मश्गूल मानवा
थेट डिवचून
हताश करून
पुरे मास्कवून
ज्ञानविज्ञानाला
कुंठित करून
जुन्या गृहितांना
निष्प्रभ करून
चाकोर्या आडाखे
मोडून तोडून
कल्पने पल्याड
पायंडे पाडून
वाटले गेला तो
कायम निघून...
गनिमी काव्याने
माघार घेऊन,
अस्पष्ट, दुरून,
कोण हे बोलते?
"पुन्हा मी येईन"
"पुन्हा मी येईन"
प्रतिक्रिया
29 Nov 2021 - 9:20 pm | चौथा कोनाडा
बाबौ, आता "पुरे मास्कवून" म्हटल्यावर बोलणंच खुंटलं !
आन वर "पुन्हा मी येईन, पुन्हा मी येईन" म्हणुन घाबरवून सोडलं ते वेगळंच !
कुंठित करणारी रचना आवडली.
30 Nov 2021 - 9:12 am | Bhakti
येऊ द्या
मेरे पास दो दो कोविशिल्ड है 😉
30 Nov 2021 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार
वायटुके किंवा नॉस्ट्राडॅमसच्या भविष्या पेक्षा भयंकर प्रकार सध्या चालु आहे.
आता अमुक होणार ढमुक होणार तिसरी लाट येणार चौथी, पाचवी सहावी, आता तुमची मुले सुरक्षित नाहीत. लस नाही तोपर्यंत शाळा बंद,
आता परिस्थिती बदलली आहे मॉल सुरु सिनेमा थेटर सुरु आता शाळा ही सुरु करा,
मास्क घाला, सॅनिटायझर लावा, लस घ्या, घरी बसा, अंतर पाळा, गर्दी टाळा हे करा आणि ते करा.
शंभर लोक शंभर प्रकारच्या माहित्या सांगत आहेत. त्यातही एक जण म्हणतो लैच डेंजरस आहे हा नवा प्रकार, दुसरा सांगतो हॅ घाबरायचे कारण नाही.
बरं यांचे ऐकले नाही तर पोलिस दांडुके मारणार आणि ऐकले तर हापिसात बॉस शिव्या घालणार. च्यायला डोके आउट व्हायची वेळ आली आहे.
पैजारबुवा,
2 Dec 2021 - 2:48 pm | अनन्त्_यात्री
कवितारसिकांना धन्यवाद