समुद्र..

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
28 Sep 2021 - 10:26 am

समुद्र ,सागर नजर टाकावी  तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात. लाटांचा आवाज म्हणजे सागराच हृदयाची स्पंदने भासतात.अजूनही डोळे बंद करतातच कानात नादमधुर लाटांचे आवाज घुमतात.या आवाजात हळुवार फुंकर असते.सागर कितीही खोल असला.खूप काही दडलेल असलं तरी सागर किनाराच रम्य वाटतो.
शाळेत पुस्तकात शिकतांना सागर किनाऱपट्टी अगदीच कोरडाच वाटणारा शब्द ,त्याची भेट घेतल्याशिवाय समजत नाही हे नक्की.किनाऱ्यावरची रेती,खडकाळ दगड,माडाची झाड हे ह्याच वैभव आहे.कोकणातल्या लोकांचा मग खूप हेवा वाटतो.यांना कधीही समुद्राला भेटता येत नाही समुद्र हा त्यांचा अविभाज्य भागच असतो.
समुद्राची आणि माझी पहिली भेट शाळेतल्या सहलीला झाली.गणपतीपुळे येथील अगदी मंदिरातून थोड्याच अंतरावर याच दर्शन होत.मैत्रीणींच्या ओंजळीत खार पाणी भरभरून झेललं.स्टार फिशची रवानगी घरी झाली.मऊ रेतीत नाव कोरण्याचा मोह सर्वांनाच होतो.मग रेतीची घर बांधण, नाव कोरून शिंपल्यांनी सजवण असे ना ना छंद या रेतीच्या अंगणात जोडले जातात.पावलांचे ठसे उमटवलेले वेगाने लाटा पुसून जातात. लाटांच अनभिषिक्त हक्क त्या किनाऱ्यावर दाखवत असतात:).
पुन्हा समुद्राची भेट व्हायला फार काळ लागला.इल्लू इल्लू माझ पिल्लू जेव्हा धावू लागली,तेव्हा कोकणातील वळणावळणातील रस्ते कापत एक निर्जन बेटावर ह्याला मी भेटले.माझी पिल्लूला सांभाळत कवचधारक एक हात तिला तर दुसरा हात समुद्राला सांभाळत होता.लाटांना माझी जबाबदारक  भूमिका फारशी रुचली नाही तिच्याशी  मी समरसून गेलीच नाही.तिला येईन तुला पुन्हा भेटायला  वचन  देऊन मी गेले.

लवकरच तामसतीर्थ , लाडघर सागर किनारी सागर –लाटा आता मात्र मनसोक्त भेटल्या.समाधी घेतलेल्या साध्वीसम ठाण मांडून मी सागराच्या किनारी बसले.भिजून भिजून चिंब ना जगाच ना वेळेच भान राहील.हो सागराच्या या  बेफान आवेशात मदहोश करणारी शक्ती असते.तेव्हा वाटलं पोहता येत असत तर सागराच्या तळाशी डोकावलं असत,ती शांती मनात साठवली असते.माथ्यावरचा सूर्य क्षितिजावर भगवे वस्त्र विणू पर्यंत लाटांशी खेळ चालू होता.केसांत अडकलेलं लाटांच पाणी रूप खुलवत होत.
सूर्य सागरात बुडणार ती कातरवेळ हुरहूर देते.तेव्हा अस्तित्वाचा क्षणभंगुर सत्य जाणवत.मग अलगद आपल्या माणसाचे हात हातात घेऊन अनेक शपथा घेतल्या.
रात्रीचा सागर किनारा चांदण्यांनी सजलेला .निजलेल लेकारुच भासत.
“सागर लाटांना झेलण
मनसोक्त जीवन जगण”
 -भक्ती

प्रेमकाव्यमुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

समुद्र लिमिटलेस अनुभूतीच्या जवळ चटकन न्हेतो खरे.

हो,लिमिटलेस सकारात्मकता!

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 12:22 pm | गॉडजिला

फक्त लिमिटलेस इतकच मी पकडतो. मग त्याचा सकार अथवा नकार असा कोणताच आकार उरत नाही.

तुम्ही सकरात्मक राहिलात तर नकारात्मकतेचे अस्तित्व कायम ठेवता व नकारात्मक राहिलात तर सकारात्मकतेची शक्यता कायम उरते. आकार विसरणे आवश्यक वाटते अन ते समुद्राशी जस जसे तादात्म्य पाउ तसे अनुभवाला येउ लागते. मग सकारात्मकतेने मन उल्हासीत होत नाही नकारात्मकता विचलीत करत नाही.

