पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह.......
सकाळचे पावणे आठ वाजतायत, सहा वाजल्यापासून वाट बघतोय, आता कुठे थोड थोड दिसू लागलय. मिलटरीतली सगळे कापडे ,ब्लँकेट कामाला येत आहेत. घरी सामसूम आहे, बाहेर गाड्यांचे हाँर्न वाजतायत पण दिसत नाहीत. एकदम "भौक्क", केल्या सारख्या पुढे अचानक दिसतायत. सोसायटीतले चौकीदार कोपऱ्या कोपर्यावर शेकोट्या पेटवून कधी एकदा दिवसपाळी वाला येतोय वाट बघतायत. भटकी कुत्री शेकोटी जवळ येवू घुसायचा प्रयत्न करतायत पणचौकीदार त्यानां हाकलतायत,, बिच्चारी पुन्हा आपली पाय पोटात घेत इमारतीच्या आडोशाला मुटकूळे करून पडतायतं . त्याचीं पिल्लं आईच्या पोटात घुसून आंब्याची आढी लावल्या सारखी पडलीयेत. बिरबलाच्या खिचडीची आठवण आली.
अचानक एक जोरदार संवाद ऐकू आला, " आहो घेवून जा ना हो त्याला, केव्हाचां विनवणी करतोय", त्याला दबक्या आवाजातलंउत्तर, "आगं किती थंडी आहे खाली", "जरा काही गरम कपडे तर काढू दे", साहेबाच्या "सारखा रोबदार आवाज पन्हा कानावर आदळला आणी पुन्हा सामसूम. थोड्याच वेळात बिच्चारा कुत्र्याचा मालक सुरकुतलेली कानटोपी, मफलर स्वेटर किवां बँगेत तळाशी ठेवलेलं "जरकिन",कदाचीत श्रीनगर किवां महाबळेश्वर च्या हनिमून ट्रिपला घेतले असावे, घालून नाईलाजाने खाली दिसला.
एखादा दुसरा नशीबवान कुत्रा आंगात गरम स्वेटर तोंडाला नरसाळ्या सारखं काही तरी लावून डौँलात मालकाच्या आंगंचटीला येत होता. मालक "सुदंर" होता. त्याने पण गुलाबी कार्डिगन त्याला मँचिंग कानटोपी हातमोजे आणी सपाता घातल्या होत्या. कोपर्यात पडलेल्या कुत्र्यांना पण कदाचीत एक क्षण हेवा वाटला असावा आशी माझी आपली कल्पना. पण लगेचच ते पुन्हा पोटात मान खुपसून पडलं. मलाही उगाचच थोडी थंडी कमी झाल्याचा भास झाला. जवळूनच न दिसणारा एक कोमल "गंधारातला", आवाज आला " काका इतक्या थंडीत सुद्धा, कमाल आहे तुमची". उगाचच थंडी पुन्हा वाढल्या सारखी वाटली. कोपर्यावर चहाच्या टपरीवर चहा उकळत होता. पडलेलं धुकं आणखीन दाट्ट करायचा प्रयत्न करत होता. एक " परेड सावधान" सारखा आवाज आला. "ओ कर्नल , या जरा गळा शेका नाहितर उगाच म्हातारीला खोकल्याचा त्रास".
आस्मादिकांची पाऊले "दाहिने मुड ",आशी आँरडर मिळाल्या सारखी गपचूप टपरी कडे वळाली.
पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह.......
-कसरत
प्रतिक्रिया
3 Dec 2021 - 4:13 pm | प्रकाश घाटपांडे
मस्त मुक्तक
3 Dec 2021 - 5:07 pm | कंजूस
पुण्याथल्या चौकात?
3 Dec 2021 - 7:33 pm | Nitin Palkar
छान!
3 Dec 2021 - 10:33 pm | चौथा कोनाडा
मस्तच !
4 Dec 2021 - 8:50 am | जेम्स वांड
लेखकांना नेमकं काय म्हणायचं आहे ते कळले की काहीतरी कॉमेंट करता येईल.
4 Dec 2021 - 1:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुण्यात सध्या रोज सकाळी इतके धुके पडत आहे की १० वाजेपर्यंत घराबाहेरही पडावेसे वाटत नाहिये. गॅलरीमधुन डोकावले तर १००-२०० मीटरवरच्या बिल्डींग दिसत नाहियेत. दिवसभर सुर्यदर्शन होत नहीये. त्यावरच हा लेख आहे कर्नलकाकांचा.
4 Dec 2021 - 8:29 pm | जेम्स वांड
कठीण पडलं कळायला, थोडं स्पष्ट लिहिलं असतं तर पुण्यात नसणाऱ्या लोकांना पण कळलं असतं, असो!.
4 Dec 2021 - 9:13 am | कर्नलतपस्वी
धुंद सकाळी काढत वाट
चालत होतो धुक्यात
गर्द धुके हे जणु उतरले
आकाशीचे नभ वनात
मिपाकर प्रदीप काळे यांनी व्यक्त केलेली थंडीतली धुक्याची पहाट काल पुण्यात अवतरली होती. तशी महाराष्ट्रात सगळी कडेच होती.
माँर्नीगं वाँक हा नित्यक्रम. थंडी, उन, पाऊस वारा काही नित्यक्रमात बदल करू शकत नाही. सकाळी उठल्यावर खिडकीतून डोकावले. बाहेर सफेद धुक्याची दाट चादर घेऊन सर्व काही शातं होते. सवयी प्रमाणे लवकरच उठलो होतो. सिहासनस्थ असताना मुक्तक सुचले, बसल्या जागी लिहीले आणी शेअर केले.
प्रदीप काळ्यानीं लिहीलेली कवीता खूप आवडली, खाली लिंक दिली आहे.
https://www.misalpav.com/user/25102
प्रतीसादा बद्दल धन्यवाद.