 - 1:24 pm | सुरसंगम
मी सांगतो मला कविता सुचतेय..
ती सांगते काय पाडायच्या त्या जिलब्या मीपावर पाड
इथंच लोक हायत रेम्या डोक्याचे.
कवतीक करतील
20 Dec 2021 - 1:40 pm | कर्नलतपस्वी
सगळीकड तोच जांगडगुत्ता.
पळापळी करतोय म्हणून शांती हाय
नायतर शांती काय करल सागंता यायचं नाय.
लगे रहो मुन्नाभाई
आपल्या घरी पण का येगळ नाई
तु जिलब्या कयाला बे पाडतो
ती कढाई ठेवते म्हणून.
20 Dec 2021 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
मिपावरुनी ते सांगतात, "दवणें"ची कविता आली आहे
मी लॉगिन करुन लगेच विडंबन पाडून येतो
=))))
9 Feb 2022 - 10:02 pm | जव्हेरगंज
मस्त आहे की!!!