वरवर वार्‍याशी स्पर्धा करत लाटांसोबत खेळणारा वादळी समुद्र तळाशी इतका स्थितप्रज्ञ शांत उरतो की पृश्ठभागावरील वादळांशी त्याचा जणु काहीच संबंधच नसावा..

मला स्वताला सकारात्मकता व नकारात्मकता काही काळाने ओझे वाटु लागते…

Bhakti's picture

28 Sep 2021 - 1:35 pm | Bhakti

छान!

पराग१२२६३'s picture

29 Sep 2021 - 12:17 pm | पराग१२२६३

समुद्र कायमच खुणावत आला आहे मलाही.

प्रचेतस's picture

29 Sep 2021 - 12:22 pm | प्रचेतस

मस्त.

ज्योति अळवणी's picture

29 Sep 2021 - 3:23 pm | ज्योति अळवणी

Romantic स्वप्नांचा राजा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2021 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! लैच मस्त लिहिलंय. लिहिते राहा. लेखन आवडलं. समुद्र आवडत नाही असे म्हणनारी माणसं दुर्मीळच.
समुद्र आणि समुद्रगाज आपला हळवा विषय आहे. प्रतिसाद लिहायला आलो आणि
हा सागरी किनाराचा आठवण झाली.

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

30 Sep 2021 - 12:03 pm | तुषार काळभोर

एकदम गुलाबी आठवण!

अनन्त्_यात्री's picture

30 Sep 2021 - 4:04 pm | अनन्त्_यात्री

म्हणणार्‍यांची बाजू Lewis Carroll ने अशी मांडलीय:

*A Sea Dirge*

There are certain things - as, a spider, a ghost,
The income-tax, gout, an umbrella for three -
That I hate, but the thing that I hate the most
Is a thing they call the Sea.

Pour some salt water over the floor -
Ugly I'm sure you'll allow it to be:
Suppose it extended a mile or more,
THAT'S very like the Sea.
Beat a dog till it howls outright -
Cruel, but all very well for a spree:
Suppose that he did so day and night,
THAT would be like the Sea.

I had a vision of nursery-maids;
Tens of thousands passed by me -
All leading children with wooden spades,
And this was by the Sea.
Who invented those spades of wood?
Who was it cut them out of the tree?
None, I think, but an idiot could -
Or one that loved the Sea.

It is pleasant and dreamy, no doubt, to float
With 'thoughts as boundless, and souls as free':
But, suppose you are very unwell in the boat,
How do you like the Sea?

There is an insect that people avoid
(Whence is derived the verb 'to flee').
Where have you been by it most annoyed?
In lodgings by the Sea.

If you like your coffee with sand for dregs,
A decided hint of salt in your tea,
And a fishy taste in the very eggs -
By all means choose the Sea.

And if, with these dainties to drink and eat,
You prefer not a vestige of grass or tree,
And a chronic state of wet in your feet,
Then - I recommend the Sea.

For I have friends who dwell by the coast -
Pleasant friends they are to me!
It is when I am with them I wonder most
That anyone likes the Sea.

They take me a walk: though tired and stiff,
To climb the heights I madly agree;
And, after a tumble or so from the cliff,
They kindly suggest the Sea.

I try the rocks, and I think it cool
That they laugh with such an excess of glee,
As I heavily slip into every pool
That skirts the cold cold Sea.

- by Lewis Carroll

समुद्रकिनाऱ्याजवळ सगळं बालपण आणि तारूण्य गेल्यामुळे समुद्राबद्दल खास जिव्हाळा आहे. खारा वारा, समुद्राची गाज हे फॅसिनेटींग आहे. ३ वर्षांपूर्वी हे समुद्राशी असलेलं नातं आणखिनच गहिरं केलं, सर्टीफाईड स्कुबा डायव्हर होऊन!

समुद्राखालचं जग निव्वळ भ न्ना ट!

- (समुद्रप्रेमी पाणबुड्या) सोकाजी

Bhakti's picture

30 Sep 2021 - 7:06 pm | Bhakti

आणखिनच गहिरं केलं, सर्टीफाईड स्कुबा डायव्हर होऊन!

समुद्राखालचं जग निव्वळ भ न्ना ट!

उज्वलभविष्य's picture

8 Oct 2021 - 3:52 pm | उज्वलभविष्य

वयाच्या 28 व्या प्रथम समुद्र दर्शन केल मी आणि त्याचा प्रेमातच पडले। खरचं सागरकिनारी राहणार्यांचा खूप हेवा वाटतो मला।

उज्वलभविष्य's picture

8 Oct 2021 - 3:53 pm | उज्वलभविष्य

वयाच्या 28 व्या वर्षी प्रथम समुद्र दर्शन केल मी आणि त्याचा प्रेमातच पडले। खरचं सागरकिनारी राहणार्यांचा खूप हेवा वाटतो मला।